संपण्यासारखं इथे काहीच नसतं, एक नवीन सुरुवात आपली कायम वाट पाहत असते.
सोनाली जे.
आता नुकत्याच दहावी, बारावी या महत्वाच्या आणि इतर ही परीक्षा संपल्या आहेत. या सगळ्या मुलांना असे वाटते की चला परीक्षा संपली. अभ्यास संपला. सुटलो बरे! hurreye! पण खरे तर दहावी असेल बारावी तर पुढचे शिक्षण आणि त्याकरिता अजून जास्त अभ्यास करावा लागतो. म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण हे उलट जास्त अवघड आणि आपल्याला सतत व्यस्त ठेवणारे असते. म्हणजे संपण्यासारखं इथे काहीच नसतं, एक नवीन सुरुवात आपली कायम वाट पाहत असते. शालेय शिक्षण संपले की महाविद्यालयीन , मग उच्च शिक्षण , नोकरी, ती मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी सतत स्किल develop करत राहणे गरजेचे असते. थोडक्यात शेवट झाला म्हणले की नवीन सुरुवात कायम आपली वाट बघत असते.
नात्यात ही तसेच आहे. प्रेम, विश्वास , आदर , आपलेपणा , ओढ यातून .काही वेळेस क्षणात नाती बनतात. पटकन एखादी व्यक्ती जवळची होवून जाते. तर काही वेळेस वर्षानुवर्ष साथ , सोबत असूनही नाती जुळत नाहीत. जवळीक निर्माण होत नाही. तर काही नाती सुरुवातीला खूप छान असतात. घट्ट असतात. पुढे जावून ती हळूहळू कुठे तरी बिघडू लागतात. याचे कारण नात्यात कुठे तरी गैरसमज , कुठे तरी अविश्वास, अपेक्षाभंग, वादावादी होत जातात आणि चांगले नाते हळूहळू बिघडू लागते आणि दुरावते.
तेव्हा मात्र असे वाटते की आता सगळे संपले. मग अगदी फोन number ही ब्लॉक केले जातील, सोशल मीडिया वर ब्लॉक केले जाते. एव्हढे की एकमेकांशी आधी अगदी चांगले असलेले नाते वैरी आहोत असे होते.
तेव्हा मात्र दोघांची मानसिकता ही असते की मलाच मानसिक त्रास होतो या गोष्टीचा ..त्या आपल्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होतो. तेव्हा नको ते त्रास , नको ते वाद , आणि नकोच ते नाते असे म्हणून फुल्ल स्टॉप दिला जातो. आता सगळे संपले हीच भावना दोन्हीकडे उरते.
पण थोडे दिवस गेले , किंवा जसजसा वेळ जातो तसे लक्षात येते की कोणत्या तरी किरकोळ , फालतू कारणासाठी आपण गैरसमज करून घेतले. वाद घालत बसलो. जावू देत सोडून देवू ते सगळे आणि पूर्वी चे विसरून परत नव्याने नाते सुरू करू असे होते. तर कधी असे प्रकर्षाने जाणवते की आपले नाते खरेच किती चांगले होते. आणि एकमेकांची एकमेकांना किती मदत होत होती. एकमेकांच्या नात्यांच्या चांगल्या आठवणी , चांगल्या गोष्टी जाणवू लागतात आणि परत आपले नाते हवे हवेसे वाटू लागते. परत unblock केले जाते आणि नव्याने एकमेक कायम साथ राहावे याकरिता प्रयत्न केले जातात.
म्हणजेच संपण्यासारखं इथे काहीच नसतं, एक नवीन सुरुवात आपली कायम वाट पाहत असते. आणि खरोखरच काही वेळेस सगळे जुने विसरून परत नव्याने नात्याची सुरुवात होते. आणि ते नाते अजून दृढ होत जाते कारण आधीच्या सकारात्मक गोष्टी आणि आताची सकारात्मकता ही नात्याला घट्ट बांधून ठेवते.
तर काही वेळेस जुनी नाती कायमची तुटतात. पण तिथे नवीन नाती निर्माण होतात. कारण सतत जुन्या गोष्टीत , नात्यात अडकल्याने आजूबाजूच्या इतर व्यक्ती सोबत असतात त्यांच्याकडे लक्ष गेलेच नसते.
तसेच आहे काहीवेळेस शिक्षणात अपयश येते, ते विषय परत नकोच असे होते मग ती शाखा सोडून दिली जाते. क्षणभर वाटते संपले सगळे. पण मागव दुसरी शाखा निवडली जाते. आणि नवीन सुरुवात केली जाते ज्यात आवडीने , उत्साहाने अभ्यास करून प्रगती केली जाते. कधी नोकरी जाते , कधी आर्थिक फटका बसतो, नुकसान होते तेव्हा वाटते आता संपले सगळे. पण जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे, ती थोडी तरी सकारात्मक आहे किंवा तिला आधार देणारे असतील , किंवा काळ हे सगळ्या वरचे उत्तम औषध. काळ गेला की कोणतेही दुःख , त्रास याची तीव्रता कमी होते. आणि परत माणूस आशावादी होतो.
