Skip to content

पालकांच्या स्वभावामुळेच मुलामुलींच्या लग्नात अडचणी येत आहेत?

पालकांच्या स्वभावामुळेच मुलामुलींच्या लग्नात अडचणी येत आहेत?


सोनाली जे.


पूर्वी पुरुष प्रधान संस्कृती होती. त्यामुळे घरचे निर्णय ही पुरुष घेत. व्यवसाय , आर्थिक बाबी, महत्वाच्या सगळ्या गोष्टी या पुरुषांच्या इच्छेने घडत असत. स्त्री ही चूल आणि मूल यापूर्ती मर्यादित .

हळूहळू स्त्री शिक्षण प्रगती होत गेली. एकत्र कुटुंब पद्धती मधून विभक्त कुटुंब पद्धती येत गेली. तसे घरात एकच कर्ता पुरुष न राहता घरातले निर्णय हे सगळेच घेऊ लागले. व्यक्ती स्वातंत्र्य , विचार स्वातंत्र्य याची ही भर पडत गेली.

सगळ्यात मोठी गोष्ट वाढते खर्च पुरे करण्यासाठी income source वाढविण्यासाठी म्हणा किंवा आपण शिकलो मग आपल्याला ही नोकरी , व्यवसाय करण्याचा अधिकार आहे ही स्त्री मानसिकता आणि कुटुंब खर्च भागविण्यासाठी ची गरज यातून स्त्री ही बाहेर पडू लागली. नवरा बायको दोघेही घरा बाहेर पडू लागले. त्यातून बरेचवेळा मुलांच्या कडे होणारे दुर्लक्ष , त्यांच्या खाण्या पिण्या सह , राहणीमान , त्यांचे मित्र मैत्रिणी यांची संगत , सवयी अनेक गोष्टी आई वडिलांना माहिती ही नसतात.

मुले म्हणा किंवा मुली बरेचवेळा पालक म्हणतील ती साईड निवडून शिक्षण पूर्ण करावे लागते.

तरी आजकाल बरेच पालक सुजाण आहेत. मुलांना त्यांच्या आवडीनुसार , क्षमते नुसार शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देणारे ही पालक आहेत.

शिक्षण पूर्ण झाले की नोकरी. बरेचवेळा कॉर्पोरेट ऑफिस , किंवा मोठ्या ऑफिस मध्ये नोकरी मिळून पॅकेज ही चांगले मिळते. अशावेळी मुली आणि पालक यांचा थोडा attitude असतो की माझी मुलगी एवढी शिकली, मुलगी म्हणते मी एवढी शिकले , एव्हढे मोठे पॅकेज आहे. तिला स्थळे बघताना मुलगा ही तसाच भरपूर शिक्षण आणि भरपूर पॅकेज असणारा पाहिजे.

घरात मोजकी च माणसं पाहिजेत किंवा सासू सासरे ही नकोत लग्नानंतर दोघांनी च राहायचे .आमच्या मुलीला सवय नाही कामाची असे म्हणणारे पालक आहेत.

या खेरीज मुलाचे स्वतः चे घर पाहिजे , घरात सगळ्या वस्तू , सुख सोई पाहिजेत. जसे t.v. , fridge, washing machine, पाहिजे. मुलगा हौशी पाहिजे. वर्षातून दोनदा वर्ल्ड टूर करवून आणणारा किंवा जिथे असेल त्या देशात भरपूर फिरवून आणणारा. बँक बॅलन्स भरपूर पाहिजे.

मुलीच्या कला कलाने घेणारा पाहिजे. मुलगी शिक्षण , आणि नंतर नोकरी यात अडकल्याने तिला कामाची सवय नाही. घर कामात ही मुलाने मदत करावी ही अपेक्षा पालकांची आणि मुलीची.

