Skip to content

खंत आणि काही अपूर्ण जरी वाटत असलं तरी आपण पुढे चालत रहायला पाहिजे.

खंत आणि काही अपूर्ण जरी वाटत असलं तरी आपण पुढे चालत रहायला पाहिजे.


हर्षदा पिंपळे


आयुष्य मिळालं आहे तर भरभरून जगावं असं अनेकदा वाटत असतं.आयुष्यात सगळ्या गोष्टी करून पहाव्यात असं प्रत्येकाच्या मनात असतं.प्रत्येकाची वेगवेगळी छोटी मोठी अनेक स्वप्नं असतात. इच्छा असतात.करिअर गोल्स, रिलेशनशिप गोल्स अशा विविध गोष्टी यात समाविष्ट असतात.एखादं टुमदार घर,एखादी गाडी असावी,जगाची सफर करावी अशी एक बकेट लिस्टच असते.

तर या सगळ्या गोष्टी नेहमीच पूर्ण होतात का ?
किंवा सगळ्या गोष्टी या मनासारख्याच होतात का ?

तर,नाही. अनेकदा कित्येक गोष्टी या पूर्ण होत नाही. किंवा कधी कधी त्या वेळेवर पूर्ण होत नाहीत. मनासारख्या होत नाहीत. वयाच्या तिशीत असताना वाटत राहतं की,कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या. कधी कधी वाटत राहतं , गाणं शिकता आलं नाही. क्रिकेट खेळता आलं नाही.तारूण्यात वाटतं बालपण जगता आलं नाही.पन्नाशीत वाटतं, अरेरे…तारूण्य असचं गेलं.इच्छा होती, स्वतःचं कोकणात एक तरी घर असावं.तिच्यासोबत एक संध्याकाळ तरी मनसोक्त अनुभवता यायला हवी होती.

अशा अनेक गोष्टी असतात. या अशा कित्येक गोष्टी पूर्ण झालेल्या नसतात. त्याची खंत मनात कुठे ना कुठे वाटत असते.अशा परिस्थितीमध्ये “असचं होतं माझ्या आयुष्यात. कधीच मला हवं ते मिळत नाही. कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही. माझं नशीबच खूप वाईट आहे. काय करू म्हणजे सगळ्या गोष्टी पूर्ण होतील.” असा संवादही अनेकदा स्वतःशी साधला जातो. इतके वैतागलेले असतो आपण.अर्थात कुठेतरी या सगळ्यामुळे आपल्याला काहीतरी राहिलय असं सातत्याने वाटत रहातं.अनेकदा या सगळ्यात आपली गाडी सहसा पुढे लवकर सरकत नाही. आपण एकाच ठिकाणी घुटमळत राहतो. खंत करत बसतो.

पण गोष्टी पूर्ण होत नाहीत म्हणून खंत करण्यात काहीच अर्थ नाही. एकाच जागी विचार करण्यात आपलाच वेळ खर्च होत असतो.म्हणून कितीही मोठी खंत असली,गोष्टी अपूर्ण वाटत असल्या, तरीही पुढे चालत रहायला हवं.
कदाचित, जे आज घडलं नाही उद्या ते नक्कीच घडू शकतं.पुढे नवीन काहीतरी असू शकतं.

खूप, साधं सोपं असं आपल्याचं जगण्याचं गणित असायला हवं.आयुष्यात कितीही गोष्टी निसटून जाऊद्यात,आपण मात्र नदीसारखं कायम प्रवाही व्हायला हवं.एखाद्या गोष्टीची कायमस्वरूपी खंत न बाळगता
जे मिळवायचय त्यासाठी प्रयत्नशील रहायला हवं.

माना की मुश्किल है सफ़र
पर सुन ओ मुसाफिर
ओ,कहीं अगर तू रुका तो
मंजिल आएगी ना फिर…

कदम कदम मिलाये जा
गगन गगन झुकाए जा
रख हौसला कर फैसला
तुझे वक्त बदलना है…

डर ना तू बंदेया
रुक ना तू बदेया
राह पे चल बंदेया…

(- सिम्बा चित्रपटातील गाण्याच्या ओळी )

सिम्बा चित्रपटातील या गाण्याच्या ओळी मनाला खरोखरच उभारी देणाऱ्या आहेत.आयुष्यात कितीही काहीही होऊद्या,आयुष्य कितीही अवघड वळणावर येऊद्या,आपण मात्र थांबायचं नाही. घाबरायचं नाही. पुढे चालत रहायचं.हेच या गाण्याच्या ओळी सांगून जातात.

तर,प्रत्येकाने हे लक्षात ठेवा.किंवा मनावर ते बिंबवून घ्या.की,आयुष्यात कधीतरी काहीतरी अपूर्ण वाटत राहणार, चुकल्यासारखं वाटत राहणार,एखाद्या गोष्टीची खंत वाटत राहणार. हे नैसर्गिक आहे.आणि हा आयुष्याचाच एक भाग आहे. हे एकदा स्विकारलं तर सगळ्या गोष्टी सहज सोप्या होतील.

गोष्टी निसटतील,अपूर्ण राहतील.आपण मनाने खचायचं नाही.आपणच नव्या वाटा शोधत क्षितीजाला कवेत घ्यायचा प्रयत्न करायचा.आपण आपली मशाल कायम पेटती ठेवायची.आणि अंधारातून उजेडाकडे मार्गक्रमण करत रहायचं.हेच तर जीवन असतं.हीच तर जगण्याची खरी गंमत असते.पुढे जायचं की घुटमळत बसायचं याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण असे प्रसंग एकदा नाही तर अनेकदा आयुष्यात येऊ शकतात. म्हणून पुढे चालणं गरजेचं आहे.

चला,झालं गेलं विसरून पुढे मार्गस्थ होऊयात.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “खंत आणि काही अपूर्ण जरी वाटत असलं तरी आपण पुढे चालत रहायला पाहिजे.”

  1. धन्यवाद की आभार हे शब्द ही कमी आहेत..आज आपले लेख खूप बहुमूल्य ठरत आहेत..आयुष्यात आज अनेक प्रॉब्लेम सुरू आहेत.कर्ज patnarship की भोऊबंधकि.आर्थिक त्यात फॅमिली यात ना जीव घाईला येतो जगणे मुशिकल होवून बसले आहे..विचार संपत नाहीत मार्ग सापडत नाही…अश्या वेळी आपले शब्द लेख खूप मार्ग देतात कुठेतरी avshadh गोळी चे काम करतात…मी आपला शतशा आभारी आहे…असे लेख मार्गदर्शन राहूदे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!