Skip to content

नोकरी न करणारी स्त्री सुद्धा कर्तुत्ववान असते, हे अनेक पुरुष विसरतात.

नोकरी न करणारी स्त्री सुद्धा कर्तुत्ववान असते, हे अनेक पुरुष विसरतात.


ऑफिस मध्ये झालेल्या कार्यक्रमाचे फोटो जेव्हा त्याने बायकोला दाखवले.. तेव्हा ती बोलली की अरेवा छान कार्यक्रम झाला आहे.. पण यात तर सर्व जोडीने आलेले दिसत आहेत आणि तुम्ही एकटेच.. मला तर तुम्ही काही बोलला नाहीत…

यावर जरा वेगळ्याच सुरात तो म्हणाला.. त्यांच्या सर्वांच्या बायका चांगल्या नोकरी करत आहेत.. तुझ्यासारखी एकपण नाही.. घरी बसून राहणारी..

त्यावेळी तिने नवऱ्याला उत्तर दिलं…सकाळी उठल्यापासून झाडलोट.. सर्वांच्या हातात चहा नाश्ता द्यायचा.. स्वयंपाक.. भांडी.. कपडे.. पुन्हा संध्याकाळी चहा नाश्ता.. रात्रीच जेवण एवढंच तर करते प्रत्येक बाई घरात राहून करते बाकी तर आरामच अस तुम्हाला वाटत असेल.. पण त्यासोबतच मुलांची काळजी घेणं.. त्यांचा सतत पसारा आवरणे.. त्यांच्या आवडीनिवडी पाहून त्यांना जेवण सोडून अजून सुद्धा वेगवेगळं खायला करणं.. त्यांचं सू शी.. घरातील मोठ्या माणसांच्या हातात सर्व देणं.. भाजी आणायला जायचं.. घरात काय आहे काय नाही याकडे व्यवस्थित लक्ष देणं.. घरात सतत स्वच्छता ठेवणं..

सिलेंडर बुक करण्यापासून मुलांच्या फी कडे लक्ष देणं.. तुमचे पैस वाचावेत म्हणून मुलांना शाळेत सोडायला जाणं..मुलांचा अभ्यास घेणं.. त्यांना चांगल्या सवयी लावणे. .. त्यातल्या त्यात येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याच आदरतिथ्य करणं हे आणि या पलीकडेही अनेक काम घरात राहून मी आणि माझ्यासारख्या सर्वच स्त्रीया करत असतात..

तुम्हाला सोप वाटत असेल बोलायला पण जशी नोकरी करणारी स्त्री ही तारेवरची कसरत करत असते.. तशीच घरी असणाऱ्या स्त्री ची सुद्धा कमी धावपळ नसते.. नोकरी करणारे कमवत असतील पण घरात राहणारी स्त्री काटकसर करून अनेक adjustment करून पैसा वाचवते..

हा तुमच्यासाठी लाजेची गोष्ट असेल ही की तुमची बायको नोकरी करत नाही घरीच असते … पण आज तुम्ही तुमचं काम मन लावून करता कारण घरात राहून पोरांची काळजी मी घेते.. घरात आई वडिलांची सुद्धा काळजी मीच घेते..

आज तुमची माणस तुमच्याजवळ आहेत कारण घरी राहून त्यांचं आदरतिथ्य मी करते..

तुम्ही कामावर जाता.. एकदा नाष्टा केला की डब्बा घेऊन जायचं आणि संध्याकाळी आल्यावर आराम करायचा.. पण मी तुमच्या आधी उठून सर्व आवरायला सुरुवात करते ते सगळे झोपल्यानंतर सगळी कामं आवरून त्यानंतर झोपते..

तुम्हाला काम असल्यामुळे मुलांना वेळ द्यायला जमत नाही म्हणून सतत त्यांच्याशी गप्पा मारणं.. त्यांना खेळवण.. त्यांच्याशी छान संवाद साधन याकडे सुद्धा माझ लक्ष असते..

सगळं मी करते म्हणून त्याचा मोठेपणा मी मिरवत नाही पण तुम्हाला कळाव म्हणून आज हे सगळं बोलली..

आज मी सुद्धा नोकरी करू शकते.. मी सुद्धा शिकलेली आहे.. पण घरात सर्व जबाबदाऱ्या सांभाळत मी यात गुंतून गेले आहे..सध्या तरी मुलांना कळत नाही तोपर्यंत मी घरीच राहील..मूल थोडी मोठी झाली की मी सुद्धा नोकरी करेन..

पण घरात राहणारी स्त्री म्हणजे काही विशेष करत नाही हे जे तुमचं म्हणणं आहे ते मात्र साफ चुकीचं आहे.. तीच सुद्धा कर्तुत्व आहे.. पूर्ण दिवस ती सुद्धा धावपळ करते.. प्रत्येक यशस्वी नवऱ्याच्या मागे एका स्त्रीचा हात असतो अस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या स्त्रियांपैकी नोकरी न करता घरी राहणारी स्त्री सुद्धा येतेच..

आज ज्यांची मूल उच्च पदवीधर आहेत.. उत्तम संस्कारी आहेत.. ज्या मुलांचं कौतुक जग करतेय त्यांची आई सुद्धा नोकरी न करता घरी राहून त्यांना घडवणारी असेलच..

सगळ्यांची मन जपून.. सगळी नाती सांभाळून.. प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपत .. स्वतःकडे दुर्लक्ष करत सर्वांना आनंदी ठेवण्याचा जीचा प्रयत्न असतो ती एक नोकरी न करणारी स्त्री असेलच..

नोकरी करणं म्हणजे विशेष असेल पण नोकरी न करता कुठलाच मोबदला न मिळवता सर्वांची काळजी घेऊन सेवा करून सुद्धा आनंदी राहणारी स्त्री ही नक्कीच विशेष आहे…

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!