तुम्ही खूप सुंदर आहात हे आधी स्व उडतःला कळू द्या.
हल्लीच जग म्हणजे स्पर्धा आहे.. पण ही स्पर्धा कोणाची आणि कशाची तर फक्त शिक्षण .. पैसा.. नोकरी.. status याचीच नाही तर दिसण्याची सुद्धा आहे.. आता यात काही वेगळं नाही ती तर पूर्वीपासून चालत आली आहे.. आता काय नवीन नाही तेच तर आहे असं आपण बोलतो पण खरच तस आहेका…???
आता पडद्यावरील कलाकारांचा भाग वेगळाच आहे.. त्यांना त्यांची कला सादर करताना पैसा कमवायचा असतो म्हणून स्वतःच दिसणं..वागणं यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागते.. पण आपल काय हो… आपल्यासारख्या सामान्य माणसांची सुद्धा ही वेगळीच चढाओढ सुरू आहे..
मी सर्वांपेक्षा जास्त सुंदर दिसावं म्हणून आपण नको नको ती कसरत करत बसलो आहोत.. गरज नसताना सुद्धा सतत पार्लर किंवा सलून मध्ये पळत राहणं.. कित्येकदा तर अस होते की घेतलेला ड्रेस एकदाच घालतो आणि पुन्हा तो घालण्याची इच्छा सुद्धा होत नाही पण तरीसुद्धा फॅशन. ट्रेण्ड यांच्या नावाखाली आपण मात्र शॉपिंग करतच राहतो…
यात काय चुकीचं अस नाही पण यामुळे आपल्याला स्वतःला किंवा आपल्या घरच्यांना मात्र आपला नक्कीच त्रास होतो.. कारण आपण आपला महत्वाचा वेळ नको तिथे खर्च करतो.. आपल्याला किंवा आपल्या घरच्यांना त्यांचा पैसा असा गरज नसलेल्या ठिकाणी वापरावा लागतो.. आणि त्याचे परिणाम म्हणजे एकतर जास्त मेहनत घेऊन जास्त कमवावे लागतात ज्यामुळे आपला मानसिक आणि शारीरिक स्ट्रेस वाढतो आणि जर आपण कोणावर अवलंबून असू तर त्यांचा त्रास वाढतो आणि आपल्या नात्यावर त्याचा परिणाम होतो.
आता एवढं सगळं करून जर आपण सुंदर दिसतो अस कोणी बोललं नाही…चारचौघात आपल कौतुक झालं नाही.. कोणी आपल्याला आपल्या सुंदरतेचे secret विचारले नाही… तर तिथेच आपण खर्च केलेला वेळ आणि पैसा सगळं शून्य होते आपल्यासाठी… आणि मग आपल्याला ना कशात समाधान मिळते ना कुठे आनंद…
खरं तर एवढं सगळं करायचं असेल तर नक्की करावं.. हवा तेवढा पैसा आणि वेळ नक्की खर्च करा पण कोणासाठी तर स्वतःसाठी… लोकांसाठी नाही..
कोणी माझं कौतुक करेल.. कोणाला मी आवडेल म्हणून जर आपण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असू तर आपल्याला तिथे क्वचितच आनंद मिळेल.. पण जेव्हा आपण स्वतःला आनंदी बघण्यासाठी प्रयत्न करत असू तर त्यासाठी आधी आपणच स्वतःची सुंदरता पाहायला हवी.. जेव्हा तुमचं मन तुम्हाला सांगेल की तू सुंदर आहेस तेव्हा तिथेच तुम्ही जिंकलात..
लोकांकडून कौतुकाची अपेक्षा करण्यापेक्षा आपण आधी स्वतःकडून म्हणजेच स्वतःलाच विचारून स्वतःला कळू द्या की तुम्ही खूप सुंदर आहात.. तेव्हाच त्यामधे मिळणार समाधान आणि आनंद तुम्हाला सापडेल..
आणि सुंदर असणं म्हणजे फक्त सुंदर दिसणं नाही तर विचारांनी आणि वागण्याने जो स्वतःचा चांगलाच ठसा उमटवतो तो सुंदर दिसणाऱ्या व्यक्तिलाही मागे टाकतो.. आणि त्याच्याजवळ जे समाधान असते ते समाधान लोकांकडे सापडत नाही तर ते समधान त्याच्या स्वतःच्या मनात असते…
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


लेख छान आहे
लेख खूपच छान आहे