मुलांची ही स्थिती फारशी काही वेगळी नाही. स्थळे बघताना सध्याचे वाढते खर्च विचारात घेता मुलगी ही कमवती पाहिजे. शिवाय मुलाचे एव्हढे उच्च शिक्षण , त्याचा पगार त्याला शोभेल अशी आपल्या status ची मुलगी पाहिजे. दिसायला सुंदर, आपल्या रीती रीवाजा ना जपणारी अशी मुलगी पाहिजे. अशी अट मुलाच्या आई वडिलांची ही असते. सगळ्यांशी मिळते जुळते घेणारी पाहिजे अशी अपेक्षा असते.

या सर्वसामान्य अपेक्षा मुली कडच्या आणि मुलाकडच्या लोकांच्या असतात.

पालकांच्या स्वभावामुळेच मुलामुलींच्या लग्नात अडचणी येत आहेत? खरेच आहे हे.

आजकाल मुलिकडचे असतील किंवा मुला कडचे दोघांच्या ही अपेक्षा असतात की मुलगा , मुलगी अजून त्यांचे करियर करत आहेत. त्यांना सेटल होवू देत. त्यांना पुढचे उच्च शिक्षण घ्यायचे आहे. परदेशी जायचे आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. लग्न झाले की या गोष्टी शक्य नाहीत. जबाबदाऱ्या वाढतात. अडकत जातात. त्यामुळे एक तर पालक मुलांच्या करिता लवकर स्थळे बघत नाहीत. आजकाल २७ ते २८ व्य वर्षी ही अजून लहानच आहेत अशीच कल्पना पालकांची असते.

त्यामुळे जेव्हा लग्ना करिता स्थळे शोधायला सुरुवात होते त्यानंतर मनासारखे स्थळ, अपेक्षा वाढलेल्या असतात तसे स्थळ मिळण्याकरिता वेळ जातो. किंवा मिळत ही नाहीत. तेव्हा त्यांच्या बरोबरीची स्थळे मिळणं अवघड जाते. जरी मिळाली तरी अनेक दोष काढले जातात. गुण बघण्यापेक्षा दोषच जास्त बघतात.

आजकाल मुलांच्या पेक्षा मुलिकडच्या लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. मुलगा उंच पाहिजे , देखणा ,आधीचे काही नाही ना मुलाचे ? इथपासून मग मुलीच्या सांगण्याप्रमाणे वागणारा पाहिजे.घर , वस्तू पाहिजे.

जसराज चे बाबा जितेंद्र सर आमच्या ऑफिस चे CA. आज सांगत होते की,त्यांच्या मुलाचे जसराज चे लग्न करायचे ठरवले. मुलगा M.B.A. finance शिवाय बरेच advanced course केले आहेत. मोठ्या कंपनी मध्ये नोकरी. २८ व्यां वर्षी २८ लाखाचे पॅकेज. त्याच्या कॉलेज मधली ओळखीची , एकत्र असणारी श्रिया . तिने आणि त्याने आपण आता आपल्या पालकांच्या सोबत बोलून लग्नाचा विचार करूया असे ठरविले.

श्रिया तिचे आई बाबा आले. भेटले. प्राथमिक बोलणी झाली. जितेंद्र sirani घरचे वातावरण सांगितले. थोडे धार्मिक. शृंगेरी मठाशी आणि विचार आचार यांच्याशी निगडित. घरी सगळे शाकाहारी. त्यामुळे अपेक्षा ही की मुलगी ही शाकाहारी असावी.

खूप गरीब परिस्थिती , टक्के टोणपे यातून वर आलेली ही family एव्हढे expect करत होती की मुलगी आपल्या सगळ्यांशी मिळते जुळते घेणारी , आपल्या घरचे धार्मिक वातावरण जपणारी , शाकाहारी असावी.

बाकी गोष्टी तर जुळणाऱ्या होत्या. जसराज आणि श्रिया एकमेकांना ओळखत होते. तिने एवढेच सांगितले की तिला वर्षातून दोन वेळा वर्ल्ड tour करून आणायची.

जसराज ने स्पष्ट सांगितले ते शक्य नाही. नवीन घेतलेला फ्लॅट त्याचे हप्ते सुरू आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी balance होणे गरजेचे.

तेव्हा मग तिने विचारले की मग वडिलांचे ऑफिस स्वतः चे का भाड्याचे ? थोडक्यात हळूहळू ती केवळ आर्थिक गोष्टी चे विचार करू लागली.

