Skip to content

सेल्फ डेव्हलपमेंटची खरी सुरुवात करायची असेल तर आधी तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा.

सेल्फ डेव्हलपमेंटची खरी सुरुवात करायची असेल तर आधी तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा.


आज गरज आहे ती म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट.. म्हणजे काय तर आपल्यात आपणच विकास घडवायचा जो आजच्या युगाशी सुसंगत झाला पाहिजे..आपला इतरांवर प्रभाव पडण्याची आपल्याला हल्ली गरज वाटते कारण कुठे ना कुठे आपल्यावर सुद्धा इतरांचा प्रभाव हा असतोच.. पण आपला इतरांवर प्रभाव तेव्हाच जाणवेल जेव्हा आधी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला असेल..

आणि त्यामध्ये काय आहे तर आपले विचार, आपल वागणं, आपली जीवनशैली, आपल राहणीमान, आपली निर्णयक्षमता, आपल्यातील आत्मविश्वास, आपल नियोजन, आपल्यातील सकारात्मकता, आपल्यातील सुसंवाद कला हे सगळं well develope असणे, सगळ्यात उच्च असणे म्हणजे आपण आजच्या काळाशी मॅच होतोय..

पण आपल्यात विकास कधी घडेल.. जेव्हा आपल्यात जे गुण अवगुण.. आपल्यातील कमतरता, आपल्यातील विशेष गुण ओळखून आपण त्यांचा स्वीकार केला तरच..

मी म्हणजे खूप काही अस म्हणत आपण स्वतःला develope करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या हाती काहीच लागणार नाही.. जिथे अडचणी तिथेच मार्ग काढण्याचा प्रयत्न होतो पण जिथे अडचणी नाहीच अस बोललं की तिथे कसला मार्ग शोधायचा…

शाळेत असताना हुशार विद्यार्थी असल्यावर त्याच्याकडे लक्ष देतातच पण त्याच्याकडे जास्त लक्ष देतात जो अभ्यासात मागे पडतोय.. कारण त्यांना सगळ्यांना पुढे न्यायचं असत.. प्रत्येकाने प्रगती करावी म्हणून ते जास्तीत जास्त मेहनत घेऊन कमी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी कडे लक्ष देऊन त्याला सुद्धा पुढे जाण्याची वाट मोकळी करतात..

तसच जर आपण आपल्यातील जे काही कलागुण आहेत.. आपल्यातील कमतरता आहेत त्यांचा आधी स्वीकार केला की आपल्याला त्यावर जास्तीत जास्त मेहनत घेता येते आणि आपल्यात जिथे गरजेचा आहे तिथे बदल घडवता येतो..

पण मला स्वतःला घडवायचं सुद्धा आहे आणि मला माझ्यातील चांगले वाईट गुण.. माझ्या चांगल्या वाईट सवयी यांचा मी स्वीकार सुद्धा करत नाही तर बदल घडणार तरी कसा..

स्वीकार हा व्यक्तीमध्ये बदल घडवण्याची क्षमता वाढवतो.. मीच कसा योग्य.. माझं काहीच चुकत नाही.. मला सर्व येते.. माझं काही अडत नाही यामध्ये आपण इतके अडकतो की आपल्याला त्यातून बाहेर पडणे अवघड असते. . पण माझं काही चुकत आहेका.. मी काय केलं पाहिजे.. माझ्यात काही कमी आहेका यांचा आपणच आधी

स्वीकार केला की बाकी सगळं सोपे होते.

आपण एखादा विचार करतो…तो योग्य की अयोग्य हे आपणच ठरवतो आणि जेव्हा आपल्याला योग्य वाटतो त्यानंतर आपण आपला तो विचार इतरांना सांगतो.. म्हणजेच पहिले आपण आपल्या विचारांचा स्वीकार करू तरच बाकीचे करतील..

अगदी तसच जर आपल्याला आपली growth हवी असेल तर आधी आपण आपल्याला आपण जसे आहोत तसे स्वीकारणे गरजेचे आहे.. आधी आपण स्वतःचा स्वीकार केला की त्यामध्ये कुठे आणि कोणते बदल करण्याची गरज.., आपल्यातील कमतरता आपण स्वीकारतो.. त्यामुळे आपल्याला गरजेप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवणे सहज होते…

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

 

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!