Skip to content

नात हे तेव्हाच असते जेव्हा दोन्हीकडून निभावलं जाते..

नात हे तेव्हाच असते जेव्हा दोन्हीकडून निभावलं जाते..


आपल्यासाठी सगळेच नाती महत्वाची असतात.. आपण सर्वांशी जुळून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करतो.. जे आहेत जसे आहेत तसे पण ते सर्व आपल्यासोबत कायम असावेत..

आपल्यापासून कोणी दूर जाऊ नये.. आपल्याशी कोणी कोणतं नात तोडू नये म्हणून आपण नेहमीच समजून घेण्याचा प्रयत्न करतो.. काहीवेळेस आपली चूक नसेल तरी ती मान्य करून सावरण्याचा प्रयत्न करतो.. कधी मनाचा मोठेपणा दाखवून समोरच्याने किती दुखावलं तरी ते सोडून त्याला माफ करून त्याच्याशी असलेलं नातं निभावत असतो.. तर कधी तुझच खरं असं दाखवून ताणून धरत नाही…

एवढं सगळं करून सुद्धा काही माणस म्हणा नाहीतर त्यांचा स्वभाव.. त्यांच्यासाठी कितीही काहीही केलं तरी कमीच असते आणि ते व्यक्ती आपल्याला सोडून जाण्याचा… आपल्यापासून दूर जाण्याचा किंवा आपल्याशी असलेलं नातं तोडण्याचा प्रयत्न करतात… आणि अशावेळी आपण निराश होतो.

कधी या निराशेत कोणतं चुकीचं पाऊल उचलतो तर कधी स्वतःला हरवून बसतो.. कधी रडतो तर कधी भांडतो.. काही लोक तर अशा अवस्थेत जेवण पाणी विसरतात.. झोप लागत नाही ..तर काहींचं कामात लक्ष लागत नाही.. शिक्षणात असल की अभ्यासात लक्ष लागत नाही…

मग अशावेळी करायचं तरी काय… की ज्यामुळे आपण यातून बाहेर पडू…. तर यासाठी काही सरळ साध्या टिप्स :

मलाच त्या व्यक्तीची गरज आहे असे आपल्याला त्यावेळी वाटते.. आणि आपण त्या व्यक्तीला गमावू नये म्हणून जे प्रयत्न करतो त्यातून त्या व्यक्तीला कळते की या व्यक्तीला माझी गरज आहे मग ती अजून ताणून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो म्हणून अशावेळी आपण गरज असल्यासारखं दाखवायचं नाही.. अर्थात गरज असते पण काही काळासाठी तरी तस न दाखवता आपल्यामध्ये व्यस्त राहायचं.

आता स्वतःमध्ये कस व्यस्त राहता येईल.. कारण आपल लक्ष पूर्ण तिकडेच असते म्हणून कशात मन लागतच नाही.. मग अशावेळी आपल्याला जे सगळ्यात जास्त आवडते ते करायचं.. काहींना फिरायला आवडते..तर कोणाला गाणे ऐकायला..कोणाला ट्रेकिंग ला.. तर कोणाला शॉपिंग जे काही असेल पण आपल्या आवडी असतील तस आपण करायचं.

ती व्यक्ती आपल्या आयुष्यात पुन्हा येणारच नाही याकडे लक्ष देण्यापेक्षा आता आपल्या जवळ जे माणसं आहेत त्यांना वेळ द्यायचा.. त्यांच्याशी बोलायच.. ज्यामुळे आपल्याला एकट सुद्धा वाटणार नाही आणि काहीवेळासाठी का असेना आपला वेळ त्यामध्ये सहज जाईल.

जर समोरचा वाद वाढवत असेल किंवा आपल्याला समजून घेत नसेल.. तर आपण ताणल की तुटेल हा विचार करून सावरण्याचा प्रयत्न करतो पण अशावेळी आपण सुद्धा कोणतीच कृती न करता आहे ते तिथेच सोडून काहीवेळासाठी दुर्लक्षित करायचं.

आपण जेव्हा एखाद्याच्या जास्तच मागे लागतो.. जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ती व्यक्ती मात्र अजून जास्त आपल्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते.. मग अशावेळी आपण सुद्धा जास्त मागे न लागता.. आहे तिथेच सोडून.. काही घडलच नाही असं समजून शांत राहायचं..

वेळ ही तर सगळ्या प्रश्नांवर उपाय आहे.. एकमेकांना योग्य ती विचार करण्याची वेळ द्यायची.. जर आपण घाई केली तरी सहज नात तुटण्याची शक्यता असते.

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी कधी जास्त जवळ असल की जाणीवा कमी होतात.. एकमेकांची ओढ राहत नाही.. म्हणून काहीस अंतर महत्वाचं आहे.. आपण काहीकाळ आपल्या नात्यात अंतर ठेवलं तरी त्यातली ओढ ही वाढते.

नात हे तेव्हाच असते जेव्हा दोन्हीकडून निभावलं जाते.. पण जेव्हा एकट्यालाच त्याची गरज आहे असं दिसते तेव्हा मात्र समोरच्या व्यक्तीला त्या नात्याची जाणीव करून देणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.. म्हणून या अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण प्रयत्न करूयात.

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!