Skip to content

एक लक्षात घ्या, शेवटी स्वतःच स्वतःला सांभाळून घ्यायचं असतं.

एक लक्षात घ्या, शेवटी स्वतःच स्वतःला सांभाळून घ्यायचं असतं.


काळजी.. प्रेम… सहानुभूती.. या सर्वांची गरज प्रत्येकालाच आयुष्यात कुठेना कुठे जाणवतेच … पण … कधीतरी कुठेतरी ठीक असते.. नेहमी नेहमीच या सर्वांची आपल्याला गरज भासत असेल तर नक्कीच आपण कुठेतरी चुकतोय.. आपल्यात काहीतरी कमतरता आहे.. . कारण कधीतरी आणि नेहमी यामध्ये खूप फरक आहे..

जेव्हा आपल्याला कधीतरीच क्वचित कोणाच्या मदतीची गरज पडत असेल तर कोणीही आपल काम बाजूला सारून .. वेळात वेळ काढून आपल्या मदतीला येते.. पण जर नेहमीच आपण मदत मागणार तर वेळ मिळेल तस.. स्वतःची काम आवरून.. स्वतःच्या विचारानुसार कोणी आपल्याला मदत करते..

आपल्या जवळ जर खरचं अशी माणस असतील की जे नेहमीच आपल्याला मदत करतात.. आपली काळजी घेतात.. आपल्यावर प्रेम करतात पण यामुळे आपल्या अपेक्षा वाढतच राहतात.. आपल्याला मदतीची.. काळजी, प्रेमाची ,आपल्याला समजून घेणाऱ्याची, आपल्याला सांभाळून घेणाऱ्यांची सवय होते..

याचा परिणाम हाच की आपण जेव्हा एकटे असतो आणि सहज सोडवता येतील असे प्रश्न समोर आले ….समोर उभ्या राहणाऱ्या संकटाना तोंड देण्याची वेळ आली की त्यावेळी आपण कमी पडतो..ते एकट्याने सर्व निभावून घ्यायला. त्यावेळी सुद्धा आपण अपेक्षा करतो मदतीची .. कोणीतरी आपल्याला सांभाळून घेण्याची..पण तेव्हा जर कोणी भेटलच नाही.. कोणी मदतीला आलच नाही तर पदरी पडते ती फक्त निराशा..

हा माझ्या मदतीला आला नाही.. तो आता माझी काळजी करत नाही… त्याला माझं काही पडलेलं नाही तो स्वतः चच बघतोय.. माझ्यावर प्रेम करणार माझ्या अडचणीच्या काळात मला समजून घेणार.. समजावणार कोणीच नाही अशा एक ना अनेक बिन गरजेच्या तक्रारी आपण करतो.. हो बिन गरजेच्या तक्रारी बोलण वावग ठरणार नाही कारण ज्या गोष्टी जे प्रश्न आपण एकट्याने सहज हाताळू शकतो अशावेळी सुद्धा जर आपण इतर कोणाची आशा करू तर याला बिन गरजेची तक्रारच म्हणावं लागेल..

तेच जर येणार संकट मोठ असो किंवा छोटस अशावेळी आपण त्यांना सामोरे जाऊन एकट्याने त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काढला तर कोणाच्या मदतीची आशा आपण करणार नाही.. एकट्याने सर्व सांभाळून घेण्यात सुद्धा एक विलक्षण आनंद मिळतो.. मी सुद्धा काही करू शकतो हा आशावाद निर्माण होतो जेव्हा आपण एकट्याने समोर उभे राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो..

स्वावलंबी होण यालाच तर म्हणतात.. बघाना एखाद दुखं घरात आलं आणि अशावेळी सगळे घाबरतात.. कोणी रडते पण एक त्यामध्ये असतोच जो खंबीर राहून सर्वांना सांभाळून घेतो.. घाबरत नाही रडत नाही.. त्याच्याबद्दल सगळ्यांनाचं कौतुक असते.

आपण समजा एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो आणि तिथे काही कारणाने एखाद्या संकटात अडकलो.. म्हणजे समजा आपली गाडी अंधाऱ्या रात्री अचानक बंद पडली तर अशावेळी कोणाला बाहेर बघण्याची पण हिम्मत नसते तर कोणी आता इथेच रात्र काढावी लागेल अशी पुढची चिंता करते पण त्यामध्ये एक दोघे असेही असतात जे चटकन गाडीतून उतरून गडू चेक करतात तर कोणी गॅरेज पर्यंत पोहचण्याचा मार्ग काढतात.. आणि जेव्हा ते त्यामध्ये यशस्वी होतात तेव्हा त्यांचं सगळे कौतुक करतात..

जर इतरांना कौतुक वाटतं असेल तर अशावेळी त्या व्यक्तीला स्वतःबद्दल किती आनंद मिळत असेल.. किती अभिमान वाटत असेल.. हे उदाहरण झाले पण आपल्या आयुष्यात असेच आपले प्रश्न आपण एकट्याने सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपली अडचणींना सामोरं जाण्याची जिद्द वाढत जाते..

कोणाकडून आपण अपेक्षा न करता आपणच आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणात पुढाकार घेतला म्हणजे शेवटी स्वतःच स्वतःला सांभाळून घ्यायचं हे ठरवलं तर आपल्यात एक वेगळच समाधान आपल्याला सापडेल..

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “एक लक्षात घ्या, शेवटी स्वतःच स्वतःला सांभाळून घ्यायचं असतं.”

  1. Divya Kudtarkar

    आजचा लेख स्वतःच स्वतःला सांभाळून घ्यायचं खूप छान होता. कोणावर अवलंबून राहील की समोरच्याला पण त्रास होतो आणि स्वतःला पण. एकटं आनंदी राहता आले पाहिजे.
    तुमचे सगळेच लेख खूप छान असतात

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!