तुम्ही एकटे आहात हा विचार मनात येऊ न देण्यासाठी हे करा.
आपण लहानपणी आई वडिलांच्या सानिध्यात जास्त असतो.. कुटुंबाच्या सोबत राहून आपण लहानाचे मोठे होतो.. शाळेत.. कॉलेज मध्ये मित्र मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला लागतो.. कामाच्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्यासोबत जे सहकारी असतात त्यांना आपले मित्र बनवतो.. अगदी येता जाता बस असो नाहीतर ट्रेन आपण तिथेसुद्धा आपले मित्र बनवतो…
आपल्याला लहान असल्यापासून मोठे होईपर्यंत कायम कोणासोबत राहण्याची सवय असते.. पण आपल्यावर कधी अशी सुद्धा वेळ येते जेव्हा आपण एकटे आहोत हे आपल्याला जाणवते…
कस आहे अनेकदा गर्दीत राहून सुद्धा एकटेपणाची भावना जी असते तिचा अनुभव कोणाला कधीही येतोच… सगळे आपलेच जरी असले तरी प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यात.. स्वतःच्या जबाबदाऱ्या.. कर्तव्य.. विचार .. यामध्ये व्यापलेला असतो. प्रत्येकवेळी सगळ्यांना आपल्यासोबत राहायला.. आपल्याशी बोलायला.. आपली सुख दुःख ऐकायला वेळ मिळेलच असं नाही.. कोणी नकळत आपल्याला एकट सोडत तर कोणी जाणीवपूर्वक..
आपण जीवनाच्या ज्या टप्प्यावर आहोत त्या टप्प्यावर आपल्याला कोणीही सोडून गेलं.. आपल्याला एकट वाटल तरी तिथेच आपण एकटे आहोत हा विचार मनात ठेवून आपण स्वतःला कमजोर करतो म्हणून आपण अशावेळी काय केलं पाहिजे तर…
१) आपण जेव्हा गर्दीत असतो.. तेव्हा आपल्याला स्वतसाठी वेळ मिळत नाही.. स्वतः शी बोलायला.. स्वतःचा विचार करायला.. मग जर आपल्यासोबत कोणीही नसेल तर अरेवा आजपासून मी स्वतःला चांगलाच वेळ देईल आणि स्वत:शीच चांगला संवाद साधून माझं चांगल कशात आणि वाईट कशात हे ठरवेन .. मी काय केलं पाहिजे.. मला काय काय करता येईल याचं मी छान नियोजन करील असा एकदम सकारात्मक विचार आपण केला पाहिजे.
२) आपल्यासोबत असणारी माणसं कायम आपल्या फायद्याचं पाहत असतील किंवा नसतील याबद्दल खात्री कोणाला असते.. त्यापेक्षा आपल फायद्याचं काय आपल नुकसान कशात आहे हे आपण स्वतः जास्त समजू शकतो.. म्हणून कोणाचे सल्ले घेण्याची आपल्याला सवय असेल तर ती बाजूला ठेवून आपणच आपले निर्णय घेण्याची सवय अंगी लावावी.. कारण आयुष्यभर तर आपण सल्ले घेऊन जगणार नाहीत.. मग आज का..?? अस स्वतःलाच विचारायचं आणि पुढे जायचं.
३) स्वावलंबी होण काळाची गरज आहे.. कारण आपण ज्यांच्यावर अवलंबून आहोत ते कायम आपल्यासोबत असतीलच असं नाही. आपली काळजी घ्यायला.. आपल संरक्षण करायला.. आपली जबाबदारी घ्यायला.. आपले निर्णय घ्यायला.. आपण स्वतः शिकल पाहिजे..
४) सतत कोणाची सोबत गरजेची वाटत असेल पण आपल्या सोबत कोणी राहत नसेल तर अशावेळी एकच विचार करायचा की चुकीची सोबत असण्यापेक्षा एकट राहिलेलं केव्हाही उत्तम..
५) एकट राहिल्यावर नकोते विचार येत असतील.. जास्त इमोशनल वाटत असेल.. तर आवडीचे गाणे ऐकावी.. जास्तीत जास्त विनोदी चित्रपट पाहावे.. आणि नाहीच तर अशावेळी घरातून बाहेर पडा आणि बाहेरच्या जगातून शिकण्याचा प्रयत्न करा.. असे अनेक लोक दिसतील जे एकटे फिरत आहेत.. एकटे जगत आहेत.. एकटे जबाबदारी स्वीकारून सगळं काही सांभाळून आनंदी आहेत.. फक्त बघण्याचा आणि शिकण्याचा दृष्टिकोन सोबत हवा..
६) एकट कोण नाही जगत.. उलट एकट राहिल्याने पुढे जाण्याची जिद्द अजून वाढली पाहिजे.. आपल्याला कोणी साथ देत नसेल तर मी स्वतः जास्तीत जास्त प्रयत्न करून काही करण्याचा प्रयत्न करेल अस स्वतःशी ठाम बोलून ते करण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे.
७) पोटासाठी काम करायचं कारण ते गरजेचं आहे पण त्यासोबत एक कला मात्र नक्की जपायची.. कारण ती कलाच आपल्याला जगण्याचा आनंद देते.. आपण कितीही एकाकी असलो तरी कला मात्र आपली नक्कीच साथ देते.. तिच्यात आपला वेळ सुद्धा सहज जातो तसेच आपल्याला आनंद आणि समाधान मिळते..
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


अतिशय सुंदर मनाला धीर देणारा लेखव मार्गदर्शन