पार्टनर जवळ गेल्यानंतर उत्तेजना लवकर जाणवत नसतील तर ही मानसिक कारणे असू शकतात.
सोनाली जे.
पार्टनर चे नाते कसे दुग्ध शर्करा असावे असे ..दोघं एकमेकात इतके मिसळून जातात की त्यातून अलग करणे शक्य नसते. दुधातून साखर वेगळी काढणे किंवा साखरेतून दूध वेगळे काढणे ही शक्य नसते.
पार्टनर जवळ गेले की एक प्रकारचा जोश, उत्साह , आनंद जाणवत असतो. मन आणि शरीर दोन्ही ही उत्तेजीत होत असते. त्यातून मानसिक , भावनिक, शारीरिक मोकळेपणा आणि relaxation येत असते. सगळा स्ट्रेस कुठच्या कुठे पळून जावून मन एकदम फ्रेश होत असते.
याउलट जर पार्टनर जवळ गेल्यानंतर मनात , शरीरात अशा गोड भावना निर्माण होतात त्या होत नसतील , उत्तेजना लवकर जाणवत नसतील तर त्यामागे काही मानसिक कारणे असू शकतात. बघुया ती मानसिक कारणे:-
१. पार्टनर मध्ये मानसिक , भावनिक bounding नसणे –
पार्टनर एकत्र जरी राहत असतील तरी त्यांच्यात मानसिक , भावनिक गोष्टींची देवाणघेवाण तेवढ्या मोकळेपणाने होत नसते. Bounding नसते. त्यामुळे एकमेकांच्या गरजा , भावना काय आहेत हेच एकमेकांना समजत नसते. त्यातून मानसिक असुरक्षितता ही निर्माण होते.
पार्टनर जवळ जाताना त्यांच्यात पूर्णपणे involve असेल , ती एकमेकांची ओढ असेल तर लगेच उत्तेजना निर्माण होत असतात. तसे harmonal changes घडत असतात.
मात्र जर त्यांची एकमेकांना समजून घेण्याची क्षमता नसेल, involvement , attachment नसेल तर मात्र लवकर उत्तेजना जाणवत नाहीत.
एकमेक उत्तेजीत होण्यास वेळ लागतो. शिवाय मग मानसिक दृष्ट्या ऐवजी फक्त शारीरिक दृष्ट्या तेवढ्या क्षणिक काळापुरते उत्तेजना निर्माण होतात असे घडते.
२. सततच्या वादामुळे :
दोन भिन्न संस्कृती आणि वातावरणात वाढलेल्या व्यक्ती एकत्र आल्या तर एकमेकांना एकमेकांशी जुळवून घेणे खूप अवघड जाते.
दोन भिन्न आर्थिक , सामाजिक स्तरात वाढलेल्या पार्टनर मध्ये ही वाद होतात कारण ज्याला पैशाची कधी चणचण भासली नाही, चिंता वाटली नाही तो त्याच्या पद्धतीने त्याचे status maintain करत असतो पण दुसऱ्याला मात्र त्या सोबत जुळवून घेणे अवघड जाते. पैसे सतत manage करणे अवघड जाते. यातून उडणारे खटके ..असे वाटते की आपल्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. असुरक्षितता निर्माण होते.
या व्यतिरिक्त परिस्थितीशी जुळवून घेता न येणे, एकमेकांनी समजून न घेणे, घरातील इतर व्यक्तींच्या वागण्याचा परिणाम होवून पार्टनर मध्ये मतभेद , खटके उडत असतात. कधी विकोपाची भांडणे , मारहाण होत असते अशावेळी मन शारीरिक जवळीक ही नाकारते. आणि जर भांडणे मिटली , समेट झाला तरी सगळे विसरून उत्तेजना लवकर निर्माण होत नाही.
त्यातून सतत वाद होत असतात. आणि त्याचा परिणाम मन आणि शरीर या दोन्ही वर नक्कीच होत असतो . आणि पार्टनर जवळ गेल्यावर ही उत्तेजना लवकर जाणवत नाहीत किंवा जाणवतच नाहीत.
