हसा, भेटा, एकमेकांशी दिलखुलास बोला, नाराज राहून आणि स्वतःला एकटं पाडून काय होणार आहे.
आपल व्यक्तिमत्त्व आपणच निर्माण करू शकतो आणि ते अस करावं की आपल्याला जो कोणी भेटेल त्याला आपल्याला पुन्हा भेटण्याची इच्छा वाटली पाहिजे.. असे काही लोक असतात ना की जे बघावं तेव्हा एकदम फ्रेश दिसतात.. दिसण्यानेच नाही तर त्यांचं वागणं आणि त्यांचे विचार सुद्धा तेवढेच उत्साही असतात..
कोणाच्या भेटण्याने बोलण्याने त्यांना आपल्याबद्दल काय वाटेल याचा विचार करूनच आपण वागावं बोलावं पण मात्र आपल्याला भेटणाऱ्या आपल्याशी बोलणाऱ्या व्यक्तींच्या वागण्या बोलण्याचा आपण आपल्यावर चुकीचा परिणाम करून नाही घ्यायचा.
म्हणतात ना ऐकावं जनाच आणि करावं मनाचं अगदी तसच आपण आपल्या मनाचे राजे असायला हव.. नाहीतर काय होणार हा मला असा बोलला.. तो मला अस बोलला.. मी किती चांगल वागलो तरी समोरून मला विरुद्ध मिळते.. अशा तक्रारी आपण करत बसतो.
उठता बसता जर आपण तक्रार करत राहिलो की एक दिवस आपल्याला आपलाच म्हणजे आपल्याच विचारांचा कंटाळा येतो.. कारण या तक्रारी आपल्याला सर्वांपासून लांब नेण्याचं काम करत असतात.. आणि आपण कधी एकट पडतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही.. उगाच कोणावर नाराज होऊन आपण आपलाच मूड खराब करत असतो..
आणि एकट्याने आयुष्य जगता येईल का.. सगळे आपल्या सोबत असले की आयुष्य जगण्याची मज्जा काही वेगळीच असते. आता समजा आपला वाढदिवस आहे आणि आपण ती साजरा करतोय.. त्यावेळी जर फक्त एखाद दुसर कोणी असेल तर त्यावेळी मिळालेला आनंद आणि जर आपल्या जवळचे असे जास्त आपली माणसं असतील तर त्यावेळी येणारी मज्जा..
यात नक्कीच फरक आहेना. आणि हेच जर दुःखाच्या वेळी आपण एकटे असू तर ते छोटस दुःख सुद्धा खूप मोठं जाणवते आणि आपल्या सोबतीला माणसं असतील तर कितीही मोठ दुःख आपल्याला सहज बाजूला सारायला जमते.म्हणून एकट्याने तरी काय जगायचं.. सोबत आजुबाजुला आपली माणसं असायलाच हवीत.
आजचा दिवस माझाच असा विचार केला की आपल्याला उत्साह मिळतो.. आणि आपले विचार ताजेतवाने ठेवण्यासाठी आपण स्वतःला नेहमीच बिझी ठेवायचं.. रिकाम डोकं म्हणजे नको ते विचार आपल्या डोक्यात सहज प्रवेश करतात आणि मग आपण त्या विचारांना आपल्या वागण्यावर परिणाम करण्याची संधी देतो..
यापेक्षा जास्तीत जास्त स्वतः ला कशात न कशात गुंतवून ठेवायचं.. नवनवीन विचारांचं वाचन करायचं .. ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते अशा व्यक्तींशी सतत संपर्क ठेवायचा.. ज्यामुळे आपले विचार कायम सकारात्मक राहतात.
विनोदी चित्रपट..नाहीतर हल्लीच्या विनोदी रीलस , विनोदी मालिका पाहायच्या ज्यामुळे आपल्याला हसत हसत जगण्याची प्रेरणा मिळते.
आपले विचार जेव्हा सकारात्मक असतील तेव्हा आपण कोणाकडून कसली आशा अपेक्षा न करता आपण आपल्याला जमेल तसं स्वतःच स्वतःकडून जे आपल्याला हवं ते करून घेतो.. आणि एकदा का अपेक्षांना जागा नाही मिळाली की तक्रारी सुद्धा आपल्यापासून हळूहळू दूर निघून जातात..
आपल्या हसत्या खेळत्या आणि positive व्यक्तिमत्त्वाने कोणीही आपल्याला जवळच करणार आणि जरी नाही केलं तरी कोणाच्याही कोणत्याच वागण्याचा आपल्यावर परिणाम होणार नाही..
म्हणून आपणच आपल व्यक्तिमत्त्व अस ठेवायचं की येणाऱ्या जाणार्यांशी आपण हसत बोलत असलो की समोरच्याला सुद्धा आपल्याकडून एक सकारात्मकता मिळते आणि आपण सुद्धा आनंदी राहतो.. जगायचं तर दिलखुलास आणि आयुष्य हे रडत नाही तर हसत जगायचं आणि तक्रार न करता जगायचं हे आपल्याला कळेल तेव्हाच हे आयुष्य दिलखुलासपणे आपल्याला जगता येईल.
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

