नको असलेली माणसं आपल्याला सहजपणे का सोडता येत नाही??
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
माणूस कधी खरच एकटा असतो का? खूप कमी वेळा अस होत असेल. प्रासंगिक एकटं राहणं आणि खरच आयुष्यभर कोणाच्याही सोबतीशिवाय, कोणाच्याही आधाराशिवाय कोणाच्याही सहवासाशिवाय एकटं राहणं वेगळं. असं प्रासंगिक म्हणजे त्या त्या काळापुरत माणूस कधी ना कधी एकटा राहिलाच असेल. अस घडतच असत. पण मी जन्मापासून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत एकटा राहिलो अस म्हटल तर ते चुकीचं ठरेल.
कारण अस कधी होत नसत. आपलं हे जे आयुष्य आहे ते आपल्यासोबत असलेल्या माणसांनीच सुरू होत आणि माणसांनीच संपत. खूप क्वचित लोक असतील जी हा एकटेपणा अनुभवतात. पण एक सामान्य माणूस म्हणून आपण विचार केला तर आपलं आयुष्य हे माणसांनीच वेढलेल आहे.
आता माणसं म्हटली की त्यांचे स्वभाव आले, त्यांच्या प्रवृत्ती आल्या, त्यांचे वेगवेगळे गुण आले. आपल्याला भेटणारी सर्वच माणसं चांगली असतील किंवा सर्वच जीव लावणारी असतील अस नाही. आपल्या आयुष्याचा जो सुरुवातीचा काही काळ असतो तो आपण आपल्या कुटुंबासोबत घालवतो. इथे जी माणसं असतात ती आपली हक्काची असतात.
या नात्यात खरेपणा असतो, माया, प्रेम असत. पण जसं जस वय वाढत, आपण हळू हळू समाजात जाऊ लागतो, समाजाचा एक भाग होत जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटत जातात. सर्वांचे स्वभाव वेगळे असतात. आपल्या घरातल्या माणसांच्या बाबतीत देखील हे होत.
एकाच घरातील असून देखील स्वभाव वेगळे असतात. पण तरी कुटुंबात सर्वांना सामावून घ्यायची ताकत असते. बाहेर आपल्याला जी माणसं भेटतात ती वेगवेगळ्या कारणांनी भेटत जातात. शिक्षणाच्या निमित्ताने असेल, कामाच्या निमित्ताने असेल. सर्वांसोबत आपलं नात तयार होत असेल अस नाही. पण काहींसोबत होत. नाती तयार होतात, त्यात आपण त्या माणसाशी जोडले जातो.
पण या नात्यांमध्ये आपल्याला अनेकदा अशी माणसं भेटतात, आपण अश्या माणसांशी जोडले जातो जी नंतर आपल्याला नको वाटू लागतात. ज्यांचा सहवास नंतर आपल्याला नको वाटतो. हे असं का होत असेल? तर याला बरीच कारणं आहेत. खराब झालेली वस्तू आपण जास्तीत जास्त दोन दिवस, चार दिवस आपल्या घरात ठेवून देऊ शकतो.
पण त्यानंतर त्यातून दुर्गंधी येऊ लागते. ज्याचा आपल्यालाच त्रास होणार असतो. ही जी काही माणसं आपल्या आयुष्यात आलेली असतात ना ती सुरुवातीला आपल्यासोबत चांगलीच असतात. म्हणून तर नात तयार होत. पण सहवास वाढेल, सोबत वाढेल तस आपल्याला समजू लागत, आपल्या लक्षात येत की ह्या व्यक्ती सोबत राहून आपण आपल नुकसान करून घेत आहोत, आपण कुठेतरी स्वतःचा विकास थांबवत आहोत.
नात आरोग्यदायी आहे अस कधी म्हणावं? तर ज्यामध्ये त्या दोन्ही व्यक्ती एकमेकांना चांगल्या पद्धतीने, सकारात्मकतेने हातभार लावत आहेत. एकमेकांक्या विकासामध्ये त्यांचा कुठेतरी वाटा आहे. मग तो कोणत्याही पद्धतीचा असू शकतो. अगदी वाईट काळात कोणीही सोबत नसताना ह्या एका माणसाने सोबत करण हे देखील विकास घडवून आणू शकत. अस नात असल तर ते आरोग्यदायी म्हणावं. आणि हे कोणतही नात असू शकत. पण याउलट आपण ज्या व्यक्तीसोबत आहोत ती आपल्या प्रगतीमध्ये अडथळाच आणत आहे, मानसिक, शारीरिक दृष्ट्या आपल्या कमजोर करत आहे तर हे अस नात आरोग्यदायी नाही.
