Skip to content

चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांमध्ये आनंदी राहिलेलं बरं!

चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांमध्ये आनंदी राहिलेलं बरं!


ती व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण मी सुद्धा तिच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे .. आमचं एकमेकांशी छान नात आहे.. बहुतेक वेळा तर आम्ही एकमेकांना काहीही न सांगता बोलता एकमेकांच्या मनातलं ओळखतो.. जर ती कुठे चुकली आणि मी स्पष्ट सांगितलं तिला समजावलं तरीही कोणताच राग न बाळगता ती ते स्वीकारते आणि स्वतःमध्ये बदल करते आणि माझंसुद्धा तसच आहे.. आम्हाला आमचं नात कायम टिकवायचं आहे.. एकमेकांना त्रास होईल अस आम्ही कधीच वागत नाही आणि चुकून चुकीचं काही घडलं तरी त्याची माफी मागायला आम्ही मागे पडत नाही.. आम्ही एकमेकांसोबत कायम आनंदी असतो…

जेव्हा हे आपण आपल्या नात्याविषयी बोलतो तेव्हा ते नात आपल्याला हवं आहे..आपल्याला त्या नात्यात कायम बांधलेलं राहायचं आहे हे लगेच कळते.. त्या नात्याविषयी आपल्या मनात आदर आहे हे समजते.

पण काही नाती असेही असतात जी नाती आपण फक्त आहेत म्हणून कसबस सांभाळतोय… समोरच्याला आपण काहीही बोललं तरी त्याची ऐकून घेण्याची तयारी नसते पण तिथे आपणच पुढाकार घेऊन समजून घेतो.. नात हे फक्त दिसण्यासाठी पुढे नेल जाते.. त्यामध्ये कोणतीच आपुलकी आणि जिव्हाळा नसतो.. त्या नात्याकडे पाहिलं की लगेच कळते की या नात्यात एकमेकांविषयी कोणतीच ओढ नाही.. आणि काहीवेळेस ते नात एकतर्फी असते.. एकलाच त्याची गरज म्हणून तो सर्व सांभाळून समजून उमजून ते नात निभावयचा प्रयत्न करत असतो..

पण जर नात एकतर्फी जपलं जातं असेल.. त्या एखाद्याला त्याचा त्रास होत असेल.. ती व्यक्ती कायम त्या नात्यासाठी कायम प्रयत्नशील असेल मात्र समोरून नेहमीच दुःख त्रास मिळत असेल तर अशा नात्यात स्वतःला का अडकवायच….आपल्याला जिथे कधी प्रेम मिळत नसेल.. आदर मिळत नसेल.. आणि आपल्या मनाप्रमाणे जर त्या नात्यात कधीच काही होत नसेल.. तर त्या नात्यात गुंतून उदास राहण्यात काय अर्थ आहे…

खरी नाती तीच असतात जी दोन्हीकडून निभावली जातात.. त्या नात्यात गोडवा असेल तर कायम आनंद मिळतो पण हे उदास राहून दिवस ढकलायचे असतील.. स्वतःला त्रास करून घ्यायचा असेल तर मग ते नात ठेवून आपला त्रास वाढणार..

जर आपल्याला स्वतःला आनंदी ठेवायचं असेल तर त्यासाठी नक्की प्रयत्न करावेत.. पण सतत दुसऱ्याला आनंदी ठेवण्याच्या नादात आपण उदास होणार असू तर त्या केलेल्या समजुतींना काही उपयोग नाही..

मी माझं आणि माझी मर्जी असे वागणारे अनेक स्वार्थी वृत्तीचे लोक आपल्या आयुष्यात असतात.. पण मग अशांमध्ये आपल सुख आपल्याला कधीच नाही सापडणार कारण ते स्वतःपुरती मर्यादित आयुष्य जगत असतात.. ते कधीच स्वतःच्या सुखाचा सोडून दुसऱ्यांचा विचार करणार नाही मग आपण का त्यांना आपल्या आयुष्यात जबरदस्ती टिकविण्याचा प्रयत्न करतो..

त्यापेक्षा ज्या नात्यात आपल्याला नेहमी आणि जास्तीत जास्त सुख मिळेल आनंद मिळेल.. अस नात शोधायचं आणि टिकवायचं..

आणि अशी नाती सगळीकडेच मिळतील अस नाही कदाचित नाहीच सापडणार पण कोणत्याच चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा अनोळखी लोकांमध्ये तरी आनंद मिळतो.. बघाना आपण कधी प्रवासात असताना आजूबाजूची माणसं आपली चौकशी करतात आपण त्यांची करतो.. मस्त गप्पा होतात.. पुन्हा भेट होईल की नाही खात्री नसते पण एक अनोखा आनंद मिळतो..

एखाद्या ठिकाणी आपण फिरायला गेलो की तिथे आजूबाजूची माणसं आपल्याशी हसतात बोलतात.. कधी आपण त्यांना त्या ठिकाणची माहिती विचारतो तर कधी ते.. पण त्यांच्याशी बोलून आपल्याला नवा उत्साह मिळतो.. त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळते..

मग जर अशा अनोळखी माणसांमध्ये आपल्याला आनंद मिळत असेल .. त्यावेळी त्यांना भेटून आपल्याला समाधान मिळत असेल.. तर आपण एखाद्या नात्यात आनंद मिळत नसताना.. त्रास होत असताना.. त्या नात्यात म्हणजेच चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा त्या नात्यात नाराज राहण्यापेक्षा अनोळखी लोकांमध्ये आनंदी राहिलेलं बरं…

काहीवेळेस एका क्षणाचा आनंद आयुष्यभर आनंदी राहण्याच कारण बनते.. आणि आपल्यातला उत्साह वाढवतो मग चुकीच्या नात्यात सतत घुसमट करून घेण्यापेक्षा त्या क्षणी का असेना पण अनोळखी लोकांमध्ये जेवढं राहू तो आनंद मिळवलेला कायम योग्यच..

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

 

1 thought on “चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांमध्ये आनंदी राहिलेलं बरं!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!