कधी कधी स्वतःची फार आठवण येते यार.. किती भारी हसत जगायचो….
गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी अस म्हणत आपण जुन्या दिवसांची नेहमीच आठवण काढतो.. आपल्याला म्हणजेच प्रत्येकाला आयुष्यात सतत सुंदर.. आनंदी अशाच आठवणी मिळतात अस नाही कारण आयुष्य हे सुख दुःख घेऊनच येते.. पण बघाना तरीसुद्धा कोणतेही दिवस आठवताना आपल्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद असतो..
आजच्या पिढीत इतकं नाही पण आपल्या आईं वडीलांचा त्यांच्या आई वडिलांचा जो काळ होता तो काळ असा होता ज्यामध्ये त्यांच्या हातात सुख सोयी नसायच्या पण तरीसुद्धा त्यांच्या मनात मात्र समाधान असायचं.. कितीही बिकट परिस्थिती असली तरी काटकसरीने का असेना पण ते आयुष्य खऱ्या अर्थाने जगायचे…
आपल्याला जेव्हा जुनी लोक त्यांचा एक एक किस्सा सांगतात तेव्हा आपल्याला कायमच आश्चर्य वाटेल अस त्यांचं आयुष्य होत.. पण तरीसुद्धा ते सतत रडत नाही बसायचे.. काही जवळचे सोडले तर सगळ्यांनाच आपल दुःख आपली कहाणी सांगत नव्हते.. आणि जस ते आधी जगले तसेच आजही जगतात म्हणून त्यांनी दिलेले सल्ले आज सुद्धा आपल्या कामी येतात.. आजसुद्धा ही लोक जुन काही आठवून रडत बसलेत अस होत नाही कारण त्यांनी त्यांची जगण्याची शैली नाही बदलली…
आता आपल बघायचं.. आपण काय करतो.. जुने दिवस आठवतो आणि रडत बसतो.. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मस्त मनमोकळ जगायचं.. आवडेल तिथे जायचं.. जे आवडेल ते आवर्जून करायचं.. मनासारखं झालं की हसायचं आणि नाही झालं की सगळ्यांसमोर रडायचं अगदी बिनधास्त..
मग आता काय झालं … तर आज आपल्यात आपणच बदल करून घेतले आहेत.. काळानुसार माणसात बदल घडले पाहिजेत म्हणून एक trend म्हणून आपण सुद्धा आपल्यात बदल करण्याचा प्रयत्न करतो..बदल गरजेचे आहेत आणि ते करायलाच हवे पण असे बदल जे आपल्याला आनंद देतील.. पण आपण लोकांसाठी… सोसायटी मध्ये impression पडावं म्हणून.. ऑफिस मध्ये उठून दिसावं म्हणून स्वतःमध्ये बदल घडवतो.. जे स्वतःला आनंद देणारं नसेल दुसऱ्यांना दाखवायचं म्हणून असेल ते भविष्यात सुद्धा कोणतं समाधान देणार…
आयुष्य मनमुराद जगता आल पाहिजे… लहानपणी जस आपण मोकळं वागत होतो.. मोकळ्या स्वभावाचे होतो.. मनात एक आणि चेहऱ्यावर एक अस आपल विश्व कधीच नव्हत.. आणि त्यामुळेच आपण नेहमीच मिळालेले प्रत्येक क्षण enjoy करायचो..आज मात्र आपल सर्व विरुद्ध झालंय.. हसतोय पण ते एक दिखावा म्हणून आणि रडतो ते सुद्धा एकट्यात..
ते हसणं.. ते रडणं.. ते खेळणं.. बागडण..मनाला आनंद मिळेल ते करण.. मनसोक्त फिरणं… खरं आयुष्य तर तेच होत.. आता स्पर्धेच्या नादात आपण जगणं विसरलो आहे.. कोणी दुसर आपल्या पेक्षा वरचड ठरू नये म्हणून आपण आपल्याला मिळालेला वेळ आणि ऊर्जा नको तिथे उगाच खर्च करत आहोत.. पैसा संपत्ती स्टेटस या सगळ्यात आपण इतके अडकलो आहोत की पोट भरण्यासाठी कष्ट करणारा माणूस आज पोटभर मनाला समाधान मिळेल अस काही खात सुद्धा नाही फक्त धावतोय…
शिक्षण म्हणजे विद्या ही माणसाला जगण्याची दिशा देते तर आज ती सुद्धा फक्त पैसा मिळवण्याचं साधन आणि मार्ग म्हणून उपयोगात आणली जाते.. आपल बालपण तर सुंदर होत पण आपण आपल्या मुलांना सुद्धा त्यांचं बालपण जगू देत नाही.. कमी वयातच त्यांनासुद्धा स्पर्धेत ढकळण्याचा प्रयत्न आपण करतोय..
आज आपण ते दिवस आठवतोय.. जुन्या स्वतः ला आठवतोय.. आपल हसण आठवतोय.. पण आपल्यासोबत येत्या पिढीला आज आतापासून जगणं म्हणजे काय ते नक्की शिकवा.. जगण्याचा आनंद स्वतःही घ्या आणि त्यांनाही घेऊ द्या .. म्हणजे पुढची पिढी मनमुराद जगेल…
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