३. शारीरिक कमतरता , उणीवा , सततची आजारपणे:
आपल्या पार्टनर मध्ये काही शारीरिक कमतरता असतील, उणीवा असतील तर शारीरिक संबंध तेवढे चांगले प्रस्थापित होत नाहीत. त्याचमुळे पहिला अनुभव असेल किंवा पुढे वारंवार येत असलेला अनुभव यातून निराशा येते , मनात एक भीती निर्माण होते त्यातून अनेक नकारात्मक विचार येत जातात की याही वेळी असेच होणार मग कशाला पाहिजे ते . आणि त्याचा परिणाम शरीरावर होवून मन आणि शरीर यात उत्तेजना निर्माण होत नाही किंवा मग खुप प्रयत्न केल्यावर ही उत्तेजना निर्माण होण्यास वेळ लागतो.
४. पार्टनर ची अपेक्षा भिन्न :
आजकाल सोशल मीडिया , एकमेकांच्या सोबत मोकळेपणाने यावर चर्चा, इतर मित्र मैत्रिणी यांचे अनुभव ऐकून , बघून काही अपेक्षा मनात असतात. आणि त्याप्रमाणे नाही घडले तर लवकर उत्तेजना जाणवत नाहीत.
५. जागेचा अभाव :
घरात तशी एकमेकांना privacy मिळत नसेल, घरात जागेचा अभाव असेल , वडीलधारी मंडळी सतत घरी असतील तर ते काय विचार करतील , त्यांना काय वाटेल , ते असताना कसे जवळीक निर्माण करणार ? असे लज्जा , संकोच , भीती युक्त विचार हे मनात येत असतात. त्यातून मनामध्ये संकुचित वृत्ती निर्माण होते. आणि एकमेकांच्या मध्ये मर्यादा निर्माण होतात त्यामुळे पार्टनर जवळ गेले तरी ही लवकर उत्तेजना निर्माण होत नाही.
६. पार्टनर व्यसनी असेल , विवाहबाह्य संबंध असतील तरी ही एकमेकांच्या जवळ जावून ही लवकर उत्तेजना निर्माण होत नाहीत.
७. अपुरी झोप, office , घर कामाचा ताण , मुलांच्या, वडीलधारी व्यक्तींच्या जबाबदाऱ्या यातून येणारा थकवा , स्वतः करिता आणि पार्टनर करिता वेळ काढता येत नाही. अशा वेळी या सगळ्यातून एकमेकांना लवकर उत्तेजना ही मिळत नाही.
८. काही वेळेस उत्तेजना निर्माण झाल्यावर पुढे काहीच होत नाही अशावेळी निराशा येते , नकारात्मकता निर्माण होते. किंवा त्यावेळी खुप घाई होते, नंतर काही शारीरिक त्रास होतात त्याचा परिणाम मनावर होवून पार्टनर जवळ गेल्यावर ही लवकर उत्तेजना निर्माण होत नाहीत.
मन आणि शरीर , इतरांचे वर्तन , सभोवतालची परिस्थिती, इतरांची वागणूक , आर्थिक , सामाजिक गोष्टी , नोकरी – बेरोजगारी , तुटपुंजा पगार , पार्टनर मध्ये भिन्न आवडी निवडी, एकमेकांचे स्वभाव भिन्न असणे , एकमेकांना समजून न घेणे , सतत घरातल्या इतर व्यक्तींचा पगडा , privacy नसणे या सगळ्या गोष्टी व्यक्तीशी निगडित असतात. त्याचा परिणाम व्यक्तीवर ..पार्टनर वर होत असतो. त्यातून मन, शरीर जेवढे फ्रेश असेल तेवढे ते लवकर उत्तेजीत होते.
आयुष्य सुंदर आहे, पार्टनर मध्ये नाते चांगले होण्यासाठी एकमेकांना वेळ द्या ,व समजून घ्या, गरजा , आवडी निवडी समजून घ्या. त्याच त्याच रूटीन मधून थोडा बदल म्हणून बाहेर जा, नवीन काही गोष्टी करा, पिकनिक ला जा, निसर्ग सौंदर्य आणि एकांत मिळवा. छंद जोपासा. बाहेर जेवण करा. , दैनंदिन कामात थोडी मदत करा.
कधी पार्टनर ही दमती / दमतो हे लक्षात घेवून थोडे निवांत बसून एकमेकांच्या अडचणी समजून घ्या. अडचणी नसेल तरी एकंदर अनेक गोष्टीवर मोकळेपणाने बोला , चर्चा करा. हास्य विनोद , थोडे हलके स्पर्श , कधी कधी एखादी मिठी, गोड हावभाव , थोडी जवळीक यातून एकमेकांना उत्तेजना द्या.
All the best.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.