Skip to content

कधी कधी स्वतःचं मत मांडणं खूप गरजेचं असतं, कारण…

कधी कधी स्वतःचं मत मांडणं खूप गरजेचं असतं, कारण…


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“हे जे तू मला आता सांगत आहेस, तेच जर तिथे सर्वांसमोर बोलली असतीस तर चांगल झालं असत अस नाही का वाटत तुला?” वैशाली नम्रताला जरा चिडूनच म्हणाली. “वैशाली तू म्हणतेस ते सर्व मला मान्य आहे, पण तुला देखील ठाऊक आहे त्या घरात माझ्या बोलण्याला काही किंमत नाही. मी फक्त तिथे एक साक्षीदार म्हणून उभी असते.

मला जरी काही वाटलं तरी तिथे बोलता येत नाही. आणि मी तसा प्रयत्न जरी केला तरी त्याचा काही फायदा होईल असं मला वाटत नाही.” नम्रताचं हे बोलणं ऐकून वैशाली जरा अजून चिडली. “अग तुला बोलू देतील की नाही, त्याचा फायदा होईल की नाही हे सर्व तू स्वतःच कसं ठरवतेस? तू बोलशील तेव्हाच समजणार ना!

जेव्हा आपण एकत्र एका घरात राहत असतो जेव्हा तिथे वेगवेगळे विचार एकत्र येत असतात. अश्या वेळी कोणा एकाचच म्हणणं ऐकून त्यानुसार वागणं कितपत योग्य आहे? विचार वेगळे असू शकतात, कारण माणसं वेगवेगळी असतात. त्यामुळे मतभेद देखील होणं रास्त आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण गप्प बसावं. आपण मत मांडायच असत ते आपले विचार दाखवून देण्यासाठी. ते समोरच्या व्यक्तीला पटावेत यासाठी नाही.

राहिला प्रश्न तुझा, तू ज्या गोष्टीबद्दल बोलत आहेस तिथे तर तुझ मत जाणून घेतलच पाहिजे. कारण तू तुझ्या मुलाबद्दल बोलत आहेस. आणि एक आई म्हणून तुझा देखील त्याच्यावर तितकाच हक्क आहे. त्याच्या शिक्षणा संबंधी किंवा अन्य कोणत्या गोष्टीविषयी काही निर्णय घेतला जात असेल तर त्यात तुझा देखील सहभाग हवा.

आपण जर आपलं मत मांडलच नाही तर समोरच्या व्यक्तीला समजणार कसं आपण काय विचार करत आहोत? कोणीही आपलं मन जाणून घेऊ शकत नाही. तू आता काही बोलली नाहीस तर नंतर पश्चाताप करायची वेळ येईल.” वैशालीने तिला इतकं कळकळीने सांगायचं कारणच हे होत की नम्रता तिच्या मनात कितीही काही असल तरी नवरा आपल्याला काहीतरी बोलेल किंवा त्याला आपलं बोलण पटणार नाही या भीतीने काही बोलायची नाही.

नवऱ्याने घेतलेला प्रत्येक निर्णय तिला पटत असे असा नाही. पण ती स्वतःचा विचार देखील कधी बोलून दाखवत नसे. आता पण अशीच एक गोष्ट घडत होती जी तिला आई म्हणून पटत नव्हती. त्यांचा मुलगा अनिश याला बोर्डींगला घालायचा निर्णय घेतला जात होता. पण हे तिला मान्य नव्हत. अजून तो खूप लहान होता आणि तिला वाटत होत त्याच सर्व शिक्षण, लहानपण तिच्या समोर घडावं. ती त्याच्याकडे चांगल लक्ष देऊ शकते. पण तिने हे नवऱ्याला सांगितल नाही. तिची हिमत्तच झाली नाही.

आतापर्यंत ती कधी काही बोलली नव्हती. त्यामुळे घरातल्या सर्वांचा असाच समज की हिच अस वेगळं काही मत नाही. हिला आपली गोष्ट पटते. पण यावेळी तिला हे अजिबात पटलं नव्हत. आपलं दुःख कोणासमोर व्यक्त करायचं हा प्रश्न पडला तेव्हा ती तिची मैत्रिण वैशालीला भेटली.

विविध घटनांविषयी, गोष्टींविषयी आपण जी मत मांडत असतो ती आपल्या विचारांचं प्रतिबिंब पाडत. आपण त्या गोष्टीविषयी कसा आणि कोणत्या कोणत्या बाजूंनी विचार करतो हे त्यातून समजत असतं. म्हणून आपलं मत मांडण गरजेचं आहे. बरेचदा लोकांना काय वाटेल, किंवा विरोधात का जायचं म्हणून आपण गप्प बसतो, हो ल हो म्हणतो. पण यातून आपण आपलं नुकसान करून घेत असतो. अस केल्याने समोरची व्यक्ती आपल्याला गृहीत धरण्याच प्रमाण वाढत. परंतु मत मांडणं म्हणजे विरोधात जाणं नसून आपल्याला काय वाटत हे व्यक्त करण असत.

दर वेळी आपलं मत वेगळंच असेल अस देखील असत नाही. बऱ्याचदा आपली मतं जुळतात देखील. पण ते समजणार कधी जेव्हा आपण बोलणार. म्हणूनच जेव्हा असे निर्णय घ्यायचे प्रसंग असतात, गोष्टी असतात तिथे आपलं मत मांडलं पाहिजे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!