Skip to content

कोणावरच नाही स्वतःवरच मी नाराज आहे, माझ्या या अवस्थेचे मीच एकमेव कारण आहे.

कोणावरच नाही स्वतःवरच मी नाराज आहे, माझ्या या अवस्थेचे मीच एकमेव कारण आहे.


जेव्हा आमची नुकतीच ओळख झालेली तेव्हा त्याच्या वागण्यावरून त्याचा स्वभाव ओळखण्याचा मी प्रयत्न केला आणि तिथेच माझी चूक झाली हे मला तेव्हा कळलंच नाही.. आज मात्र माझ्या आयुष्यात मागे पाहिल्यावर मी कळत नकळत केलेल्या चुका माझ्या लक्षात येतात तेव्हा फक्त आणि फक्त डोळ्यात अश्रू येतात…

आपण जेव्हा प्रेमात पडतो त्यावेळी आपल्याला आपण दोघं आणि आपल्यातलं प्रेम या पलीकडे काही पाहण्याची गरज वाटत नाही.. अर्थात तेवढी आपण सवड सुद्धा काढत नाही.. एकमेकांशी सतत फोनवर बोलणं.. भेटणं.. कधी पिक्चर तर कधी चौपाटी .. हल्ली तर पूर्वीसारखं कोण आपल्याला बघेल आणि घरी सांगेल याची भीती सुद्धा नाही राहिली मुळात असे बरेच पालक आहेत ज्यांनी मुलांना मोकळं ठेवलं आहे… आणि त्यापैकीच मी एक.. म्हणून माझं आयुष्य तर बंधनरहित होत..

कधी वाटेल तेव्हा मनाला आनंद मिळेल ते करायचं.. कधी शॉपिंग तर कधी मित्रमैत्रिणींसोबत कुठेही फिरायला जायचं.. आणि अशातच कधी त्याच्या प्रेमात पडले कळलं नाही. . एक मित्र म्हणून तो नेहमीच माहितीत होता.. पण नंतर आमच्यात त्या पलीकडचं नात निर्माण झालं.. त्याची एक सवय होती बिनधास्त जगण्याची आणि मला तिचं सवय आवडली..पुढचं कोणी पाहिलं आहे आज मस्त जगुयात… हे त्याच नेहमीच वाक्य..

पण आज जगताना त्याची वाईट झळ पुढच्या क्षणाला सुद्धा नको हे मला त्यावेळी उमजलच नाही.. कारण मी प्रेमात होतीना..

प्रेमात असताना जिथे निष्पाप मन असते तिथे पूर्ण विश्वास असतो माझं सुद्धा तसच होत.. मला कधीच त्याच्यावर अविश्वास वाटला नाही मुळात तो कधी मला शंका येईल अस माझ्यासमोर कधी वागलाच नाही.. माझे अनेक मित्र मैत्रिणी मला सांगायचा प्रयत्न करायचे की अग तो तुला जसा वाटतो तसा नाहीये.. पण मी मात्र जे मला सांगतात त्यांचाच राग केला…

यांना आमचं चांगल नात बघवत नाही.. असा चुकीचा ग्रह करून मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची.. अग आज तुला आमचं बोलणं खटकते पण उद्या मात्र तुला पच्छाताप होणार नाही आमचं ऐक.. अस मला जे सांगायचे त्यांचं बोलणं मी कधी मनावर घेतलंच नाही..

मनमोकळी बिनधास्त वागत गेली.. घरच्यांनी काही विचारलं तरी मित्र म्हणून सांगितलं की ते सुद्धा जास्त चौकशा करत नव्हते मात्र एवढं नक्की बोलायचे की तुझ्या आयुष्याची चावी तुझ्याच हातात आहे.. ते कस घडवायचं आणि कस बिघडवायच हे तूच ठरवू शकतेस आम्ही फक्त तुझी साथ देऊ..