घरी बोलणे झाल्यावर श्रिया ने जसराज सोबत एकट्याने भेटण्याचा प्रस्ताव मांडला.

ते दोघं भेटले ही . तिने त्याला स्पष्ट सांगितले की मला आठवड्यातून दोन वेळा nonveg लागते. शिवाय शनिवार रविवार आमच्या पार्टीज.ड्रिंक्स. असतात.

मी काय रोज तुझे च तोंड बघायचे का ?

जसराज काही ही न बोलता घरी बोलून निर्णय सांगतो म्हणाला. त्याने दोन दिवसांनी तिच्या वडिलांना नकार कळवला.

दोन चार दिवसांनी परत तिच्या वडिलांचा फोन आला. तिला मुलगा आवडतो. आपण बोलू .भेटू. मी तिला nonveg खावू नको सांगेन .ती सोडेल.

यावर जितेंद्र सर म्हणाले उद्या जर तुमची मुलगी म्हणाली की मी आई बाबांचे चेहरे किती बघायचे. ते बदलून हवे तर ?

शिवाय आज ती nonveg सोडेल पण उद्या, काहिदिवसानी , वर्षांनी ती आमच्या वर खापर मारेल की तुमच्या मुळे मी nonveg सोडले आणि ते कुठेही नको आहे आम्हाला.

यात श्रिया चे आईबाबा दोघेही नोकरी करणारे त्यामुळे मुलीला वेळ खूप कमी देवू शकत. आणि त्यांच्या दृष्टीने वेळ देणे म्हणजे बाहेर हॉटेलिंग, मॉल मध्ये जावून वस्तू खरेदी करत राहणे. वर्ल्ड tour. यात आई वडिलांनी च मुलांना वाढवताना संस्कार , गरज या गोष्टी किंवा adjustment या पेक्षा दिखावा , बाह्य गोष्टींचे आकर्षण हेच विचार दिले आणि त्यात च आनंद असतो हेच शिकविले. त्यामुळे मुलगी ही बिनधास्त. आनंद हे याच गोष्टीत आहेत हे समजणारी.

पुढे कोणत्या नवीन वातावरणात adjust होण्याची तयारी नसलेली. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे लग्न म्हणजे काय चेष्टा आहे का..? रोज तुझ तोंड बघायचे का . म्हणजे काय स्वैराचार पाहिजे का ? मग लग्नाची गरज काय ? आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप आहे तसे शोधावे ना मग.

पण आजकाल मुले असोत मुली कोणाला ही एकमेकांना समजून घेण्याची तयारी नाही, adjustment तडजोड करण्याची तयारी नाही, मला असे जगायचे हे डोक्यात. बाकी कोणाचे विचार नाहीत.

यासाठी खरे तर पालक , त्याचे संस्कार , विचार , वर्तन कारणीभूत आहेत.

सगळया गोष्टी लग्नापूर्वी घरात असणे , घर असणे कसे शक्य आहे हो ? जर मुलगा नुकताच जॉब करत असेल तर एवढ्या गोष्टी लगेच कसे शक्य आहेत?

तर मुलगा चांगल्या हुद्द्यावर , पगारावर असेल तर तो पार्टीज , ड्रिंक्स घेणारा त्याला शोभेशी मॉडर्न मुलगी पाहिजे असते. मग तो आणि त्याच्या घरचे साधी सोज्वळ मुलगी नाकारतात.

या शिवाय जिथे मुले शिकून ही चांगल्या नोकरी करिता प्रयत्न करत असतील. Struggle करत असतील. अशा मुलांना तर मुली मिळणे कठीण जाते कारण आजकालच्या मुली आणि पालक यांच्या अपेक्षेत ते बसत नाही. त्यामुळे एक वेळ लग्न झाले नाही तरी आमची मुलगी काही आम्हाला जड नाही असे विचार करणारे पालक आहेत.

तर लग्न झाल्यावर ही मुलीच्या संसारात सतत ढवळाढवळ करून तिचे दोष लपविण्यासाठी मुला कडचे कसे वाईट आहेत हे सिद्ध करणारे पालक ही आहेत.

