Skip to content

खरचं प्रसंग माणसाला शहाणं करतात.. घडवतात.

खरचं प्रसंग माणसाला शहाणं करतात.. घडवतात.


मिनल वरपे


मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली.. परिस्थितीची जाणीव असलेली आणि अभ्यासात सुद्धा हुशार असलेली स्मिता .. पण एवढं सगळं जरी उत्तम असल तरी कायमच घरच्यांनी तिला जपल्याने म्हणजेच तिच शिक्षण तिची सगळी वाढ विकास हा राहत्या गावीच झाल्याने बाहेरच जग तिला माहीतच नव्हत..

पण यामुळेच नंतर जेव्हा तिला पुढच्या शिक्षणासाठी बाहेर गावी जाण्याची गरज पडली तेव्हा तिच्या घरच्यांनी काळजी वाढली आणि तीलासुद्धा भीती वाटली एकतर घरची माया.. ओढ.. आणि दुसरं म्हणजे बाहेर गावी कस राहायचं तिकडे गेल्यावर बाहेर पडायचं कस.. सगळं नीट जमेल ना.. कोणता त्रास होणार तर नाहीना.. काहीही प्रॉब्लेम आला तर त्यावेळी ती कस सांभाळणार असे एक ना अनेक प्रश्न तिला आणि तिच्या घरच्यांना पडले..पण तिला जर उत्तम शिक्षण घ्यायचं आहे तर बाहेर पडावंच लागेल याची जाणीव तिच्यासह सर्वांना असल्याने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न शोधता वेळ हेच उत्तर समजून ती बाहेर पडली..

स्मिता नवीन ठिकाणी नवीन वातावरणात हळूहळू रुळत होती.. पण तिच्या मनात मात्र भीतीच ओझ होतच.. आणि म्हणतात ना प्रसंग माणसाला बरच काही शिकवतात अगदी तसच एक असा प्रसंग घडला आणि स्मिताचे विचार यांच्यात बदल झाला..

स्मिता मैत्रिणीसोबत हॉस्टेल वरून कॉलेजला जात असताना दोन मूल तिचा पाठलाग करत होती.. खर तर हे नवीन नव्हत ते तिच्या पहिल्या दिवसापासून असाच पाठलाग करत होते फक्त स्मिता पळ काढायचा प्रयत्न करायची.. पण त्यादिवशी मात्र त्यांनी तिला जवळ येऊन तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला.. त्या क्षणाला शांत आणि घाबरट स्मिता अचानक रागाने लाल झाली.. जसा त्या मुलाने तिचा हात पकडला अगदी त्याच क्षणाला स्मिताने त्याचा हात बाजूला करून त्याच्या दोन कानाखाली दिल्या.. तीच हे रूप बघून ते मूल तिथून निघून गेले आणि पुन्हा कधीच तिच्या वाटेला ते फिरकले नाही…

स्मिताची मैत्रीण मात्र त्यावेळी अवाक झाली की स्मितामध्ये इतकी ताकद आणि हे धाडस आल कुठून.. त्यावेळी स्मिताने तिला उत्तर दिलं.. अग आज जेव्हा त्याने माझा हात पकडला तेव्हा क्षणार्धात माझ्यासमोर माझं future समोर आल.. की आज जर मी या ठिकाणी विरोध करू शकले नाही तर उद्या यांची हिम्मत वाढून अजून काही विचित्र घडणार.. आजपर्यंत माझं कुटुंब सतत माझं रक्षण करायचं पण आता मी त्यांच्यापासून लांब आहे.. आज तू होतीस सोबत.. पण उद्या जर कोणी नसेल मी एकटीच असेल तर माझं काय होणार..

हा एकच प्रसंग नाही तर अजून दुसरं काहीही घडलं आणि मी अशी भित्री राहिली तर माझं काय होणार. .. माझं भविष्य मी कस घडवणार.. मनात त्या क्षणाला आल की आता मला कशाला घाबरायच नाही.. कुठे थांबायचं नाही कारण मला स्वतःला घडवायचं आहे.. आणि आज त्याचीच ही सूरवात… या विचाराने मला हिम्मत दिली आणि म्हणूनच मी हे करू शकली..

खरचं प्रसंग माणसाला शहाणं करतात.. घडवतात.. त्यातलाच हा प्रसंग ज्याने स्मिताला आज हिम्मत दिली तिची भीती घालवली.. तिला पुढे जाण्याची वाट दाखवली..


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!