एक गोंधळलेलं मन तुम्हाला नकारात्मकतेकडे नेते.
रोजच्या जीवनात बघा जर एखादी गोष्ट प्लॅन केली नसेल तर आयत्यावेळी ती करताना त्या त्या क्षणी जे जे घडेल त्याला तोंड देवून पुढे जात राहवे लागते. सगळ्या गोष्टी अचानक घडत असतात.b अपेक्षे पेक्षा काही तरी वेगळेच घडत असते. आणि मन गोंधळून जाते. ते काम होईल का नाही ही धाकधूक लागून राहते. ते काम करताना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी, प्रॉब्लेम्स यामुळे बरेचवेळा नकारात्मक विचार निर्माण होतात. कशाला हे काम करायला घेतले ? इथपासून यात अडचणी च जास्त आहेत. नकोच करायला. थांबू मध्येच असेच नकारात्मक विचार वाढीस लागतात. अनेक वेळा निराशा येते . आपल्याला हे जमत नाही. जमणार नाही अशी दृढ भावना होत जाते.
हे जसे कामाचे झाले तसेच आहे अभ्यासाचे , मैत्री , नात्याचे , नोकरी , व्यवसायाचे .रिलेशनशिप चे.
अभ्यास करताना सगळे विषय एकत्र घेवून बसलो. सगळ्या विषयांची वह्या पुस्तके ढीग समोर ठेवले. सगळा अभ्यासक्रम समोर ठेवला तर हे करू का ते करू ? हा विषय घेवू आधी का तो विषय घेवू ? . मग त्या विषयात ही हा चॅप्टर किंवा धडा आधी करू का हा असा गोंधळ उडतो. त्यात मित्र मैत्रिणीस फोन करून किंवा प्रत्यक्ष विचारले तर ते एक सांगतात. दुसरे अजून काही वेगळे. हे महत्वाचे हे आधी कर ..दुसरा म्हणतो हे महत्वाचे हे कर की आपल्या मनाचा नुसता गोंधळ उडतो.
आणि द्विधा मनस्थिती होते. त्यातून ते सगळे बघून टेन्शन मात्र वाढू लागते. आपल्याला काय येते आहे ते ही विसरले जाते किंवा त्याक्षणी आपल्याकडे हे तयार आहे ही सकारात्मकता ही आपण विसरतो. येत नाही येत नाही याचा च जप करत राहतो. आणि अजून नकारात्मक होत जातो. मग अशी वेळ येते की राहू दे . हा विषय थोडा अवघड दिसतो. आपण हा आता नकोच करायला त्यापेक्षा दुसरा विषयच निवडू आता अभ्यासाला. असे म्हणून तो तिथे सोडून देतो.
तसेच नात्याचे , रिलेशनशिप चे ही आहे. नात्यात , रिलेशनशिप मध्ये जेव्हा केवळ आपण आणि समोरची व्यक्ती याचे नाते, रिलेशनशिप कडे लक्ष दिले, त्यांचे विचार केले तर नाती अजून दृढ होण्यास मदत होते याउलट या नात्यात इतर सगळ्या नात्यांचा , लोकांचा समावेश केला गेला तर मन , विचार हे ते जसे सांगतील तसे केले जातात.
एकमेकांची मते एकमेकांच्या विषयी दृढ नसतील, विश्वास, आदर नसेल , नात्याची , व्यक्तीची कदर नसेल तर इतर लोक तुम्हा दोघात काही ना काही विषय भरवून देणारच. ते बोलणारच ते ऐकून मनाचा अजून गोंधळ उडून नात्यात , रिलेशनशिप मध्ये तेढ निर्माण होतें . आणि नात्याविषयी नकारात्मकता निर्माण होते. रिलेशनशिप मध्ये असतील तर सतत काही ना काही negative points डोके वर काढत असतात. Positive गोष्टी दिसत च नाहीत. विचारात घेतल्या जात नाहीत. त्यावर पडदा पडतो. आणि एकप्रकारची तेढ निर्माण होते.
बरेचवेळा मीच का बोलायचे, मीच का मेसेज , फोन करायचा इथे पासून प्रत्येकवेळी मीच का समजून घ्यायचे असे म्हणून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करतात . मी पणा..इगो सांभाळण्याचे प्रयत्न करतात . अशावेळी थोडे दिवस किंवा काही तास , काही मिनिटे जरी एकमेकांच्या शिवाय राहावं लागलं तरी ही मग मन बेचैन होते. अस्वस्थता वाढते. इकडे तर नाते पाहिजे असते. पण त्या करिता सामंजस्य , पुढाकार घेवून , आपलेपणाने ते नाते पुढे घेवून जावे यात मीपणा आडवा येतो.
त्यातून आपल्याला नक्की आपली व्यक्ती पाहिजे का नाही हेही समजत नाही. असा मनाचा गोंधळ उडतो. मग जावू दे अंतर आले ना मग आता राहू दे तसेच असे म्हणून नात्यात नकारात्मकता येते.
तर काही व्यक्तींच्या बाबत असे असते की त्यांना सगळ्याच व्यक्ती तेव्हढ्याच महत्वाच्या असतात आणि त्या सगळ्या पाहिजे असतात. अशा वेळी जर रिलेशनशिप असेल तर ती व्यक्ती असे गृहीत धरून जाते की मी जास्त जवळची असायला पाहिजे.