आणि त्यामुळेच मला मोकळं उडायला पंख मिळाले होते.. खर तर मलासुद्धा माहीत नव्हतं की मला कधी वाईट धक्का बसणार आहे… आजच्या काळात वावग अस नाही हल्ली तर अगदीच common झालंय अस समजत त्याच्यावर विश्वास ठेवत मी माझी सगळी बंधन तोडून मोकळी झाली.. पण तो त्याचा गैरफायदा घेईल हे मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं..

आणि जे कधी अपेक्षित नव्हत.. घडायला नको होत तेच घडलं.. त्याने माझ्या विश्वासाचा फायदा घेतला.. आणि त्याला हवं असलेलं मिळाल्यावर त्याने माझ्याशी असलेलं नातं तोडल मी त्याला समजवायचा प्रयत्न केला पण विनवण्या करून जोडलेलं नात किती काळ टिकणार होत.. आणि ज्याच्या स्वभावातच फसवणूक असेल तो मला आयुष्याची साथ देईल असा विश्वास मी कसा ठेवू म्हणून मी पुन्हा कधी त्याच्याकडे वळून सुद्धा नाही पाहिलं..

आज मी आणि माझ्यासारख्या मुली असच वागून स्वतःच्या आयुष्याची वाट लावतात.. आयुष्यभर लक्षात राहील अस दुःख स्वतःच ओढवून घेतात..
प्रेम प्रेम म्हणत इतकं वेड होतात की सत्य जाणून घेण्याची दृष्टी जवळ ठेवतच नाही..

मला आज जे दिसतेय तेच खर मानून त्याची काहीच शहनिशा न करता चुकीचे निर्णय घेतात.. आपल्याला कोणी आपल्या हिताचं सांगितलं की तेव्हा ते पटतच नाही.. पण अस नको वागायला..

प्रेम होते प्रेमात पडतो आपण पण त्यामध्ये डोळस राहील तर नक्कीच आपण फसलो जाणार नाही.. काहीही निर्णय घेताना आजचा क्षणिक आनंद बाजूला सारून त्याचे उद्यावर उमटणारे पडसाद लक्षात घेऊन तसे निर्णय घ्यावे.. जे सुख आपल्याला आज मिळतेय ते पुन्हा कधी मिळेल की नाही असा विचार करण्यापेक्षा आज मिळालेलं सुख कायम टिकून राहील की नाही याची खात्री करून तस वागल की नक्कीच भविष्यात कपाळावर हात मारण्याची वेळ येत नाही.. आपल्याला अनेक जण चांगले सल्ले देतात पण आपण त्यावेळी त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यापेक्षा ते जे काही म्हणतात त्याची पडताळणी केली तर फायदा हा आपलाच असेल…

मुळात नात हे खर असेल तर पुढे कोणताच त्रास नसतो.. पण नात्यात एक खरं वागणारा आणि एक फसवणूक करणारा असेल तर त्या नात्याला काही अर्थच उरत नाही.. मुळात त्याला नातच म्हणत नाही..

आज मी कोणालाच दोष देऊ शकत नाही अगदी त्या मुलाला सुद्धा कारण माझ्या आयुष्याचे निर्णय माझ्या हातात होते पण मीच तिथे चूक केली.. म्हणून आज मी स्वतःवर नाराज आहे आणि आज या अवस्थेची मी एकमेव कारण आहे अस मी मानते..

जे घडल ते मला बदलता येणार तर नाही.. पण आयुष्यात पुढची वाटचाल करायची नाही असा चुकीचा निर्णय मी घेणार नाही.. मात्र यापुढे मी आजच आयुष्य जगताना .. आजचा आनंद मिळवताना.. तो क्षणिक समाधान देणारा तर नाहीना याची खात्री करेल.. आणि उद्या त्रास होईल असे आजचे निर्णय मी घेणार नाही…

पुष्कळदा आपण जगणं सोडून देतो. नैराश्याच्या गर्तेत पूर्ण स्वतःला अडकून ठेवतो. पण हा दबाव हळु हळु शिथिल होत जाणार. फक्त आशावाद कायम टिकवून ठेवायला हवा.

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!