Skip to content

स्वतःचं मत मांडणे कधी कधी खूप गरजेचं असतं, नाहीतर..

स्वतःचं मत मांडणे कधी कधी खूप गरजेचं असतं, नाहीतर..


मेराज बागवान


‘मत’,म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीविषयी, माणसाविषयी काय वाटतं ते.त्याचे त्याविषयी असणारे विचार,दृष्टिकोन म्हणजे मत.प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे असे मत असणे गरजेचेच असते.हे मत शिक्षणामुळे,जीवन जगण्याचा अनुभवामुळे,आत्मविश्वासमुळे मांडता येऊ शकते.पण कधी कधी शिक्षण आणि इतर सर्व गोष्टी असूनही काही जण स्वतःचे मत मांडत नाहीत.त्याला विविध कारणे असू शकतील.जसे की,मत मांडायला घाबरणे,लोक काय म्हणतील हा विचार,आतून वाटणारी एक प्रकारची भीती यामुळे मत मांडणे राहून जाते.पण स्वतःच मत मांडणे कधी कधी खूप गरजेचं असत,नाहीतर अनेक गोष्टींना तुम्हाला सामोरे जाऊ लागू शकते.

आयुष्यात विविध गोष्टी,घटना घडत असतात.घरात तसेच बाहेर देखील.कधी कधी तो विषय खुप वाढत जातो.मग अशा वेळी तुम्ही स्वतःचे मत मांडणे अपरिहार्य होते.जसे की ,घरात काही आर्थिक अडचणी असतील किंवा नात्यांमध्ये भांडणे असतील तर त्यावेळी तुम्ही व्यक्त होणे,त्या गोष्टीविषयी मत मांडणे खूप आवश्यक असते.तुम्ही घरातील एक सदस्य असतात त्यामुळे तुमचा त्या गोष्टीशी खूप जवळचा संबंध असतो.म्हणून तुम्ही मत मांडलेच पाहिजे.नाहीतर तुम्ही,गृहीत धरले जाऊ शकतात.तसेच अनेक गैरसमज देखील निर्माण होऊ शकतात.

एक मुलगा आणि मुलगा रिलेशनशिप मध्ये असतील किंवा लग्न ठरविण्याआधी मुला-मुलींनी स्वतःचे लग्नाविषयीचे किंवा रिलेशनशिप विषयीचे स्वतःचे मत मांडणे खूप महत्वाचे ठरते.खासकरून लग्न ह्या विषयात तर उघडपणे बोलणे,मत मांडणे आवश्यकच असते.नाहीतर लग्न झाल्यानंतर अनेक गोष्टी उघड झाल्या तर आयुष्यभराचे नुकसान होऊ शकते. म्हणून वेळीच मत मांडायला शिका.

तुम्ही ऑफिस मध्ये काम करत असताना अनेक लोकांसोबत काम करीत असतात.त्यावेळी विविध लोकांचे स्वभाव समजू लागतात.त्यांचे वागणे,बोलणे लक्षात येऊ लागते.आणि ह्यामध्ये जर काही खटकणार्या गोष्टी असतील तर वेळीच त्यावर मत मांडले पाहिजे.नाहीतर त्या नकारात्मक गोष्टीत काही बदलच होणार नाही.आणि तुम्ही नेहमी त्रासातच राहाल.

आयुष्य विविध रंगी असते.सर्वांचे स्वभाव ,दृष्टिकोन वेगवेगळा असतो. काही वेळेस वाद नकोत किंवा अहंकार यामुळे माणसे काहिच बोलत नाहीत.स्वतःचे मत मांडत नाहीत.पण अशा ने सर्वांचेच नुकसान होते.एखादी व्यक्ती चुकीची वागत असेल तर कोणीच काही मत न मांडल्यामुळे ती व्यक्ती आहे तशीच वागते त्यात तिला काहीच गैर वाटत नाही.आणि हे टाळायचे असेल तर मत मांडायला शिका.

एखादा स्वतःच्या आयुष्याचा महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तर ठाम मत असणे गरजेचेच असते.जसे की ,करिअर,शिक्षण,लग्न,नोकरी इत्यादी.ह्या गोष्टींमुळे जीवनाला संपूर्ण कलाटणी च मिळत असते.त्यामुळे ,मला ह्या गोष्टींविषयी काय वाटते,माझे ह्या विषयी मत काय हे खूप महत्त्वाचे असते.नाहीतर मग जर तुम्ही काहीच बोलला नाहित तर दुसरे कोणीतरी तुमच्या आयुष्याचे निर्णय कायम घेत राहील.आणि पुढे जाऊन तुम्हाला त्या गोष्टी आवडत नसूनही स्वीकाराव्या लागतील तेव्हा मात्र तुम्हाला खूप मानसिक त्रास होईल.

गोष्ट कोणतीही असो, कधी कधी स्वतःचे मत मांडणे अपरिहार्य ठरते.त्यावेळी निःशंकपणे,बिनधास्तपणे स्वतःचे मत मांडायला शिका.म्हणजे पुढे जाऊन कोणताही मानसिक त्रास होणार नाही.तसेच लोक तुम्हाला गृहीत देखील धरणार नाहीत.आयुष्य कसे जगायचे याची मुभा प्रत्येकाला आहे.व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला दिले गेले आहे.कारण प्रत्येक व्यक्ती एकमेव असते,स्वतंत्र असते.म्हणूनच तुम्ही हा अधिकार वापरला पाहिजे.ह्यात तुमचे आणि इतरांचे देखील भले आहे.

जेव्हा तुम्ही मत मांडता तेव्हा सर्व गोष्टी स्पष्ट होण्यास मदत होते.गैरसमज दूर होऊ शकतात.कोणतीच ‘रिग्रेट’ ची भावना मानत राहत नाही.मन मोकळे होते आणि एक प्रकारची मानसिक शांतता मिळते.नाहीतर मग फक्त आणि फक्त गुंता वाढत जातो.म्हणूनच मत मांडायला शिका.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!