Skip to content

एका वेगळ्या दृष्टीकोनातून विचार केला की सगळं सरळ आणि सोप होते.

एका वेगळ्या दृष्टीकोनातून विचार केला की सगळं सरळ आणि सोप होते.


मिनल वरपे


केतन आणि नेहा च एकमेकांवर प्रेम.. जीवापाड वैगेरे म्हणण्यापेक्षा आंधळ प्रेम नव्हत हे सांगण्यासारख आहे.. आणि प्रेम म्हंटल की सगळ्यांची परवानगी मिळतेच असं नाही कोणाला सहज मिळते तर कोणाला मिळवावी लागते..उगाच इतक्या serial चालत नाहीत..

नेहा आणि केतनच्या प्रेमाला सुद्धा नेहाच्या घरी तिच्या वडिलांचा विरोध होता आणि बाकी सर्वांना जरी मान्य असले तरी त्यांच्यापुढे कोणाचं काहीच चालत नव्हतं..

एकदा तिच्या वडिलांनी तिला केतन सोबत पाहिलं आणि त्यांच्या रागाचा पारा इतका चढला की त्यांनी तिचा हात पकडुन तिला घरी नेले.. तिला खूप बडबड केली आणि तिला खोलीत बंद करून ठेवले..

तिला तिथून बाहेर काढणं कोणालाच सोप्प नव्हत.. पण नेहाच्या परीक्षा अगदी दुसऱ्या दिवशी असल्याने तिच्या शिक्षणासाठी तिला तिच्या वडिलांनी ताकीद देऊन बाहेर काढले.. मग काय मनात वडिलांची वाढलेली भीती आणि केतन हाच मला आयुष्यभरासाठी जोडीदार हवा हा हट्ट .. यापलीकडे तिला काहीच दिसत नव्हते.. शेवटी नेहाने घरातून परीक्षेच्या निमित्ताने बाहेर पडून केतन सोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला..

नेहा केतनला भेटली त्याला घडलेला प्रकार आणि तिच्या मनात वडिलांची भीती तिने केतन पुढे व्यक्त केली.. जर आपण आज पळून गेलो तरच आपलं लग्न होईल नाहीतर माझे वडील माझं दुसरं कोणत्याही त्यांच्या आवडीच्या मुलाशी लग्न लावतील.. मला शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवतील .. आपलं नातं कायमच तुटेल.. हे सगळं ऐकल्यावर केतन एका क्षणासाठी सुद्धा घाबरला नाही..

त्याने तिला पळून जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला… ती त्याच्यावर चिडली त्याला नको नको ते बोलली… त्याच्यावर अविश्वास दाखवला पण त्याच्या डोळ्यात मात्र पूर्ण विश्वास होता.. स्वतःवर आणि त्याच्या प्रेमावर..

आज आपण इथून पळून जाऊ.. माझ्या घरी आपल्या नात्याला जरी परवानगी असली तरी अस पळून जाऊन लग्न करणं त्यांनाही नाही आवडणार.. आज आपण दोघेही शिकतोय.. आपल्याकडे जॉब सुद्धा नाही.. पूर्ण शिक्षण आपण घेतलेलं नाही.. आपण आला दिवस कसाही काढू पण त्यात आपल्याला आनंद मिळणार नाही कारण आपण आपल्या घरच्यांना फसवल आहे..

प्रेम म्हणजे फक्त आपण दोघच नाहीना.. आपल्या आजूबाजूची आपली माणसं सुद्धा आपल्याला हवीत.. मी प्रेम केलं म्हणजे माझं शिक्षण.. माझं करिअर यांना महत्त्व नाही असं नाहीना.. आपण ज्या त्या गोष्टींना त्यांचं महत्त्व देऊन पुढे जायचं..

तुझ्या वडिलांची इच्छा आहे तू चांगली शिकावी म्हणून तर तुला कोंडलेल असताना सुद्धा तुझ्या शिक्षणासाठी तुझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला आणि तुला बाहेर पाठवलं.. मग त्यांचा विश्वास तोडू नकोस..

आपण दोघेही शिक्षण घेऊ.. आपापल करिअर करू.. आणि नंतर नक्कीच आपल्यातील जिद्द आणि आपल्यातील प्रेम बघून आपल्या लग्नाला सुद्धा परवानगी मिळेल.. मी कायम तुझ्यासोबत असेल आजही आहे आणि पुढेही असेल.. फक्त रस्ता कठीण आहे म्हणून चुकीचा मार्ग निवडण म्हणजे आयुष्याचा ट्रॅक पूर्ण बदलेल..

केतनच बोलणं ऐकून त्याच्यावर आणि त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून नेहा परीक्षेला गेली.. त्यांच्यात झालेलं बोलणं तिने तिच्या घरी सांगितलं.. तेव्हा तिच्या वडिलांना सुद्धा केतन बद्दल आदर वाटला.. आणि त्यांनी त्यांच्या नात्याला परवानगी दिली.. पण आधी शिक्षण करिअर पूर्ण करायला सांगितलं..

केतनला सहज नेहाला पळवता आल असतं.. पळून लग्न करून म्हणजेच घाईघाईत निर्णय घेऊन नंतर एकमेकांना दोष देणं कोणालाही अवघड जात नाही.. आयुष्यात सर्वच कठीण नसते.. फक्त आपण ते कठीण करून ठेवतो.. त्यापेक्षा एका वेगळ्या दृष्टीकोनातून विचार केला की सगळं सरळ आणि सोप होते..


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एका वेगळ्या दृष्टीकोनातून विचार केला की सगळं सरळ आणि सोप होते.”

  1. जगण्याची सरळ दिशा दाखवणारा लेख .खपच छान .

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!