प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं कोणाचीच होऊ शकत नाही.
सोनाली जे.
माणूस जेव्हा केवळ त्याचा फायदा विचारात घेवून पुढे जातो तेव्हा तो माणुसकी विसरतो आणि कोणाचाच होवू शकत नाही. कारण तो केवळ त्याच्या पुरता मर्यादित विचार करत असतो. त्याचा त्या वेळी होणारा फायदा , स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात.
.म्हणजे त्यात दूरदृष्टीने लाँग टर्म व्यवहार असतील किंवा नाते टिकावे म्हणून कोणताच विचार नसतो.
परवाचे एक ताजे उदाहरण सांगावे वाटते. नेहमीचा भाजीवाला आहे त्यालाच लागून एक नवीन भाजीचे दुकान सुरू झाले .त्यांच्या दुकानात त्यांनी सगळी भाजी, फळे , कडधान्ये ठेवली आहेत. नवीन ग्राहकांच्या सोबत अतिशय अदबीने , गोडी ने बोलत असतो तो. एका बाईने अननस घेतला दुकानदाराला काप करून मिळतील का विचारले, तो हो म्हणाला. त्याच्या माणसाने अननसाचे साल सोलून काढले. तर एका बाजूचा थोडा भाग खराब होता. ती घेणारी बाई म्हणाली तो खराब आहे. दुसरा द्या. तर दुकानदार पटवत होता की हा चांगला आहे , तयार आहे अननस , गोड आहे. खराब निघाला तर परत घेवून या , बदलून देईन . शेवटी त्या बाईने घेतला .
पण ती बाई परत त्याच्या दुकानात गेली नाही आणि इतरांना ही तिने तिचा अनुभव सांगितला. त्यामुळे इतरांनी जाणे ही सोडले. त्याचे दुकान ही काही काळाने बंद पडले.
याउलट जुन्या भाजीवाल्याने लोकांना खूप छान जपले होते. त्याची गिऱ्हाईक ही दुसऱ्या कुठेच जात नसत. दोन चार रुपये ही तो सोडत असे. पण कधीच त्याच्यकडे खराब भाजी , फळे नसतं.
त्याच्याकडे ही एक बाई तयार पपई द्या म्हणून आली. आताच कापायची आहे. त्याने सांगितले ही घ्या ही गोड आहे. आता नक्की खाता येईल. त्या बाईला पटले नाही तर त्या भाजोवाल्याने तिला ती पपई कापून दिली. ती कापताना नेहमीचे गिऱ्हाईक असून ती बाई म्हणाली की, कापली आणि पपई चांगली नाही निघाली तर मी पैसे देणार नाही. तो ठीक आहे नका देवू पैसे म्हणाला पण मी फसवणार नाही , खात्री करून घ्या. आणि त्याचे दोन तीन तुकडे खायला दिले. तिची खात्री झाली की पपई चांगली तर आहेच, पण तयार आणि खाण्यास अतिशय गोड आहे. मग तिने त्याला पूर्ण पैसे दिले. आणि अजून एक पपई घेवून गेली.
सांगायचा मुद्दा हा की नवीन भाजीवाला नुसता गोड बोलून खराब गोष्टी ही खपविण्याचा प्रयत्न करत होता. आणि केवळ स्वतः चा फायदा बघत होता .त्याच्याकडे गिऱ्हाईकांनी पाठ फिरविली .मात्र जो नेहमीचा होता तो स्वतच्या फायद्या पेक्षा गिऱ्हाईक महत्वाचे आणि त्यांचे समाधान महत्वाचे मानत होता त्यामुळे त्याची जुनी गिऱ्हाईके ही टिकून होती.
प्रेमात, नात्यात ही असेच होते जर काही फायदा समोर ठेवून नाती जोडली तर ती टिकत नाहीत. अशी फायदा बघणारी लोकं कोणाची होवू शकत नाहीत.
निखिल आणि उर्मी खूप छान मैत्री दोघांची. दोघे बरेचवेळा एकत्र असतं. बाहेर जाणे , हॉटेल, पिकनिक दोघांना एकमेकांची कंपनी खूप आवडायची. पैसे हा विषय कधी आड येत नसे. दोघापैकी जे कोणाकडे असतील ते खर्च करत. निखिल कधी ही अचानक सांगायचं उर्मी ला की पुढच्या अर्ध्या तासात इथे भेट आपण अमुक ठिकाणी जात आहोत. तमुक ठिकाणी जात आहोत. उर्मी ने कधी ही नकार दिला नाही. कुरकुर केली नाही. ती बरोबर वेळेत तिथे पोहचत असे. आणि अगदी खाण्या पिण्याच्या गोष्टी सकट.
एकदा मात्र उर्मी खूप वैतागली होती. तिला मोठ्या ट्रीप वर जायचे होते. बदल हवा होता. मस्त एन्जॉय करण्याच्या मूड मध्ये होती. आणि तिला तशी मस्त साथ देणारी कंपनी जो निखिल च देवू शकत असे त्याची कंपनी पाहिजे होती. दुर्दैवाने सिमला , मनाली जाण्याकरिता पैसे ही नव्हते तिच्याकडे . तिने नेहमी प्रमाणे निखिल ला सांगितले की आपल्याला जायचे आहे. आठ दिवस काढ ..आणि पैसे ही . जमतील तसे मी ही देईन.
