Skip to content

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक Phase येते,जेव्हा तिला कोणाशीच काहीच शेअर करू वाटत नाही.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक Phase येते,जेव्हा तिला कोणाशीच काहीच शेअर करू वाटत नाही.


आयुष्य विविध रंगी असते.म्हणूनच आपल्या ह्या आयुष्यात अनेक पायऱ्या,Phase येत असतात.असे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडत असते.घटना वेगवेगळ्या असू शकतात.पण प्रत्येकजण क्षणोक्षणी एक फेज मधून जात असतो.ती फेज कायम नसते पण त्यातून जाणे मात्र अपरिहार्य असते.त्याशिवाय आयुष्य पुढे जात नाही.अशीच एक Phase आपण ह्या लेखात पाहणार आहोत.

ही फेज म्हणजे, अशी फेज आहे,ज्यावेळी प्रत्येक व्यक्तीला कोणाशीच काहीच शेअर करू वाटत नाही,बोलू वाटत नाही.

तुम्हाला हे वाचून कदाचित नकारात्मक वाटले असेल ,पण ही फेज नकारात्मक अजिबात नाही.ही एक मानसिकता आहे.आणि प्रत्येकजण कधी ना कधी ह्या फेज मधून जाणार असतो. आयुष्यात अनेक समस्या,अडचणी आपण अनुभवत असतो.व्यक्तिपरत्वे यांचे प्रमाण कमी अधिक असते.पण समस्या, संकटे ही असतातच.कायम नसतात पण येतात आणि निघून देखील जातात.आणि ही आव्हानेच आयुष्य शिकवून जातात.

संकट आले ,ताण-तणाव आले की माणूस सैरभैर होतो.रडतो,राग राग करतो,अगदी नैराश्यात देखील जातो.काही जण मदत करतात,तर काही जण आपली साथ देखील अशा वेळी सोडतात.पण लढत तर राहवेच लागते.हळूहळू ही समस्या सुटू लागते.काही मार्ग दिसतात.आणि यामुळे मन देखील शांत होते.पण दुसरीकडे, एक अशी मानसिकता होते की ,त्या व्यक्तीला काहीच बोलू वाटत नाही किंवा व्यक्त व्हावे असे देखील वाटत नाही.कारण त्या व्यक्तीला शांतता ,एकांत हवाहवासा वाटत असतो.

एखाद्या मोठ्या संकटातून बाहेर पडल्यानंतर, माणूस हळूहळू शहाणा बनू लागतो.सर्व बाजूंनी विचार करू लागतो.आयुष्याने दिलेले टक्के-टोनपे माणसाला चांगला धडा शिकवून जातात.स्वतःच्या चुका दिसू लागतात.आणि मग माणूस नैराश्यातून उठून एका शांतीमय आयुष्याकडे वाटचाल करू लागतो.आणि त्यामुळे त्याला कोणाशी काहीच शेअर करू वाटत नाही.

ही फेज येते म्हणजे काही माणूस दुःखात असतो असे नाही.पण ह्या मानसिकतेमध्ये ,व्यक्तीला कोणीतच अपेक्षा कोणकडूनच राहत नाही.ही व्यक्ती फक्त आणि फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करते,स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देऊ लागते.स्वतःची सर्वांगाने काळजी घेऊ लागते.स्वतःमध्ये सुधारणा आणि बदल करू लागते.

तुम्हाला अशा व्यक्ती तुमच्या आजूबाजूला दिसत असतील.तुम्ही कित्येकदा असा देखील विचार करीत असाल की ,काय ही/हा स्वतःच्याच आयुष्यात मग्न आहे,किती ताठ आहे,किती अहंकारी आहे वगैरे वगैरे समज करून घेतले जातात.पण कित्येकदा सत्य वेगळे असते.आणि हेच सांगण्याचा प्रयत्न ह्या लेखातून करीत आहे.

ही अशी फेज आयुष्य घडवून जाते.कसे वागावे ,बोलावे हे शिकवून जाते.एक माणूस म्हणून आपण कसे स्वतःशी आणि इतरांशी वागले पाहिजे हेच ही फेज शिकवून जाते.मी तर म्हणेन ,ही फेज आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणते.नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला मजबूत,कणखर बनविते.म्हणून आयुष्यात येणाऱ्या ह्या फेजला आपलण Thanks म्हणूयात.

आयुष्य प्रत्येक वेळी आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवीत असते.म्हणून नकारात्मक विचार करण्याऐवजी ,ह्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.जग बदलावे असे वाटत असेल तर त्याची सुरवात नेहमी स्वतःपासूनच करणे अपरिहार्य आहे.उगाच कोणाला दोष देऊन ,जबरदस्तीने बद लविण्याचा प्रयत्न कधीच करू नका.अन्यथा नेहमी अस्वस्थ राहाल.

जेव्हा शांतिकडे वाटचाल होईल तेव्हाच मानसिक आरोग्य लाभेल.आयुष्याला धन्यवाद द्या आणि पुढे चालत राहा.

लेखिका – मेराज बागवान


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!