आनंदी राहण्याचे कारण शोधून काढा, ते अगदी सहजपणे कोणीही तुम्हाला देणार नाहीये.
सगळ्यांनाच आयुष्यात आनंद पाहिजे असतो आणि त्या आनंदा साठी आयुष्याची कसरत होते तरीसुद्धा पाहिजे असलेला आनंद .. मनाला हवं असलेलं सुख ते काही मिळत नाही..
खरं तर आपल्याला जे हवं ते मिळालेलं चांगल की आपल्याला योग्य ते मिळालेलं चांगल यामध्ये आपण कधीच फरक समजून घेत नाही म्हणूनच आपल्याकडे येते ते दुःख…
आपल्याला हवं असलेलं जरी मिळालं तरीसुद्धा त्यावेळी आपण आनंदी नसतो कारण आपल लक्ष आपल्याला जे मिळालं त्याकडे नसून आपल्या वाढलेल्या अपेक्षांकडे असते.. अपेक्षा काही कमी होत नाहीत..त्या वाढतच जातात आणि त्यासोबत आपली जीवनाबद्दल असलेली निराशा सुद्धा वाढत जाते…
आता दुःखाचं सर्वसामान्य कारण झालंय ते म्हणजे दुसऱ्यांशी तुलना.. आपण आपल्याला काय मिळालं आहे आपल्याकडे काय आहे याकडे लक्ष देत नाही याउलट आपल लक्ष हे सतत दुसऱ्या म्हणजेच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या.. वावरणाऱ्या.. आपल्या नजरेत येणाऱ्या व्यक्तींकडे.. त्यांच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींकडे असते.. आणि त्यामुळे आपण कधी आनंदी नसतो कारण आपण नेहमीच आपली तुलना इतरांशी करत बसतो आणि दुःखी होतो…
आनंदी राहण्यासाठी खर तर या सर्वाची गरज नसतेच.. आनंदी राहण्यासाठी आपणच आनंदाचं कारण शोधून काढायचं असते.. आणि आनंद किंवा आनंदाचं कारण हे काही आपल्याला कोणी सहज देणारं नाही आणि आपण तशी अपेक्षा करणे सुद्धा दुःखाचं कारण ठरेल त्यापेक्षा आपणच आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे..
जे आहे त्यामध्ये समाधान मानावं हे बोलणं जरी सोप असल तरी तस करणे अवघड आहे अस कित्येकांचे मत आहे..पण अवघड जरी असलं तरी अशक्य तर नाहीना.. आपण प्रयत्न केले.. सुरवात केली तर आपण असा सुद्धा विचार करून आनंदी राहू शकतो.
अपेक्षा आज आहेत उद्या सुद्धा राहतील.. त्या दिवसागणिक वाढतच जाणार.. अपेक्षा पूर्ण नाही jhalya की आपण सहज नाराज न होता एकच विचार मनात कायम ठेवायचा की प्रत्येक अपेक्षा पूर्ण होईलच अशी आशाच मुळात आपल्याला त्रास देईल म्हणून प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याचा आपणच प्रयत्न करायचा.. नाहीच पूर्ण झाल्या तरी आपले प्रयत्न वाढवून त्या अपेक्षा पूर्ण करण्याची तयारी ठेवायची.. कारण नाराज झाल्याने पुढे सर्व अवघड वाटते त्यापेक्षा स्वतःची जिद्द वाढवून.. स्वतःच्या अपेक्षा स्वतःच पूर्ण करण्याचा प्रयत्न करून आनंदी राहायचं..
माझ्याच वाटेला सगळ दुःख.. माझ्याच वाटेला सगळा त्रास.. मी किती सहन करायचं.. या विचारांनी कायम दुःखच मिळणार.. त्यापेक्षा जे आपल्याला आनंद देतील.. हसवतील.. उत्साही ठेवतील.. मनाला उभारी देतील .. जगण्याची जिद्द वाढवतील असे विचार करायचे.. आणि हे विचार तस जगण्याचा प्रयत्न केल्यावरच येणार.. त्यासाठी कायम सकारात्मक विचार असणाऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात राहायचं.. जास्तीत जास्त प्रेरणा मिळेल अस वाचन करायचं.. आपल्याला ज्यातून उत्साह मिळेल अशा आपल्या कलागुणांना जास्तीत जास्त वेळ द्यायचा.. आनंद मिळेल असेच कारण शोधायचे आणि स्वतःच आनंदी राहायचं…
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
👉🏽 क्लिक करा 👈🏽
“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”


खूप छान लेख आहे असंच वरची वर लेख टाकत जावा