अशी अनारोग्यदायी नाती जेव्हा तयार होतात, अशी माणसं जेव्हा आपल्या आयुष्यात असतात, जेव्हा याची जाणीव आपल्याला होते तेव्हा आपण या माणसांसोबत दूर व्ह्यायचा प्रयत्न करतो. पण आपली खरी समस्या ही असते की आपल्याला ही माणसं सहजपणे सोडता येत नाहीत. आपल्याला त्यांच्याशी पटकन नात तोडता येत नाही. आपल्याला या गोष्टीची जाणीव असते की ही व्यक्ती आपला त्रास वाढवतच आहे. पण तरी देखील आपण त्यांना आपल्या आयुष्यातून दूर करायला असमर्थ ठरतो.
याच कारण आपण भावनाशील आहोत. आपल्याला मन आहे. ज्या माणसाशी कधी काळी आपण नात जोडलं आहे त्या माणसाला आता लगेच सोडून देणं, त्यांच्याशी संबंध संपवणं आपल्याला जमत नाही. त्याच प्रमाणे जरी ती व्यक्ती आपल्यासाठी त्रासदायक असली तरी तिने देखील कधी काळी नात निभवालेल असत. असे काही प्रसंग असतात जिथे त्या माणसाने आपली साथ दिलेली असते.
ह्या गोष्टी असतात त्या आपल्याला त्या माणसापासून दूर जाऊ देत नाही. याचबरोबर आपण जर या माणसाला दूर लोटलं तर लोक काय म्हणतील? हा एक भाग देखील यात येतोच. कारण जितकं आपण वैयक्तिक व्हायचा प्रयत्न करतो तितकं ते सामाजिक होत जात अस कोणीतरी म्हटल आहे.
त्यामुळे समाजाचा भाग ही यात येतोच. त्या व्यक्तीला आपल्याला सोडून जायचं नसत, त्यामुळे तिच्याकडून तसे प्रयत्न चालू असतात. या सर्व गोष्टी एकत्र होऊन आपल्यावर आदळतात. त्यामुळे जरी अशी माणसं आपल्याला नको असली तरी त्यांना दूर करता येत नाही.
पण लक्षात घ्या, हे शेवटी आपलं आयुष्य आहे. आपल्याला काही झालं तर लोक आपल्याला आधार देऊ शकतात. पण आयुष्याला आकार द्यायचं काम आपल्यालाच करायचं आहे. भांडं घडवताना जर सामान चुकीचं घेतल तर ते भांडं नीट तयार होऊ शकत नाही. तसच आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर आपल्या आजूबाजूला कश्या प्रकारची माणसं आहेत याचाही आपल्याला विचार करावा लागतो. कारण यांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो.
नात कधी काळी चांगल असूच शकत. पण आता आणि यापुढे ती व्यक्ती आपल्यासाठी पूरक आहे का? हा विचार आपण केला पाहिजे. नात जपणं, माणसं जपणं हा वेगळा भाग आहे. पण या जपवणुकीसाठी चुकीच्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात ठेवणं ही गोष्ट बरोबर नाही. यातून आपण आपलंच नुकसान करून घेत असतो. म्हणून अश्या व्यक्तींना जी आपल्या आयुष्याचं नुकसान करत आहेत त्यांच्यापासून आपण दूर राहणं कधीही चांगल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

त्रासदायक व्यक्ती टाळलीच पाहिजे, पण कसे?
काही व्यक्ती हे तुमचे ऊर्जा शोषक असतात. त्यांची संगत प्रगती थांबवते.क्रय शक्ती घटवते. पण त्यांना कसे दुर करावे ते कळत नाही. ह्या व्यक्ती वैवाहिक संबंधातील असतील तर कायदेशीर अडचणी देखील त्रासदायक ठरतात. अशा वेळी हा जन्म असाच काढुन पुढील जन्माची वाट पहावी लागते.