तेव्हा पहिल्यांदा निखिल कडून आले की , बर्फात , सिमला , मनालीला तुझ्या सोबत जाण्यापेक्षा मी शिरीन सोबत म्हणजे त्याची मुलगी ,तिच्या सोबत जाईन . ती केवढी खुश होईल. तिने ही
निखिल चे लग्न होवून दोन मुले होती त्याला.एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी अतिशय लाडकी. ती म्हणेल ती इच्छा, हट्ट तो पूर्ण करत असे.
उर्मी ला मात्र प्रकर्षाने जाणवले की आजपर्यंत निखिल केवळ त्याच्या इच्छेने , त्याला कंपनी पाहिजे तेव्हा मात्र लगेच फोन करून उर्मिला ये म्हणे. त्याला इतर ही मित्र मैत्रिणी होते पण उर्मी एव्हढे कोणीच जवळचे नव्हते.
पण उर्मी आणि निखिल ची ही मैत्री त्याने त्याच्या फायद्याचा , त्याच्या मुलीचा च केवळ विचार केला तेव्हा तुटली. त्याने परत गोड बोलून तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला तरी ही उर्मी ने मात्र त्याची परत कधीच मैत्री तिने स्वीकारली नाही. कारण तिने त्याच्याशी निस्वार्थी मैत्री केली होती. कधीच कोणत्या गोष्टीचे हिशोब केले नव्हते. पण जेव्हा त्याच्याकडून असे केवळ त्याच्या आणि त्याच्या मुलीच्या फायद्याचे , त्यांच्या आनंदाचे बोलणे आले आणि त्यात उर्मी ला स्थान नाही याची जाणीव झाली तेव्हा मात्र उर्मी खूप दुखावली गेली. आणि अशी केवळ फायद्याचा विचार करणारी मैत्री नकोच असा विचार करून निखिल पासून कायमची दूर गेली.
असेच आहे मैत्री ,. नाते, व्यवसाय , भागीदारी , प्रेम असो अथवा एकत्र काम करणारे सहकारी असोत केवळ स्वार्थ , साधून , स्वतः ची कामे करून घेण्यासाठी कोणी जवळ आले तर , किंवा प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं कोणाचीच होऊ शकत नाही.
आयुष्य सुंदर आहे. आणि अजून सुंदर आणि सुखकारक होण्यासाठी आयुष्यात कायम कोणाची ना कोणाची साथ , मैत्री , सोबती , मदतनीस यांची गरज लागते. केवळ समोरच्या कडून फायदा करून घेणारी माणसं कोणाचीच होऊ शकत नाहीत म्हणून आपला आणि समोरच्याचा फायदा करून देणारी माणसे कायम एकमेकांच्या संपर्कात टिकतात. राहतात. तसेच एकमेकांच्या भावना समजून घेणारी , केवळ सुखात साथ देणारे आणि दुःखात पळून जाणारे असतील तर त्यांना आधार देणारे कोणी येत नाही. याउलट सुख , दुःख , मदत यात एकमेकांना साथ देणारी निस्वार्थी माणसे ही कायमच सगळ्यांची होतात. याउलट केवळ स्वतच्या फायद्यासाठी गोष्टी करणारी माणसं कोणाचीच होऊ शकत नाही.
अगदी वाल्या कोळ्याची गोष्ट उलट अर्थाने बघा . त्याने पाप करून, लुटमार करून पैसे कमवून कुटुंबाला ऐशो आराम दिला तेव्हा कुटुंब अगदी त्याचे भरभरून कौतुक करत असे , त्याला विचारत असे. किंमत देत असे. वाल्याने त्याच्या पापा मध्ये सहभागी होणार का कोणी असे विचारले तर कुटुंबीयांनी नकार दिला. त्यांना केवळ वाल्या कडून पैसा पाहिजे होता, सुखाचे जीवन पाहिजे होते.
पण वाल्याचा वाल्मिकी झाला त्याने त्याचा विचार केला तेव्हा त्याचे कुटुंबीय ही त्याला सोडून गेले.
इथे थोडा विरोधाभास जाणवेल. हे उदाहरण चुकीचे ही वाटेल पण पूर्ण विचार करा तेव्हा जाणवेल की स्वतच्या फायद्याकरिता वाल्या चे कुटुंब त्याच्या जवळ आले ..हेच वाल्याने त्याच्या फायद्याचा विचार केला. पापमुक्त होण्याचा , प्रायश्चित्त घेण्याचा तेव्हा तो कुटुंबाचा राहिला नाही. त्याचे कुटुंबीय त्याचे राहिले नाहीत. तो एकटा पडला.
आयुष्यात आपली माणसे , आपल्या सोबत असणारी , आपला विचार करणारी, प्रेम देणारी तेवढ्याच हक्काने घेणारी फार कमी मिळतात. अशा व्यक्तींना मात्र कायम जपा. आणि कोण स्वार्थी आहे याची पक्की खात्री करा.
All the best.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


खूप छान