तसे नवरा बायको नात्यात ही नवऱ्याला सगळी नाती पाहिजे असतात. तेवढीच महत्वाची असतात. पण बायको ला मात्र असे वाटत असते की आपण त्याला जास्त महत्वाचे असलो पाहिजे. आणि जेव्हा असे घडत नाही तेव्हा सुरुवातीला वाद , हक्क ,कधी रुसवे – फुगवे ही होतात. आणि मग तेवढ्या पुरते समेट होतात.
परत जेव्हा असे कुठे इतर जास्त जवळ वाटतात तेव्हा मी जास्त महत्वाची असली पाहिजे हा भाव जागृत होतो आणि वाद होतात. पण यात मनात गोंधळ च होत असतो की मी बायको आणि महत्व नाही. इतर महत्वाचे माझी गरज नाही असे नकारात्मक विचार येतात. अगदी मुलांच्या कडे नवऱ्याने जास्त लक्ष दिले तरी ही बायकोला असे वाटते की हो आता काय माझी गरज संपली आहे. त्यामुळे मुलांनाच महत्व दिले जाते असे डोक्यात येते. . बरं मुले त्यांच्या विश्वात दंग असतात. अभ्यास .मित्र , खेळ त्यात त्यांना असे काहीच डोक्यात येत नसते. त्यामुळे ती वडील असो की आई दोघांच्या सोबत तेवढीच मोकळेपणाने बोलतात. एकत्र वेळ घालवतात , सकारात्मक असतात.
बहुतेक वेळी स्त्रिया त्यांच्या डोक्यात च विचारांचे थैमान असते. गोंधळ असतो. जशा एखाद्या इलेक्ट्रिक पॉइंट ठिकाणी अनेक वायरी एकमेकात गुंतलेल्या असतात तसेच स्त्रियांचे विचार डोक्यात सुरू असतात. त्यामुळे या पुरुषांच्या पेक्षा जास्त नकारात्मक असतात. कारण स्त्रियांचा स्वभाव थोडा तुलना , हक्क , माझे तुझे असे अधिकार गाजवणारा, मी माझे हे नाते त्यामुळे मी जास्त जवळची, मी इतरांच्या पेक्षा कोणी तरी वेगळी असे डोक्यात असते. आणि तसे वागवावे ही अपेक्षा असतें .
आणि आपल्या आपेक्षे नुसार घडले नाही की त्यांच्या मनाचा गोंधळ उडतो. मग insecure feel होते. नकारात्मकता वाढते. माझी कदर नाही. महत्व नाही हेच विचार येवून मी ही असेच वागेन मलाही तुम्ही महत्वाचे नाही. इथपासून ते नात्यात अंतर येण्या इतपत विचार , नकोच ते नाते ..असेही विचार येतात. तसे अंतर ठेवून वागायला गेल्या की तेही जमत नाही कारण आपले असे जेव्हा मानते स्त्री तेव्हा त्या व्यक्तीविषयी आपुलकी, ओढ असते. त्यामुळे परत दूर राहायचे का जवळ जायचे ह्या विचारांच्या गोंधळात बरेचवेळा स्त्रिया अडकतात. काही वेळेस पुरुषांचे ही तसे होते.
पण मग गोंधळलेले मन योग्य निर्णय ही घेवू शकत नाही. तळ्यात आणि मळ्यात असे होत असते. दोन पाऊले पुढे जावून सकारात्मक विचार करून नात्याला महत्व द्यायला गेले तर चार पावले मागे जावून नकारात्मक विचार डोके वर काढतात. जसे तो / ती आपल्याशी असे वागला / वागली. त्यांनी असे वागायला पाहिजे होते. हे करायला पाहिजे होते ते केले नाही. असे अनेक नकारात्मक विचार आणि गोष्टी च डोके वर काढू लागतात.
एक गोंधळलेलं मन तुम्हाला नकारात्मकतेकडे नेते.
त्यामुळे तुम्हाला आयुष्यात सकारात्मक राहायचे असेल तर गोंधळलेली मनाची अवस्था कधीच तुम्हाला त्या करिता प्रवृत्त करणार नाही तर विरोध करेल म्हणून मन स्थिर , शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मनाला कसेही वाहवत नेऊ नका. थोडासा संयम पण ठेवणे गरजेचे.
शंभर गोष्टी अस्ताव्यस्त पडल्या असतील तर त्यातून पाहिजे ती गोष्ट शोधणे अवघड जाते. आणि उगीच सगळे उल्थे पालथे घातले जाते आणि त्या गोंधळात डोळ्यासमोर दिसणारी वस्तू ही त्या क्षणी दिसत नाही. त्यातून चिडचिड , राग , आदळ आपट होत जाते.
असेच आहे गोंधळलेल्या मनात येणारे विचार भरकटत जातात. आणि कोणत्याच गोष्टी धड होत नाहीत. बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो.
आयुष्य सुंदर आहे. एक गोंधळलेले मन तुम्हाला नकारात्मकते कडे नेते. म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्य अजून सुंदर बनवायचे , घडवायचे असेल तर मनात गोंधळ निर्माण होवू देवू नका. मन शांत ठेवा आणि विचार करताना त्या विचारांना कोणती तरी दिशा असू द्या. तशी मनाला सवय लावा.
लेखिका – सोनाली जे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

