Skip to content

गमावल्यासारखं वाटतं, जेव्हा जवळची व्यक्ती आपल्याशी बोलल्याशिवाय राहू शकते, हे जाणवतं.

गमावल्यासारखं वाटतं, जेव्हा जवळची व्यक्ती आपल्याशी बोलल्याशिवाय राहू शकते, हे जाणवतं.


हर्षदा पिंपळे


रमा आणि क्षमा दोघी बालवाडीपासून एकत्र असलेल्या मैत्रिणी.अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी.बालवाडीपासून जमलेली गट्टी अगदी एमबीए च्या शेवटच्या वर्षापर्यंत टिकून होती.दोघींची इतकी घट्ट मैत्री होती की,एकमेकींसाठी त्या अगदी जीव ओवाळायला तयार असायच्या.शाळेत एकत्र जायच्या,एकत्र यायच्या. एकत्र डब्बा खाणार,एकत्र अभ्यास करणार. सगळ्या गोष्टींमध्ये दोघीही आवर्जून सहभागी व्हायच्या.

घरी असतानासुद्धा दोघी एकत्र खेळणार.अगदी शाळा संपल्यावरही त्यांची मैत्री तशीच होती.कॉलेजचं सबमिशन दोघीही एकत्रच देणार.एकीचं पूर्ण नसेल तर दुसरी तिच्यासाठी थांबायची.सगळी सुखदुःख त्या मोकळेपणाने शेअर करायच्या.अर्थात एक नसेल तर दुसरीला अजिबात करमायचं नाही. इतकी छान मैत्री चालू असताना अचानक त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं.

कुणीतरी तिसरी व्यक्ती आली आणि त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करून गेली.रमाने क्षमाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु क्षमाने काही ऐकलं नाही.क्षमाने मनाशी ठरवलं होतं, रमाशी कायमचं बोलणं बंद म्हणजे बंद.

जवळजवळ एक आठवडा असाच निघून गेला. रमाने समजूत काढून काहीही उपयोग झाला नाही. क्षमाने धरायचा तो अबोला धरला.हा अबोला असाच चालू राहिला. आणि एकेकाळी जिचं आपल्याशिवाय पान हलत नव्हतं तीच आपल्याशी आता बोलत नाही. ती माझ्याशिवाय राहू शकते.हे रमाला जाणवायला लागलं.तिला त्या गोष्टीचा प्रचंड त्रास होऊ लागला.आपण काहीतरी गमावलय हे तिला सहनच झालं नाही.

जवळजवळ दोन ते तीन वर्षांनी क्षमाला लक्षात आलं,या सगळ्यात रमाची काहीही चूक नव्हती. तिने जाऊन रमाची माफी मागितली. आणि रमानेही क्षमाला मोठ्या मनाने माफ केलं.त्यांच्यातील अबोला दूर झाला.दोघी पुन्हा एकत्र आल्या.

रमा आणि क्षमासारखच आपलही नातं असचं असतं.असेच काहीसे इन्सिडन्ट आपल्या आयुष्यातही घडतात.

तर मित्रांनो,

आयुष्यात माणसांचा वावर काही कमी नाही.कुटुंब, मित्रमैत्रिणी, सहकारी अशी अनेक माणसं आपल्या आयुष्यात असतात. काहींशी आपलं पटतं तर काहींशी आपलं फारसं पटत नाही. काही जणांशी ईतके छान बंध जुळले जातात की,त्यांच्याशिवाय आपलं पानही हलत नाही. छोट्या छोट्या गोष्टीतही आपल्याला अशी काही माणसं हवीहवीशी असतात.जी अगदी आपल्या जवळची असतात. मग ती घरातील माणसं असूदेत किंवा बाहेरची.

आता एखादं मैत्रीचं नातं काय असतं हे कुणाला वेगळं सांगायची गरज नाही.काही नाती ही एखाद्या छान मैत्रीसारखी असतात. किंवा मग काही नात्यात अगदी छान मैत्री असते.आणि अशा नात्यांमध्ये छोटी मोठी भांडणं ही होत असतात. त्या शिवाय नात्यांची गम्मतही कळत नाही.

असेच,गोड,गोंडस रूसवे फुगवे झाले की फारसं काही वाटत नाही.कारण, कितीही केलं तरी आपल्याला माहित असतं,समोरची व्यक्ती आपल्यशिवाय फार काळ राहू शकत नाही. आपल्यावर फार काळ रागावू शकत नाही. अबोला धरू शकत नाही.

आपल्याकडे आपल्याशिवाय न राहणारी व्यक्ती असणं, हे फिलींगही खूप छान असतं.

पण अनेकदा काही कारणांमुळे कधी कधी दोन जवळच्या माणसांमध्ये दुरावा हा येतो.अनेकदा अबोला निर्माण होतो.एकमेकांमध्ये हळुहळू अंतर पडायला लागतं.आणि नाही नाही म्हणतात, त्या दोघांमध्ये अंतर पडतं ते कायमचं ! त्यावेळेस मन काही स्वस्थ बसत नाही.सतत मनात चलबिचल चालू असते.सगळं सहन होत असतं.परंतु तो अबोला मात्र सहन होत नसतो.मनाची त्यावेळी सतत घुसमट होत राहते.

इतके दिवस माझ्याशिवाय पान न हलणारा तो/ती आज माझ्याशिवाय राहू कसा/कशी शकतो/शकते ? रोज माझ्याशी वेळात वेळ काढून बोलण्यासाठी धडपडणारा हाच का तो ? असा प्रश्न मनात सहज उपस्थित होतो. राहून राहून मनाला हाच प्रश्न सतावत राहतो.मनाला त्या स्थितीत समजावणं कठीण होऊन जातं.

काहीतरी कमावलेलं क्षणात गमावल्यासारखं वाटतं,जेव्हा जवळची व्यक्ती आपल्याशी बोलल्याशिवाय राहू शकते, हे जाणवायला लागतं.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!