Skip to content

जर काहीच लोक तुमच्या पासून खुश नसतील, तर त्या काहींसाठी तुमची तत्त्वे बाजूला सारू नका.

जर काहीच लोक तुमच्या पासून खुश नसतील, तर त्या काहींसाठी तुमची तत्त्वे बाजूला सारू नका.


मयुरी महाजन


जीवनाचा प्रवासात कितीतरी माणसे भेटतात, काही रक्ताच्या नात्याने आपली असतात, तर काही मनांनी जोडलेली नाती असतात ,ज्याला मैत्री सारख्या प्रेमळ नात्यात त्याची गुंफण होते, जीवन जगताना या प्रवासात सर्वच लोक आपल्यापासून खुश असतील, असे कधीही होत नाही,

प्रत्येक वेळी प्रत्येकाला खुश ठेवणं आनंदी ठेवणं यासाठी आपण किती जरी अटोकाट प्रयत्न केला, तरी प्रत्येक वेळी ते शक्य होईलच, असे नाही, पण म्हणून काही आपण त्या काहींसाठी आपली तत्त्वे बाजूला सारून द्यावी का? जर आपण असं करत असणार ,तर आपण स्वतः सोबत चुकीचे वागत आहोत ,

जर प्रत्येकाच्या आनंदानुसार आपण आपली तत्त्वे बाजूला सारून त्यानुसार स्वतःला बदलवत राहिलो, तर आपल्या स्व अस्तित्वाचा उपयोग तरी काय, आपण आपल्या तत्वाला ठाम राहिलो व आपल्या तत्त्वावर आपला पूर्ण विश्वास असेलं, की आपली तत्त्वे योग्य आहेत, तर काहींना ते मान्य नसेल व ते खुश नसतील, तर त्या काहींसाठी आपली तत्त्वे बाजूला सारून नये,

कारण की त्या तत्त्वांची ओळख पटल्यावर हिच नाखुश मंडळी सर्वप्रथम हार गळ्यात घालायला तयार असतील , चांगल्या रस्त्याला गतिरोधक व चांगल्या माणसाला विरोधक असतात, आणि असलेचं पाहिजे, मग त्याशिवाय प्रगती होत नाही असे म्हणतात, फक्त चालण्याची वाट आपली असते, व त्या वाटेवरचा प्रवासही आपलाच असतो, आपल्या तत्त्वात न बसणाऱ्या गोष्टींना कधीच पाठिंबा देऊ नका,

पण आपल्या तत्वांची प्रगल्भता जरुर वाढवा, प्रत्येकाच्या खुश राहण्याच्या आनंदी राहण्याच्या व्याख्याच निरनिराळ्या असतात, म्हणून एखाद्या गोष्टीचा एखाद्याला खूप आनंद असतो, तर तो दुसऱ्याला त्याचा तिटकारा वाटतो, हे प्रत्येकाच्या नीती मूल्यांवर अवलंबून आहे, ज्यामुळे ते खुश होतात ,किंवा निराशेच्या गर्दीत गटांगळ्या खातात,

मला असे वाटते ,आपण आपल्या तत्त्वावर खुश असलो, तर इतरांच्या खुशीचा विचार करत असताना आपला स्वतःला खुश ठेवणे हे सुद्धा आपले प्रथम तत्त्व असायला हवे, कारण की प्रत्येकाच्या खुश राहण्यासाठी आपण आपल्या स्वतःला पाहिजे तसं बदलणं गरजेचे आहे का?

काही लोक इतकी संशयी असतात, की त्यांना चांगल्या गोष्टीत सुद्धा काहीतरी कमतरता शोधूनच काढायची असते ,जसं की दृष्टीचा इलाज होतो, दृष्टीकोनाचा नाही, त्यासाठी जर काहीच लोक आपल्यापासून खुश नसतील, तर त्या प्रत्येकासाठी आपण आपल्या तत्त्वांसोबत तडजोड करत बसू नये ,

आपली तत्त्वे म्हणजे आपल्या जगण्याची खरी सूत्र आहेत, आणि त्या सूत्रांना बाजूला सारणे म्हणजे आपल्या जगण्याला नाकारणे एक प्रकारे, आपला आनंद आपल्यासाठी महत्त्वाचा असायला हवा, दुसऱ्यानुसार स्वतःला बदलत राहिलो तर स्वतःच्या अस्तित्वाची रेषा पुसट होत जाणार….

आनंदाला अवलंबून ठेवून चालत नाही, नाहीतर आनंद हा इतरांवर सोपवला की इतरांची त्यावर मालकी होऊन बसते, प्रत्येकवेळी प्रत्येकाला खुश ठेवणं स्वतःच्या आनंदाला ही मुकणं, कारण प्रत्येक जण त्याच्या पद्धतीने अपेक्षा करत राहणार आणि केलेली प्रत्येक अपेक्षा पूर्ण होईलच असे होत नाही,

काही अपेक्षा कधीच पूर्ण करता येत नाही ,आणि त्या काहीच लोकांसाठी आपण आपली तत्त्वे बाजूला सारणे म्हणजे काहीच लोक आपल्यापासून खुश नसतील, येथे चांगल्या ला चांगलं म्हणणारी माणसे सुद्धा कमी भेटतात, त्यामुळे त्या काहीच लोकांचा जास्त विचार करू नका,

जोपर्यंत माणसाचे एखादे काम तुमच्याकडून पूर्णत्वास जातेय, तोपर्यंत तुम्ही चांगले आहात असे बोलले जाते, पण ज्या दिवशी तुमच्याकडून एखादे काम होत नाही, त्या दिवशी तीच माणसे नाखुश होतात व अशा माणसांमुळे आपण आपले तत्वे का म्हणून बाजूला करावी,

शेवटी काय हो जे तुम्हाला तुमचे मानतात, त्यांना तुमच्या तत्त्वांचीही काळजी असतेच, दुसऱ्यांच्या खुशीनुसार स्वतःला बदलत राहिलात तर स्वतःच्या आनंदाला हरवून जालं….


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “जर काहीच लोक तुमच्या पासून खुश नसतील, तर त्या काहींसाठी तुमची तत्त्वे बाजूला सारू नका.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!