डोळ्यातलं पाणी आणि त्या मागची कहानी प्रत्येकाला सांगत बसू नका, जिद्दीने जगा!
आपण कोणाशी सहज बोलतो.. आपल्या मनातलं सांगतो.. यातून आपल्याला काय मिळते तर आपल मन हलक होते अस आपल्याला वाटते.. आणि ते तेवढ्या पूर्ती ठीक सुद्धा आहे.. कारण मनात विचारांचं ओझ आणि उत्तर न मिळालेले प्रश्न असतील तर गोंधळ हा प्रत्येकाचा होतो आणि होतो च.. कोणाशी बोलल्यानंतर कदाचित काही मार्ग मिळेल अशी आपण आशा करतो आणि त्यांना आपल्या मनातलं सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करतो… आणि नक्कीच असा प्रयत्न प्रत्येकाने करावा.. कारण विचारांची घालमेल मनात सुरू ठेवली तर कोणत्याच क्षणाला मोकळं जगता येणार नाही..
पण अस कोणी पाहिजे जे आपल्या मनातलं ऐकून आपल्या हिताचा विचार करतील.. आपल्याला योग्य मार्ग दाखवतील.. आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे तेसुद्धा शोधण्याचा प्रयत्न करतील.. आपल्या न सापडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्यासोबत ते सुद्धा शोधायला मदत करतील.. नाहीतर असे सुद्धा लोक आपल्याला भेटतात की जे कायम आपल्यासोबत आहेत अस आपल्याला भासवतात.. आपली साथ देत आहेत असा आपल्याला विश्वास देतात आणि तस काही करत नाहीत.. आपल्या फायद्याचा ते विचार करतात अस आपल्याला ते दाखवतात पण मुळात मात्र ते त्याचं मतलब साधतात…
आता असे लोक आपल्या आजूबाजूला असतील किंवा नसतील सुद्धा.. पण जर आपण आपल्या आयुष्याचे धनी आहोत तर मग कोणत्याही क्षणी आपण दुसऱ्यांवर का विसंबून राहाव..
आज आपण एकदा कोणाला आपल दुःख सांगू.. दुसऱ्यांदा सांगू तर ते ऐकतील पण नेहमीच आपण आपली दुखभरी कहाणी त्याला सांगायला जाऊ तर तो ऐकून दुर्लक्ष करेल.. आणि जरी कोणी आपलं सतत रडगाण ऐकत असेल आपल्याला साथ देत असेल तर आपल्याला कायमच त्याच्यावर अवलंबून राहण्याची सवय लागते.. मग ती व्यक्ती सतत आपल्यासाठी available असेल तर ठीक नाहीतर आपली पंचायत होते आणि आपण स्वतः कधी उभ राहण्याचा प्रयत्न करत नाही…
स्वावलंबी कोणाला म्हणतात.. जो कोणावर अवलंबून नाही त्यालाच.. मग ते रोजच रूटीन असो किंवा आयुष्याचे कोणतही वळण असो.. आपण जस कामांच्या बाबतीत स्वावलंबी राहिल्यावर त्याचा फायदा आपल्याला होतो आपल कुठेच कधी अडत नाही अगदी तसच आपण आपल्या आयुष्यात सर्वच बाबतीत जास्तीत जास्त स्वावलंबी राहील की त्यामुळे आपल्यालाच त्याच समाधान मिळते..
आज आपण जर आपली दुःख इतरांना सांगत बसलो तर कोणी त्यातून सावरायला मदत सुद्धा करेल तर कोणी आपल्याला मागून हसेल.. कोणी आपण सांगितलेल्या गोष्टींचा चुकीचा फायदा सुद्धा घेऊ शकते.. कोणी आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावून सगळ्यांसमोर आपली चुकीची प्रतिमा बनवू शकते.. तर कोणी आपल्याच माणसांना आपल्यापासून दूर करू शकते…त्यापेक्षा जर आपण आपल्या दुःखाचा बाजार न मांडता आपल्याला जमतील ते प्रयत्न करून स्वतः उभ राहण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्यासाठी कायम सज्ज असू..
आपल्या डोळ्यात अश्रू बघून आपल्याला कोणी मदत करेल अशी आपण अपेक्षा करत असू तर नक्कीच आपण कमजोर पडू.. त्यापेक्षा आपले अश्रू आपणच पुसून स्वतःच स्वतः ला भक्कम आधार दिला तर नक्कीच आपली ताकद वाढत जाईल..
जगायचं असेल तर दुसऱ्या कोणावर अवलंबून आपण आपल सुख न मिळवता आपणच आपल दुःख बाजूला सारून… आपली प्रश्न आपणच सोडवून.. आपल्या चिंता आपणच मिटवून जगायचं.. आणि अस जगण्यात जो आनंद आहे तो कोणाची सहानुभूती मिळवून जगण्यात नाही…
आपल्याला जगायचं असेल तर स्वतः जिद्दीने जगायचं.. सतत दुसऱ्याच्या मदतीची साथ मागण्यापेक्षा स्वतःच स्वतःची इच्छाशक्ती वाढवा..
आपण काय करू शकत नाही असा विचार डोक्यात आणण्यापेक्षा आपल्याला अशक्य अस काहीच नाही हे मनाशी पक्कं करा.. जगताना स्वतःच जिद्दीने जगायचं ज्यामुळे मागे कोणी हसणार नाही आणि आपलाच आपल्याला अभिमान वाटेल.
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

