ती.. तो.. आणि त्यांच्यातील एक वेगळा संवाद
अनिकेत : काय ग आज एवढी शांत का झालीस..??
सुचिता : काही नाही जरा थकलीये..
अनिकेत : काहीपण बोलायच म्हणून बोलू नकोस.. खर सांग काय झालंय तुला.. मी काय तुला आज ओळखतो..
सुचिता : अरे खरचं काही नाही.. मला शांत राहाव अस वाटते..
अनिकेत : पण का.?? एरवी मी घरात पाय ठेवत नाही तर तुझ्या गप्पा सुरू होतात.. आणि आजच अचानक तुला शांत राहाव अस का वाटते..
तुझी तब्येत तर ठीक वाटतेय पण काही त्रास होतोय का तुला ?? चल पटकन डॉक्टर कडे जाऊयात…
अनिकेतच्या या काळजीवर सुचिता च्या तोंडून काही उत्तर आले नाही.. ती फक्त त्याची नजर चुकवत डोळ्यातील पाणी लपविण्याचा प्रयत्न करत होती..
आणि अनिकेतच्या नजरेतून ते सुटले नाही..
अनिकेत : अग काय झालंय नक्की सांगशील का.. नाहीतर मला कस कळणार.. मी काही बोललो का तुला.. की दुसर कोणी काही बोललं तुला..
तेवढ्यात अनिकेतच्या लक्षात येते.. अरे हा आज माझी मैत्रीण आली होतीना घरी .. ती काही बोलली का तुला..???
यावर सुचीताने चटकन अनिकेत कडे पाहिलं..
अनिकेत : अच्छा म्हणजे माझं उत्तर हे आहे तर.. आता बोल काय झालं अग ती खूप बिनधास्त आहे तुला वाईट वाटेल असं बोलली का… काही भलत सलत बोलली नाहीना..
सुचिता : नाही ती मला काही बोलली नाही.. पण तिच्या बोलण्यातून मला शंका आली तुमच्या नात्यावर.. तुमचे जुने दिवस.. तुमचं दोघांचं एकमेकांशी असलेलं बिनधास्त नात… मित्र मैत्रीण म्हणवत होता पण ती काळजी त्या पलीकडची वाटली..
अस वाटल तू आजही माझ्यापासून काही लपवत आहेस..
अनिकेत : नाहीतर.. काहीपण कायग.. तू आज हे तिसऱ्यांदा विचारत आहेस.. आणि त्यावर माझं उत्तर नाही हेच ठाम राहील..
तूच सांग जर तस काही असत तर मी तुझ्या प्रेमात पडलो असतो का ग..
सुचिता : मला काही सुचतच नाही.. मी कितीही प्रयत्न केला तरी जेव्हा तुमचं काही ऐकते तेव्हा मी पुन्हा विचारत पडते..
कारण नात हे तेव्हा अवघड होते जेव्हा एकाकडून ते निभावलं जाईल.. पण आपण दोघेही एकमेकांशी आजही तसेच loyal आहोत जसे आधी होतो..
तू माझी इतकी काळजी घेतोस मला कधी माझाच हेवा वाटतो की मी किती नशीबवान आहे तुझ्यासारखा काळजी घेणारा.. माझ्यावर प्रेम करणारा.. विश्वास दाखवणारा.. मला माझ्या विचारांना जपणारा असा नवरा मला मिळाला आहे..
म्हणूनच मी आज शांत झाली की अस असताना सुद्धा नेहमी असे नको ते विचार माझ्या मनात का येतात..
अनिकेत : अग तू एकटीच नाही असा विचार करणारी.. बहुतेक जोडप्यांमध्ये याचमुळे वाद होतात.. नाती दुरावतात.. मन दुखावले जातात.. तर कधी एकमेकांपासून कायमचे नात तोडल जाते..
हा खरचं तस काही वावग वागणं दिसलं तर संशय येतो आणि त्यावर मोकळं बोलणं गरजेचं आहे.. आणि कोणी चुकीचं वागत असेल आपल्या जोडीदाराची फसवणूक करत असेल तर त्याला तिथेच स्पष्ट विचारून त्या नात्याचा विचार केला पाहिजेच..
पण आज जसा तू विचार करतेस तसा विचार करून .. काही नसताना सुद्धा नाती दुरावतात.. मन दुखावून नात्यातला गोडवा कमी होतो..आणि पूर्वीसारखं नात राहत नाही..
हे बघ जर आज मी माझ्या मैत्रिणीशी तुला आवडणार नाही असं बोलत असेल.. तुला खोटं सांगून तिला भेटत असेल.. तुला फसवत असेल तर तू संशय घेण स्वाभाविक आहे.. पण जर माझं तस काही वागणं नसेल तर मात्र तुझे विचार चुकतात..
लग्न झाल्यावर सुद्धा कोणीही मैत्रिणीशी किंवा मित्राशी गरजेपेक्षा जास्त जवळीक साधत असतील.. सतत त्यांच्याशीच बोलत असणार.. आपल्या जोडीदाराची काळजी घेत नसेल.. दुर्लक्ष होत असेल.. जोडीदाराच्या विचारांना.. मतांना महत्त्व देत नसतील.. नात फक्त formality म्हणून निभावत असतील.. तर अशावेळी त्या जोडीदाराला स्पष्ट विचारानं..त्या नात्याचा विचार करणं.. हे अगदी योग्य आहे..
पण जिथे यातलं काहीच वागणं नसेल तिथे जर सारखं तेच विचारलं जातं असेल मग अशावेळी मात्र काही नसतानाही नात्यात दुरावा वाढतो.. जोडीदाराशी काही बोलणं नकोस वाटते..काही चूक नसताना.. वागणं नसताना सुद्धा जर सारखं संशय घेत राहील तर अशावेळी त्या व्यक्तीच्या बद्दल आपलेपणा राहत नाही.. संवाद कमी होतो..
सुचिता : तुझं बोलणं ऐकून आज मला माझीच चूक लक्षात आली.. यापुढे मी अस काहीच मनात आणणार नाही.. आपण आपल नात असच मोकळं ठेवूया.. आपल्यातील संवाद हा कायम असाच असावा.. आणि आपल्या नात्यातील ओढ ही कायम टिकावी म्हणून मी सुद्धा असे भलतेच विचार करून आपल्या नात्यात कोणतीच कटुता आणणार नाही…. जिथे आपली व्यक्ती आपलाच विचार करते आपल्यावर प्रेम करते हे स्पष्ट दिसते तिथे उगाच नकोते विचार मनात आणून नात मलासुद्धा बिघडवायच नाही…
अनिकेत : आज जस तू मन मोकळं केलस तसच मनात जे आलंय ते आपल्या जोडीदाराला नक्की सांगावं पण आपण काय विचार करतोय आणि तो कुठपर्यंत योग्य आहे.. आपण कुठे चुकतोय का याचा विचार आणि त्याचे आपल्या नात्यावर होणारे परिणाम याचासुद्धा विचार प्रत्येक जोडीदाराने नक्की करावा… जेणेकरून प्रत्येक नात हे अतूट राहील..
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
खूपच सुंदर लेख होता !!!
अशाच सुंदर सुंदर पोस्ट करत जा !!!