Skip to content

प्रेरणा आणि प्रोत्साहनाचे काही शब्द सुद्धा माणसाचं आयुष्य बदलू शकतात..

प्रेरणा आणि प्रोत्साहनाचे काही शब्द सुद्धा माणसाचं आयुष्य बदलू शकतात..


आपण कोणालाही जेव्हा शिकवतो.. समजावतो.. उपदेश देतो त्यावेळी त्या व्यक्तीला आपल्याकडून कायमच योग्य ती प्रेरणा मिळणे गरजेचे आहे.. पण जर आपण त्यावेळी मला हे जमलं नाही तुला कस जमेल अस बोललो.. किंवा हे खूप कठीण आहे अस विधान केलं तर नक्कीच त्या व्यक्तीला सुद्धा पुढे जाण्यासाठी सर्व अवघड वाटेल..

जेव्हा कोणीही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावेळी आपण दिलेलं प्रोत्साहन त्यांना एक वेगळं बळ देते.. जगण्याची जिद्द वाढवेल .. कितीही अवघड असेल तरीही त्याकडे लक्ष न देता जे जमते ते करत आणि आपले प्रयत्न वाढवत ती व्यक्ती यशाचं शिखर नक्कीच गाठेल..

एक अशी व्यक्ती जी लहान असताना त्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आले.. आणि त्यांच्यासोबत एक पत्र देण्यात आले.. पत्र आईला दे म्हंटल्यावर त्यांनी ते आईच्या हातात सोपवल .. ते पत्र वाचून आईच्या डोळ्यात पाणी आले मात्र त्यांनी आईला कारण विचारल्यावर तिने सांगितलं की शाळेतून तुझ कौतुक झालं आहे.. तू एक विशेष मुलगा आहेस .. तू खूप हुशार आहेस आणि आमची शाळा तुझ्यासाठी पात्रतेची नाही..ती खालच्या स्तराची आहे.. हे ऐकून त्यांना आनंद झाला.. पण त्यावेळी त्यांच्या आईने मात्र दुःख स्वतःकडे ठेवून मुलाला याची काहीच चाहूल लागू न देता त्याला स्वतःच सगळं शिकवण्याच ठरवलं..आणि तिने त्यांना घरी राहून शिक्षण दिलं..

आणि मोठ झाल्यावर त्याच व्यक्तीने विविध आविष्कार घडवले आणि आजही त्यांचं नाव एक विशेष व्यक्ती म्हणून घेतल जात आहे.. ती व्यक्ती अजून कोणी नाही तर महान वैज्ञानिक थॉमस एडिसन ही आहे.. ज्यांनी हजारो नवनवीन यशस्वी शोध लावले आहेत.. पण जेव्हा त्यांच्या आईंच निधन झालं तेव्हा काही दिवसांनी आईच्या कपाटात त्यांना शाळेतून दिलेलं पत्र मिळालं.. ते वाचल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं… त्या पत्रात लिहिले होते की तुमचा मुलगा मंदबुद्धी आहे त्याला नीट लिहिता वाचता येत नाही आणि आम्ही त्याला आमच्या शाळेत ठेवू शकत नाही.तुम्ही स्वतःच तुमच्या मुलाला शिकवा.

थॉमस एडिसन यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिले आहे की एका आईने एका कमजोर मेंदू असणाऱ्या मुलाला एक महान वैज्ञानिक बनवून दिले..

तेव्हा जर त्यांच्या आईने त्यांना खर वाचून सांगितलं असत तर त्यावेळीच ते कमजोर पडले असते.. त्यांच्या जगण्याचा आशावाद तिथेच थांबला असता.. पण त्यांच्या आईंच्या काही शब्दातच त्यांचं आयुष्य बदललं.. त्यांनी आवडीने अभ्यास केला आणि आज ते एक महान व्यक्ती घडले..

खरचं शब्दांमध्ये किती ताकद असते.. आपण जेव्हा कोणाशीबोलतो तेव्हा त्याला आपल्याकडून कायम सकारात्मक विचार मिळतील.. त्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अस आपल बोलणं पाहिजे..

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

 

1 thought on “प्रेरणा आणि प्रोत्साहनाचे काही शब्द सुद्धा माणसाचं आयुष्य बदलू शकतात..”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!