दुःखांना सतत कवटाळून राहणाऱ्यांनो.. हा लेख तुमच्यासाठी!
मी माझ्या बहिणीच्या घरी गेली असता नुकतेच तिकडे एक कुटुंब राहायला आले आहेत आणि त्यादिवशी त्याच कुटुंबातील एका तलहानशा मुलाला बघून त्याच्याबद्दल मला अभिमान वाटला आणि त्यासोबतच त्याने मला एक वेगळीच शिकवण दिली…
आपल्याला कोणालाही लाजवेल अस त्याच वागणं होत.. आपण नेहमी ऐकतो पण ऐकून विसरून जातो पण जेव्हा मी प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा मात्र माझ्या आयुष्यात कधीही न घेतलेला अनुभव मला मिळाला…
असा एक मुलगा..ज्याला मी पाहिलं आणि कायमच लक्षात राहील असा त्याने स्वतःचा ठसा माझ्या मनावर उमटवला.. ज्याला पाय नव्हते.. अगदी जन्मतःच नव्हते अस नाही.. अगदी सामान्य मुलांसारखा तो सुद्धा होता… पण एकदा घडलेल्या अपघातामुळे अगदी लहान वयातच त्याचे दोन्ही पाय गेले.. त्याच्या आईने मला सांगितलं..लहान असताना आम्हीच त्याचा आधार होतो …पण जसजसा तो मोठा होत गेला तस त्याने स्वतःच स्वतःला आधार देण्याचं ठरवलं.. त्याचे त्यासाठी प्रयत्न सुरू झाले.. कारण त्याच ध्येय होत की इतका चांगला अभ्यास करायचा की स्कॉलरशिप मिळवून उच्च शिक्षण घ्यायचं आणि एक उत्तम पदाधिकारी व्हायचं.. आणि त्यासाठी तो मनापासून अभ्यास करायचा.. लेखन वाचन यात सतत तो रमलेला असायचा..
त्याला बुद्धिबळ हा खेळ खूप आवडायचा.. पूर्ण स्थिर डोक्याने शांत चित्ताने खेळावा लागणारा हा खेळ.. शाळेत असणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये त्याने बुद्धिबळ स्पर्धेत अनेकदा बक्षिस मिळवले.. पण तो खेळ बाजूला सारून तो जास्तीत जास्त अभ्यास करायचा..
अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्याला अनेक महिने काहीच करता येत नव्हत.. जेवण..गोळ्या औषध.. चेक अप.. आराम हेच त्याच दिवसक्रम झालं होत.. आम्हाला तर त्याला सांभाळायचं की त्याला होणारा त्रास पाहून स्वतःला समजवायच हेच कळेनासे झाल होत पण त्याला कमजोर पडू द्यायचं नाही म्हणून आम्ही त्याच्यासाठी कायम उभे राहिलो..
आणि एक दिवस असा आला की त्याने त्याचा दिनक्रम बदलण्याचं ठरवलं.. मला अस नुसतं पडून नाही राहायचं.. तुम्ही मला आधार देतात पण मला स्वावलंबी व्हायचं आहे.. मला रडत बसायचं नाही.. दुखणं आणि माझं अपंगत्व कवटाळून बसायचं नाही.. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे..
सध्या मी कुठे जाऊ शकत नाही.. पण या वेळेत मी मला स्वतःला वेळ देईल.. माझं वाचन.. माझा अभ्यास वाढवून मी पुढच्या परीक्षा देईल.. अस त्याने स्वत:शीच पक्क केलं .. आज तो परीक्षेची तयारी करत आहे आणि त्यासोबतच बुद्धिबळ खेळाच्या उच्च स्पर्धेत सुद्धा तो सहभाग घेऊन त्यामध्ये बक्षिस मिळवत आहे.. आज भलेही त्याला पाय नसतील पण त्याच्याकडे त्याचा आत्मविश्वास आहे.. त्याची जिद्द आहे.. तो सध्यातरी दिवसभर माझ्या नजरेसमोर असतो पण तो कोणत्याच क्षणाला खचलेला वाटत नाही.. दुःख करत बसत नाही.. त्याने त्याच्या आयुष्यात कधी कल्पना सुद्धा केली नसेल अस दुःख त्याच्या वाटेला आल पण तरीही ते दुःख त्याने त्याच्या कुशलतेने बाजूला सारून स्वतःला अभ्यास आणि आवड म्हणून बुद्धिबळ खेळात रमवून घेतले आहे..
आणि खरचं त्याच्या आईच्या डोळ्यात तेव्हा हे सगळ सांगताना दुःख नव्हत तर अभिमान होता.. मी ज्यावेळी त्याला भेटली त्यावेळी तो इतर मुलांना शिकवत होता..
आपल्याकडे कला असेल तर आपल्याला जगण्यासाठी त्या कलेच्या जोरावर रोजगार मिळो अथवा न मिळो पण ती कला मात्र आपल्याला जगायचं कस हे नक्की शिकवू शकते..
आज आपल्याकडे काय नाही.. सगळं असूनसुद्धा अगदी लहानसहान कारणाने सुद्धा आपण लगेच नाराज होतो.. सतत अगदी महत्वाचं नसलं तरी माझं दुःख.. माझा त्रास करत डोक्यावर आणि चेहऱ्यावर उदासिनतेच ओझ घेऊन फिरत असतो…
पण त्यादिवशी मात्र त्याच्या चेहऱ्यावर जो उत्साह होता तो बघून मला माझी काय तर जगातली सर्व दुःख क्षुल्लक वाटली.. आपण छोट्याश्या कारणाने क्षणातच जगून मेल्यासारखे वागतो.. पण खरचं जगावं तर असच ज्यामुळे स्वतःला आनंद मिळेल.. जगण्याची जिद्द अजून वाढली पाहिजे..आणि इतरांना हेवा वाटेल.. आणि तो मुलगा आज मला जगण्याचा नवीन दृष्टिकोन देऊन गेला.. की आपल्याकडे काय नाही हे बघत रडण्यापेक्षा तिथेच न थांबता आपल्याकडे काय आहे हे ओळखून पुढे जायचं.. ज्यामुळे आपण कुठे न अडकता आपल ठरलेलं ध्येय सहज गाठू शकतो..
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

