Skip to content

स्वप्न आणि आपलं आयुष्य!

स्वप्न आणि आपलं आयुष्य!


पूजा सातपुते


“You have to dream before your dreams can come true”- Dr. A. P. J. Abdul Kalam.

कुठलंही स्वप्न पूर्ण होण्याआधी पहिले आपल्याला स्वप्न बघावं लागतं , निसर्गापुढे इच्छा व्यक्त करावी लागते तरच निसर्ग आपल्या समोर आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट निर्माण करतो.

या जगात प्रत्येकाला निसर्गाने स्वप्न बघण्याची देणगी दिली आहे, अगदी छोट्यातला छोठा जीव सुद्धा कुठलीतरी स्वप्न बघत असतो. लहानपणापासून आपण सर्वच जण कुठलं ना कुठलं तरी स्वप्न बाळगून असतो पण सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतातच असं नाही.

आपल्यापैकी काहीच जण मोठेपणी ते स्वप्न जगतात, कारण तसा ध्यासच घेतलेला असतो तर काही जण मोठे होता होता, कधी जबाबदारीमुळे तर कधी परिस्थितीमुळे स्वप्न पूर्ण करू शकत नाही पण कुठे तरी मनाच्या कोपऱ्यात ते स्वप्न जिवंत असतं. निसर्ग आणि आपलं नशीब हे खूप विचित्र आहे. कधी आपण खूप प्रयत्न करूनही आपलं स्वप्न अपूर्णच राहतं तर कधी ध्यानीमनी नसताना सहज ते पूर्ण होतं.

खरं पाहिलं गेलं तर आपलं नशीब हे विधिलिखित आहे. निसर्गाच्या मर्जी शिवाय आपण काहीच करू शकत नाही पण तरी सुद्धा आपण काही ना काही तरी स्वप्न बघत असतो कारण आपण पाहिलेली स्वप्न सुद्धा हे विधिलिखितच आहे. भगवंतांनी श्रीमद भगवत गीतेत किती छान अर्जुनाला सांगितलं आहे की “कर्म करत राहणे हे तुझ्या हातात आहे, फक्त त्याचं फळ तुला कधी मिळणार हे तुझ्या हातात नाही म्हणून कर्मफळाची इच्छा सोडून तू तुझं कर्म कर आणि बाकी सर्व माझ्यावर सोडून दे”.

हे वाक्य वाचुनच किती बरं वाटतं बघा ना! कधी कधी नकळत आपली स्वप्न पूर्ण करताना आपण भानातच राहत नाही आणि कुठेतरी आपण आपलं आयुष्य जगण्याची मजा गमावून बसतो. स्वप्न पुरतीत आपण इतके स्वतःला अडकवून घेतो की आपली खास नाती, जिवलग माणसं आपल्यापासून दुरावली जातात. ज्यांच्यासाठी आपण हे सर्व करत असतो तीच माणसं जेव्हा आपल्याला सर्व काही मिळालेलं असतं तेव्हा आपल्या जवळ नसतात कारण आपणच नकळतपणे त्यांना आपल्या पासून दूर केलेलं असतं.

बरेचदा आपण असा विचार करतो, माझं हे स्वप्न पूर्ण होऊ दे मग मी माझ्या परिवाराबरोबर मजा करेन किंव्हा माझं एवढं काम झालं की मी तिला/त्याला माझ्या भावना सांगेन आणि त्या परफेक्ट वेळेची वाट बघण्यात आपण तो क्षण, तो आनंद जगतच नाही आणि जेव्हा आपल्या प्रमाणे आपल्याला वाटतं की ती वेळ आलेली आहे तेव्हा ती माणसं आपल्यापाशी नसतात आणि जेव्हा आपल्याला हे कळतं तेव्हा आपण काहीच करू शकत नाही.

निसर्गही किती हुशार आहे बघा ना! आपल्याला तो सगळ्याच गोष्टी देत नसतो. एकतर स्वप्न पुरतीचा आनंद किंव्हा कशापासून तरी दुरावण्याचं दुःख देऊन आपलं आयुष्य बॅलन्सड ठेवत असतो.

खरं पाहिलं तर आयुष्य बॅलन्सड ठेवण्यातच शहाणपण आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्टींचा आनंद घेत जगणं म्हणजेच “इसी का नाम zindagi”.

स्वप्न नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण त्या प्रयत्नात आपल्या खास लोकांना विसरन उपयोग नाही कारण आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या वेडेपणात त्यांचाही खूप मोठा वाटा असतो. नकळत ते ही आपल्या बरोबर स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपली स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपली मदत करत असतात. कदाचित त्यांचीही काही स्वप्न असतीलच ना, कदाचित तुमचा सहवासही त्यांनी पाहिलेलं स्वप्न असू शकतं.

आयुष्य हे बॅलन्सड ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वप्न नक्कीच पहा, ते पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्नही करा, मेहनत घ्या कारण स्वप्न बघितल्या शिवाय आणि त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय ती कधीच पूर्ण होत नसतात पण त्यासाठी लहान सहान आनंदी क्षणांचा बळी देऊ नका. आयुष्य हे एक प्रोसेस आहे आणि प्रत्येक प्रोसेस मध्ये आपला प्रोग्रेस होत असतो- शारीरिक, मानसिक आणि भावनिक!

आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. खुश रहा आणि सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुमची स्वप्न पूर्ण होण्यास निसर्ग कशी तुमची मदत करतो ते!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!