Skip to content

लोकांच्या त्रासापेक्षा तुमच्यातल्या शांतीला अधिक महत्त्व द्या.

लोकांच्या त्रासापेक्षा तुमच्यातल्या शांतीला अधिक महत्त्व द्या.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“करुणा अगं किती त्रागा करून घेतेस? जरा शांत होशील का? हे घे पाणी पी.” चेतन करुणाला समजावत होता. पण ती जणू रागाने पेटून उठली होती. कोणाचंच काही ऐकत नव्हती. तिचा राग असा सहजा सहजी शांत होणार नव्हता हे स्पष्ट दिसत होतं. तिला राग येण्याचं कारण होता त्यांच्याच वर्गातला एक ग्रुप.

करुणा आणि चेतन कॉलेजच्या सेकंड ईयरला शिकत होते. दोघंही अभ्यासासोबतच कल्चरल मध्ये पण सक्रिय असायचे. इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असायचा. करुणा डान्समध्ये होती तर चेतन नाटकामध्ये. दोघंही त्यांच्या त्यांच्या कलेमध्ये प्रवीण होते.
त्यामुळे अश्या स्पर्धांमध्ये शिक्षकांचा कल पण यांच्याकडे असायचा. यांनीच आपल्या कॉलेजच प्रतिनिधित्व करावं असं त्यांना वाटायचं.

पण कॉलेज मध्ये अशीही काही मुलं होती ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असायचा. पण ते शक्य व्हायचं असं नाही. त्यांच्यामध्ये चांगले कलागुण होते तरीही फक्त यांच्यामुळे त्यांना घेतलं जात नव्हतं असा भाग नव्हता. पण अशी काही मुलं होती ज्यांची धारणा झाली होती की आपल्याला यांच्यामुळे संधी मिळत नाही.

त्यामुळे करुणा काय किंवा चेतन काय यांच्या कामात अडथळे कसे आणता येतील याकडे त्यांचा कल होता. चेतन नाटक बसवायचा. त्यामुळे त्यात कोणाला घ्यायचं कोणाला नाही तेही त्याच्याकडेच असायचं. अश्या वेळी तो कोणालाही घेत नसे. हेच नेमकं त्या मुलांना खुपत होतं. पण इथे गोष्ट अशी होती की चेतनचं कुणी काही बिघडवू शकत नसे. कारण त्याच्यावर कोणाचा काही परिणाम व्ह्यायचा नाही.

पण करुणा, त्याची खास मैत्रीण; ती मात्र जरा काही मागे पुढे झालं की अस्वस्थ व्हायची, चिडायची. हेच एक कारण पुरेसं होत तिला त्रास द्यायला. स्पर्धा आता तोंडावर आल्या होत्या. सराव जोरदार चालू झाला होता. अशा वेळी सरावात अडथळा येईल असं काहीतरी करणं, सरावाच्या दृष्टीने महत्त्वाचं असणारं सामान कुठेतरी घालवून टाकणं अश्या गोष्टी होऊ लागल्या.

करुणाला माहीत होतं की हे सर्व कोण करत आहे. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं. पण हे वरचेवर होऊ लागलं तशी तिची देखील चिडचिड होऊ लागली. आज पण तसच झालं होत आणि आज तिला राग पण असह्य झाला. इतका की एरवी चेतनचं पटकन ऐकणारी ती आज त्याचा एक शब्द ऐकायला तयार नव्हती.

“तू मला शांत व्हायला सांगत आहेस. अरे ही लोक कशी वागतात हे तुला दिसत नाही का? यांना का समजत नाही की हे सर्व करून ती आपल्याच कॉलेजच नुकसान करत आहेत. हा सराव, ही मेहनत आपण का करत आहोत? आपल्या कॉलेजचं नाव व्हावं म्हणून ना! तरी देखील ही मुलं आपल्यालाच मागे खेचत आहेत. आणि तू म्हणतोस शांत हो.

तुला त्रास होत नाही का या सगळ्याचा. त्यांचं त्रास देणं तुला जाणवत नाही का? इतका शांत कसा राहू शकतोस तू?” तिच्या बोलण्यातून तिचा राग स्पष्ट जाणवत होता आणि तो वाढत देखील होता. तरी चेतन शांत होता. तो तिला पाणी देत म्हणाला, “करुणा तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. त्यांना खरंच समजत नाहीये की ते कॉलेजचं नुकसान करत आहेत. म्हणून ते अस वागत आहेत. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येत आहे का? त्यांनी कितीही त्रास दिला तरी आपलं काम त्याने खराब होणं न होणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

तू विचारते आहेस ना, इतकं सर्व होऊन मी शांत कसा असतो? अगं कारण मला त्यांच्या त्रासापेक्षा माझ्या मनाची शांतता जास्त महत्त्वाची वाटते. मी त्यांचा त्रासाला माझ्यापर्यंत पोहोचू देतच नाही. आणि याने काय होत माहीत आहे? त्यांनी काहीही केलं तरी त्याचा माझ्या कामावर परिणाम होत नाही. त्यामुळे माझा नाही तर त्यांचा त्रास अधिक वाढतो.

आता तू इतकी चिडचिड करत आहेस, इतका त्रास करून घेत आहेस, याचा तुझ्याच कामावर परिणाम होणार नाही का? आणि हेच होणं त्यांना अपेक्षित आहे. तू अशी चिडचिड करून त्यांना अपेक्षित असलेलं करत आहेस. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कोणी कसंही वागले तरी त्याचा आपल्यावर किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे.

आपल्याला काय महत्वाच आहे? ही अशी माणसं, त्यांचं वागणं की आपल्या मनाची शांतता. हे आपण ठरवायचं आहे. कारण आपल्या मनस्थितीचा आपल्या कामावर प्रभाव पडत असतो. कोणी अत्याचार करत असेल तर तो सहन करायचा नाही हे बरोबर आहे. पण सहन करायचा नाही म्हणजे स्वतः ला त्रास करून घ्यायचा अस नाही. काही वेळा एखाद्या गोष्टीला महत्त्वचं न देणं, त्याचा फरकच न पाडून घेणं हेच योग्य प्रत्यित्युर असू शकत. आता तू ठरव, चिडचिड करून कामावर परिणाम करून घ्यायचा की आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून त्याचा भाषेत त्यांना योग्य उत्तर द्यायचं.” चेतनला त्यानंतर कधी तिला समजवावं लागलं नाही. कारण तिला तिचं उत्तर मिळालं होतं.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!