परत प्रयत्न करू लागतो. नोकरी गेली तर यापेक्षा चांगली नोकरी शोधण्याच्या मागे लागतो. त्याकरिता नवीन स्किल शिकून घेतो. स्वतः मध्ये बदल घडवून आणतो. पूर्वीचा अनुभव असल्यामुळे आत्मविश्वास अजून जास्त वाढतो. त्यातून नवीन नोकरी मिळवतो, तर कधी नवीन व्यवसाय सुरू करतो. तर कधी आधीच्या व्यवसायात प्रगती करताना ज्या चुका झाल्या तो अनुभव लक्षात घेवून त्या चुका सुधारून पुढे चांगली प्रगती करतो. एक नवीन सुरुवात प्रत्येक अनुभवातून तो करत असतो.
आयुष्य खरच सुंदर आहे. आणि जे क्षण मिळाले आहेत ते भरभरून जगा. सगळे संपले असे म्हणून कधीच हताश होवू नका. निराश होवू नका. नाती काही काळ दुरावतात तेव्हा वाटते की संपले सगळे. पण जी नाती एकमकांशी घट्ट बांधली गेली आहेत. ज्या नात्याने खूप आनंद , सुख आणि दुःख या सगळ्यात साथ दिली आहे. याचीं जाणीव कधी ना कधी होतेच. आणि परत ती नाती सगळे विसरून नव्याने एकत्र येतात. तर कधी ती नाती खरेच जर केवळ स्वार्थाने एकत्र आली असतील , जवळ असतील तर कायमची दुरावतात. पण मग अशी जी खरेच निस्वार्थी नाती असतात , व्यक्ती असतात त्या पुढे जावून नव्याने नात्यात येतात. नवी अतिशय आनंद , सुख देणारी , उत्साह वाढवणारी नाती निर्माण होतात.
देश सोडून परदेशी गेले की वाटते सगळे संपले आता. मात्र तिथे परत नव्याने सुरुवात केली जाते. छान जागा शोधली जाते. तिथे गरजेच्या सगळ्या वस्तू घेतल्या जातात. आजू बाजूच्या , तिथल्या कॉलेज असेल, ऑफिस असेल , शेजारील व्यक्ती असतील अशा अनेक नवनवीन व्यक्तींची ओळख होत जाते. तिथल्या ऐतिहासिक गोष्टी , निसर्गरम्य ठिकाणे बघितल्या जातात., तिथले फूड टेस्ट केले जाते. अशी परत विविधता येत जाते. त्यामुळे परत मन उत्साही होत जाते.
दिवस सुरू होताना छानसा सूर्योदय होत असतो. नव्या दिवसाची नवी सुरुवात होत असते. सूर्यास्त होताना दिवस संपून सुंदर असा सूर्याचा लालबुंद गोळा मनोहारी दृश्य दाखवत अस्ताला जातो. आणि दिवस संपून संध्याकाळ होवू लागते मग हळूहळू रात्र. सर्वत्र काळोख , अंधार.जर कालच्या दिवशी निराशा आली असेल, काही दुःख असेल , भावना दुखावल्या असतील तर वाटते सगळे संपले. तरी जसा नवीन दिवस सुरू होतो तसे कालच्या कटू आठवणी विसरून परत नव्या उत्साहाने, नव्या आशेने दिवसाची सुरुवात करते व्यक्ती.
पण हा अंधार कायम राहतो का ? तर नाही . नवीन दिवस सुरू होतो.
टायटॅनिक बोटीवर जाण्यासाठी एका व्यक्तीने आजपर्यंत साठवले असलेले त्याचे सगळे पैसे खर्च करून त्याचे आणि संपूर्ण कुटुंबाचे आधीच तिकीट काढले असते. खूप उत्साहाने तयारी सुरू होते आणि जेव्हा बोट सुटण्याचा दिवस उजाडतो त्या च दिवशी सकाळी त्या व्यक्तीच्या धाकट्या मुलाला कुत्रे चावते. मग त्याची इंजेक्शन आणि त्या धावपळीत तो त्याचे आणि कुटुंबाचे जाणे रहित करतो. खूप वाईट वाटते. खूप आर्थिक नुकसान होते. संपले सगळे असेच वाटते. टायटॅनिक बोट सुटताना ही ते बघतात. संपले आपली संधी गेली म्हणून खूप हळहळ वाटते. आणि चार दिवसांनी च टायटॅनिक बुडाली ही बातमी समजते. तेही वाईट वाटते. पण आपण आणि आपले कुटुंब त्या कुत्र्या ने मुलाला चावले त्यामुळे सलामत राहिले हे बघून तेव्हा त्याची निराशा कुठच्या कुठे पळून जाते. आणि तो परत पैसे कमविण्यासाठी उत्साहाने कामाला लागतो.
जर कालच्या दिवशी निराशा आली असेल, काही दुःख असेल , भावना दुखावल्या असतील तर दिवसच्या शेवटी वाटते सगळे संपले. तरी जसा नवीन दिवस सुरू होतो तसे कालच्या कटू आठवणी विसरून परत नव्या उत्साहाने, नव्या आशेने दिवसाची सुरुवात करते व्यक्ती.
हे चक्र सुरू राहते तसेच कायम लक्षात ठेवा , संपण्यासारखं इथे काहीच नसतं, एक नवीन सुरुवात आपली कायम वाट पाहत असते.
आयुष्य सुंदर आहे. संपले म्हणून हताश होवू नका. आशावादी , सकारात्मक राहून एक नवीन सुरुवात आपली कायम वाट पाहत असते , ती शोधा आणि त्यातून आनंद मिळवा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

