आजकालच्या जीवनात घरगुती आयुष्यातील बहुतांशी तणाव हे या ७ कारणांमुळे उद्भवतात.
मेराज बागवान
ताण-तणाव आयुष्याचा एक भाग आहे.आपल्या घरगुती म्हणजेच वैयक्तिक आयुष्यात तणाव हा कायम असणारच आहे.तो काही बंद होणार नाही.पण हा तणाव नेमका कशामुळे येतो आहे.अशी काय कारणे आहेत ज्यामुळे आपण उदार होत आहोत आणि तणाव आयुष्यात निर्माण होत आहे.ह्या लेखात आपण मुख्य ७ कारण पाहणार आहोत जी ह्या ताणाला कारणीभूत ठरतात.
१) बिकट आर्थिक परिस्थिती – पैसा हा जगण्यासाठी गरजेचा असतो.काही घरात, खूपच आर्थिक परिस्थिती हलाखीची असते.त्यामुळे खर्च भागविणे अशक्य होते.मग कर्ज घेणे सुरू होते.ते कर्ज देखील मुबलक पैसे नसल्यामुळे फेडता येत नाही.मग आर्थिक गणित कोलमडते.तसेच घरात कमावणारी व्यक्ती एखादीच असते.त्यामुळे सर्वांचा खर्च पूर्ण होत नाही.ह्या सगळ्यामुळे ती व्यक्ती तणावात जाते.आणि सतत काळजी वाटून राहते.
२) कौटुंबिक कलह – प्रत्येक घरात वातावरण वेगवेगळे असते.काही घरात सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद,भांडणे,कलह होत असतात.काही घरात तर कौटुंबिक हिंसाचार सर्रास पहावयास मिळतो.ह्या सतत च्या वाद-विवादांमुळे कुटुंबातील सर्वच व्यक्ती कायम तणावात राहतात.
३) नात्यांमधील ओढाताण – आजकाल नवरा-बायको,पालक-मुले हे एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत.आणि त्याला कारण म्हणजे,वाढते कामाचे तास,स्पर्धा,कार्यालयीन जीवनातील समस्या, मुलांवरील परीक्षेचे दडपण यामुळे ताण उद्भवतात.
४) लैंगिक समस्या – पती-पत्नी मध्ये काही लैंगिक समस्या उद्भवतात. योग्यरित्या एकमेकांना शारीरिक संबंध देऊ न शकल्यामुळे दोघेही ताण-तणावात राहतात.यामुळे नात्यावर देखील परिणाम होतो.
५) शारीरिक आजार – घरातील कोणी तरी सतत आजारी असते.कधी कधी एकाचे आजारपण संपले की दुसऱ्याचे सुरू अशी देखील परिस्थिती येते.दवाखान्यात सतत दाखल असणे,काही तरी मोठा आजार होणे यामुळे घरातील सर्वच मंडळी तणावात राहतात.
६) अहंकार – घरात देखील ,’मीच का मागे घेऊ’,’मीच का सर्व काही करू’ अशा प्रकारचे अहंकार उभे ठाकलेले असतात.कोणीच माघार घ्यायला तयात नसतो.मग मनात सतत हेच विचार राहतात आणि ताण-तणाव उद्भवतात.
७) मोबाईल फोन आणि संवादाचा अभाव – मोबाईल फोन हे घरात प्रत्येकाकडे असतातच.हा स्मार्ट फोन सर्व काही बिघडवत आहे.पण फोन ला दोष देऊन उपयोग नाही.फोनचा वापर किती करायचा हे सर्वस्वी आपल्या हातात असते.पण घरातील अनेकजण ह्या फोन च्या आहारी गेलेले असतात.इतके की घरात काय चालले आहे,दुसरी व्यक्ती आपल्याशी बोलत आहे याचे देखील भान त्या व्यक्तीला राहत नाही.आणि मग संवाद तुटतो.आज प्रत्येकजण आपल्या आपल्या मोबाईल फोन मध्ये व्यस्त असतो.कोणाशी बोलायला कोणाला वेळ नाही.आणि यामुळे ताण-तणाव निर्माण होतात.
अशी काही घरगुती आयुष्यातील तणावाची कारणे आहेत.ह्यामुळे आज अनेक घरात विविध मानसिक समस्या,मानसिक आजार जडलेले आहेत.जसे की ,भीती, ईर्षा,एकाकीपण, विसरभोळेपणा अवास्तव अपेक्षा, संयम नसणे, नैराश्य,वैफल्य इत्यादी. जसे हे आजार वाढत आहेत तसेच त्यावरील मेडिकल उपचार देखील वाढत आहेत.कित्येक घरात अनेकजण गोळ्या-औषधे कित्येक काळ घेत आहेत.आणि हे खूप भीषण आहे.
म्हणूनच वरील कारणे लक्षात घेऊन त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.हा तणाव तुम्ही विविध मार्गांनी कमी करू शकतात.ताण नष्ट कधीच होत नाही,पण त्याची पातळी आपण नक्की कमी करू शकतो.आणि हे जमले की मग आयुष्य देखील तुम्ही मजेत जगू शकतात.
वेळीच तणावाची कारणे जाणून योग्य ती पावले उचला.आयुष्य फार फार छोटे आहे.फक्त तणावात ते वाया घालवू नका.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


अगदी सत्य आहेत कारण
उपाय सूचवा