Skip to content

माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणे जास्त महत्त्वाचं वाटायला हवं.

माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणे जास्त महत्त्वाचं वाटायला हवं.


अरे तो एक मुलगा आलेला घरी.. तुझ्या शाळेत होता म्हणे.. पण किती चांगला आहे मुलगा.. खूप मस्त बोलत होता.. दिसायला सुद्धा बरा होता पण माणुसकी जपणारा वाटला….

आईच्या या बोलण्यावर राहुल हसत म्हणाला अग आई.. तो सागर .. तुला एकदा सांगितलं होत ना मी.. त्याने लग्न करून बायकोला फसवल.. त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत.. आणि इतकं सांगून सुद्धा तुला तो चांगला वाटतो.

अरे राहुल.. पण मी त्याला आज किती वर्षांनी भेटली.. पण त्याच्या वागण्या बोलण्यातून तो अस काही वागत असेल अस वाटलच नाही..

अग आई तू तर साधीच आहे तुला काय कळणार आजच्या काळात लोकांचं वागणं कस झालंय.. तुला माणसं जोडण्याची सवय आणि तुझ्यासारखी सवय बहुतेकांना असतेच.. पण आजच जग मात्र पूर्वीसारखं खर नाहीना राहील..

आज जिथे बघावं तिथे बनावट असते.. आणि आज ही बनावट माणसांमध्ये उतरली आहे.. कोणाशी कस आणि काय बोललं की समोरचा आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवतो याचा चांगलाच अभ्यास करून समोर येणाऱ्या माणसांचे स्वभाव ओळखून त्यांना कस आणि किती लवकर आपल्या बोलण्यात अडकवून फसवता येईल याचा हल्ली जिथे तिथे प्रयत्न सुरू असतो..

अग आई मी त्याच म्हणून नाही बोलत ग.. तो नवरा म्हणून चुकीचं वागत असेल पण इतर नात्यात चांगला असेल सुद्धा .. आणि प्रत्येक व्यक्ती वाईट.. आपल्यासमोर येणारा प्रत्येक माणूस आपली फसवणूक करेल अस सुद्धा नाही.. कोणी चांगल असते तर कोणी मतलबी..

वरवर कोणी चांगल हसल बोललं की आपल्याला लगेच ती व्यक्ती खूप चांगली वाटते.. पण आपल्याला कळतच नाही की हल्ली जिथे तिथे दिखावा चालू आहे.. पण जस दिसते तस असतेच असं नाही..

आपण माणस जोडतो.. त्यांना जवळ करतो.. पण तेच माणस कधी आपला घात करतील सांगता येत नाही.. कोणी जोडीदार निवडताना फसते त्यांना वाटते की आपला जोडीदार आज जसा आहे.. जसा आपल्याशी वागतोय तोच त्याचा मूळ स्वभाव.. पण लग्न झाल्यावर त्याचा खरा स्वभाव कळतो तेव्हा त्यांना पश्चाताप होतो.. कोणाला नोकरी देताना चांगल बोलतात मात्र नंतर माणूस कित्येकदा फसतो.. कोणाला प्रेमात दगा मिळतो तर कोणाला आपलीच माणसं अचानक सोडून जाण्याचा धक्का बसतो… असे एक ना अनेक उदाहरणं आपण आजूबाजूला पाहतो आणि स्वतः अनुभवतो देखील..

राहुलच्या या बोलण्यावर त्याची आई त्याला विचारते की आमच्या काळात घडत होत हे सगळं पण एवढ्या प्रमाणात नाही जितकं आज चालू आहे.. कारण तेव्हा सरळ वागणारे होते.. म्हणून कोणाशी ठरवून काही वागण्याची गरज नाही जाणवली..

आणि तूच सांग की कस वागावं या काळात माणसाने.. यावर राहुल बोलला की अग आई अस ठरवून तर कोणाला कधी वागता येत नाही पण काही वागण्या बोलण्या आधी प्रत्येकाने विचार मात्र नक्की करावा.. कोणताही निर्णय घेताना मागचा पुढचा विचार करावा..

दुसऱ्याच्या वागण्याची आपण खात्री देऊ शकत नसलो तरी आपण नक्कीच अस राहाव की आपल्या आयुष्यावर दुसऱ्यांच्या कोणत्याही कृतीचा काही फारसा फरक पडणार नाही..

आजच्या या काळात प्रत्येकाने कोणालाही जवळ करताना.. कोणावर विश्वास ठेवताना.. कोणाचं काही ऐकताना.. कोणालाही काही सांगताना.. इतकी काळजी नक्की घ्यावी की त्याचा त्रास आपल्याला होणार नाही.. त्या व्यक्तिपासून आपल्याला वर्तमानात आणि पुढे भविष्यात सुद्धा कोणता त्रास होणार नाही.. कारण कोण.. कधी.. कस वागेल सांगता येत नाही म्हणून काहीवेळेस माणस नाही जोडता आली तरी चालेल पण माणसांची पारख करण्याचा प्रयत्न आपण नक्की केला पाहिजे..

माणसांचा घोळका आजूबाजूला प्रत्येकाला हवा असतो पण या गर्दीत कोण आपल आणि कोण परक हे कळून घ्यायचं असेल तर आधी माणस ओळखता आली पाहिजे..

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!