Skip to content

आपलं आयुष्य सुंदर बनवण हे आपल्या हातात आहे.

आपलं आयुष्य सुंदर बनवण हे आपल्या हातात आहे.


किरण शेळके


एखाद चित्र आपण रेखाटायल घेतो, तेव्हा आपला चित्र काढण्याचा सराव, रंग संगतीची आपली समज आणि ते चित्र काढण्यासाठी लागनारी एकाग्रता हे ठरवत असते कि ते चित्र कस उमटेल, कस सुंदर दिसेल. थोडक्यात ते चित्र सुंदर बनवणे ही त्या चित्रकाराच्या हातात असत. अगदी तसंच आपल आयुष्य हे एक सुंदर चित्र आहे आणि त्याचे चित्रकार म्हणजे आपणच आहोत. तेव्हा ते रेखीव आणि सुंदर बनवण हे आपल्याच हातात असत.

दैनंदिन जीवनात अशा घटना घडत असतात कि आपण स्वतःवरच चिडतो, रागावतो. आपण अस वागल्याने त्या दिवसाचा संपूर्ण आनंद गामावतो आणि नैराश्यआला बळी पडतो. पण तीच गोष्ट किंवा चूक आपल्या जवळच्या व्यक्तीने केली तर आपण सहज सल्ला देऊन जातो कि, “ठीक आहे, विसरून जा. एवढ काही मोठ झालेल नाही.” हाच सल्ला आपण स्वतःलाही द्यायला हवा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःलाही माफ करायला शिकायला हव. त्याने आपलच आयुष्य सोप्प होईल, सुंदर होईल. मनावर दडपण ठेऊन जगणे, वेदणेशिवाय काहीच देऊ शकत नाही.

बऱ्याचदा एखादी गोष्ट ही आपण जीव तोडून करत असतो, पण तरीही ती घडत नाही. मग मनाला निराशा कवटाळू लागते. अशावेळी रडायच कि नव्याने प्रयत्न करायचे हे सर्वस्वी आपल्या हातात असत. कारण ह्या जगात कारणाशिवाय काहीही घडत नाही. त्यामुळे आयुष्यात काही चांगल घडता घडता राहील तर नक्कीच ह्यापेक्षा काहीतरी चांगल घडनार आहे, असा सकारात्मक विचार घेऊन पुढे जायच कि अपयशाने खचायच हे आपल्याच हातात असत.

ह्या जगत सर्वथा सुखी किंवा सर्वथा दुखी अस कुणीच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुख: हे ऊन आणि सावली सारखे खेळतच असतात. मग काही बोटांवर मोजता येतील अशा दुख:द गोष्टी, अगदी त्या तीव्र स्वरूपाच्या असल्या जरी, आपणच अभागी आहोत ह्या आपल्या सततच्या धारणेमुळे, सुख जवळ असून देखील ते आपण पाहू शकत नाही, त्याला उपभोगू शकत नाही. आणि स्वतःला नकरतमक्ते कडे ढकलत जातो. ह्या दुख:द गोष्टी जर सोडल्या तर आपल्या आयुष्यात अजून चांगल काय आहे, हे रोज जर आपण स्वतःशीच बोललो तर नक्कीच आनंदाला वाटा मोकळ्या होतील. ज्यावेळी तुमचा स्वतःशी असलेला संवाद बदलतो, तो सकारात्मक होतो, तेव्हा आपसूकच आपल्यात सकारात्मक बदल घडायला लागतात.

अनेकदा अस घडून जात कि आपले मित्र किंवा जवळची व्यक्ति आपल्याला तू काळी आहेस, जाडी आहेस, किंवा तुझी ऊंची कमी आहे, अशा शारीरिक उणिवा ज्या नैसर्गिक आहेत आपल्याला बोलून दाखवतात. अशा वेळी आपला प्रचंड रागराग होतो आणि आपल्याला वाईट वाटत. पण जी गोष्ट आपण काही केल्या बदलू शकत नाही आणि ती गोष्ट माझ्यात नाही म्हणून माझ व्यक्तिमत्व कुठे कमी पडणार आहे काय ? हा विचार आपण करायला हवा. स्वतःचा संपूर्ण स्वीकार केल्याशिवाय तुमच आयुष्य सुंदर होणे शक्यच नाही. म्हणून स्वतःचा संपूर्ण स्वीकार हा करायला हवा. जेणेकरून आपले बरेच त्रास हे कमी होतील. शिवाय जी व्यक्ति ती उणीव आपल्याला बोलून दाखवते आहे, तिच्यात ती गोष्ट असून सुद्धा ती आपल्यापेक्षा काही विशेष करू शकते का जे आपण त्या उनिवेमुळे नाही करू शकत? ह्याच विचार देखील आपण केलाच पाहीजे.

बहुतांशवेळा आपण स्वतःला दुसरयातच शोधत असतो. अर्थात आपण नेहमी हे बघत असतो कि दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात, किंवा ते मला काय समजतात?. आपण नेहमी हेच गृहीत धरत असतो कि ती व्यक्ति माझ्याविषयी नक्कीच वाईटच बोलत असणार, माझी निंदच करत असणार. खरे पाहता हे फक्त जर तर चे विषय असतात. आणि आपण हयात आपली बरीच ऊर्जा आणि वेळ वाया घालवत असतो. पण खरंच ती व्यक्ति प्रत्यक्षात तशी बोललीच का ? किंवा बोलते का ? ह्याच विचार आपण करतच नाही आणि नाहक त्रास हा आपण स्वतःला करून घेतो. आणि समजा ती व्यक्ति अस बोलत जरि असेल तरी ते त्या व्यक्तीच स्वतःच अस एक मत आहे, जे आपण बदलू शकत नाही. त्यामुळे ती व्यक्ति तशीच आहे अस म्हणून हा त्रास आपण सहज कमी करू शकतो. जर कृतीत आपण चुकत नसेल, तर आपलयाविषयी कोणी कितीही वाईट बोलले तरी ती एक निरर्थक बडबड ठरते. त्यामुळे निश्चिंत राहून आयुष्य जगणे हे आपल्याच हातात असत.

थोडक्यात सुख आणि दुख ह्या मनाच्या च दोन अवस्था आहेत. तुम्ही ज्या दृशीतनोकतून बघाल, तसेच तुमचे आयुष्य घडत जाईल. म्हणून कोणत्याही परिस्थित आपण जास्तीत जास्त सकारात्मक राहून, त्यावर मात करून आपल आयुष्य अधिकाधिक सुंदर बनऊ शकतो.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “आपलं आयुष्य सुंदर बनवण हे आपल्या हातात आहे.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!