सगळ्यात पालक आणि मुलं मुली यांना गरज उरलेली नाही. आणि विचार असे की नाही झाले लग्न तर असे काय बिघडणार आहे.उलट तिची ती किंवा तो कमवता आहे. लाइफ एन्जॉय करत राहतील त्यांचे ते. आता हे enjoyment म्हणजे काय ? तर मित्र मैत्रिणी यांच्या सोबत वेळ घालवणे , बाहेर शॉपिंग , देश परदेश फिरणे. ड्रिंक्स पार्टीज .. म्हणजे कोणतेही बंधन नको मुक्त जीवन जगतील. असे हे विचार आणि त्याला खत पाणी घालणारे पालक.

पालकांच्या स्वभावामुळेच मुलामुलींच्या लग्नात अडचणी येत आहेत. आणि जरी लग्न झाली तरी ती टिकवून ठेवणे अवघड झाले आहे. कारण आताचा ट्रेण्ड असा. की नाही पटत ना सोडून दे. पटवून घे .असे नाहीच.

शिवाय आजकाल लग्न केले की पटत नाही म्हणून divorce घेताना आयुष्य आरामात जाईल असे demands.. पोटगी.. मिळते की.. त्यामुळे चिंता नाही अशी ही वृत्ती वाढत आहे.

आयुष्य सुंदर आहे. बाह्य गोष्टींचे आकर्षण , विलासी वृत्ती पेक्षा आयुष्यात एकमेकांना समजून घेणारा / घेणारी जोडीदार शोधा , जे प्रेम देतील, आपुलकी असेल, ओढ असेल एकमेकांच्या विषयी , आणि विश्वास , खात्री देवू शकतील. शॉर्ट टर्म पेक्षा लाँग टर्म नाते कसे फुलेल याकरिता शिकवण दिली पाहिजे. आणि तसे विचार वर्तन पालकांनी केले पाहिजे . आयुष्यभर जपनारा पार्टनर जो secure लाईफ देईल मग नात्यात असेल की वा आर्थिक, मानसिक, शारीरिक सबंध असतील की किंवा समाजात स्थान . असे प्रगल्भ विचार देताना एकमेकांच्या विषयी त्याग भावना , असेल त्या परिस्थितीत struggle करण्याची जिद्द हे पालकांनी शिकविले पाहिजे.

आणि आज पालक विचार , वर्तन आणि प्रगल्भता यातून मागे पडत आहेत च. पण आयुष्यात नक्की काय पाहिजे ..आणि नक्की करायचे ही वैचारिक बैठक च नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला ही योग्य मार्गदर्शन करू शकत नाहीत.

तर अजूनही अशी ही पिढी आहे जी विचार करणारी , संस्कृती , संस्कार जपणारी, खान पान यावर बंधने असणारी आहे. पण ती एक वेगळीच आहे. ज्यांना आजकालची मुले मुली मागास म्हणतात.

घरातून आपण मुलांना काय देतो. हे खूप महत्त्वाचे असते. आज आई वडिलांचा आदर जरी मुलांनी ठेवला तर ही आदर्श गोष्ट आहे. नाही तर तुम्हाला काय समजते , तुम्हाला काय करायचे असे उध्टट पने वागणारी पिढी ही आहे. याला कारणीभूत पालक च आहेत जे जास्त स्वातंत्र्य देतात किंवा दुर्लक्ष करतात. आणि आपल्या मुलांच्या चुका पाठीशी घालतात. योग्य वेळी सोनाराने कान टोचणे गरजेचे असते. तसे घडत नाही.

समोरच्या कडून जास्त अपेक्षा ठेवताना तुमच्या मुलांच्यात / मुलींच्या मध्ये असणाऱ्या कमतरता , त्रुटी मात्र जाणून बुजून दुर्लक्षित करणारे पालक आहेत.

आणि म्हणूनच पालकांच्या स्वभावामुळेच मुलामुलींच्या लग्नात अडचणी येत आहेत.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!