Skip to content

जे होतं ते आपल्या हितासाठी!

जे होतं ते आपल्या हितासाठी!


पुजा सातपुते


योग्य वेळी योग्य घटना घडत असतात. आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात, चुका सुधारण्याची संधी देतात आणि आपलं आयुष्य सुरळीत करतात. घटना चांगल्या असो किंव्हा वाईट, जे होतं ते आपल्या हितासाठीच!

चांगल्या घटना या नेहमी आपल्याला हव्या असणाऱ्या तर वाईट घटना या आपल्याला घडवणाऱ्या असतात. बरेचदा आपल्या आयुष्यात काही अघटीत झालं की आपली चिडचिड होते, नको ते विचार आपल्या मनात येतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपला चॉईस चुकतो. आता बघा ना, अश्या वेळीस आपल्याकडे दोन चॉईसेस असतात. एक तर सबुरी ठेऊन ती वेळ निभावून नेणं किंव्हा वाईट मार्गी लागून आपल्यात शारीरिक व मानसिक ताण निर्माण करणं.

सतत जर आयुष्यात वाईट गोष्टी घडत राहिल्या तर साहजिकच सबुरी ठेवणं जमेलच असं नाही कारण आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल तर चिडचिड ही होणारच. पण खरं बघितलं तर हीच ती वेळ असते जेव्हा आपल्याला विचारपूर्वक निर्णय घ्यायचा असतो म्हणजे जेणेकरून आयुष्यात चांगली वेळ आपल्याला योग्यरित्या अनुभवता येते. बरेचदा जेव्हा आपल्या आयुष्यात खूप काही चांगलं व्हायचं असतं ना तेव्हा बरंच काही वाईट होत असतं, जे आपल्याला असाह्य करतं आणि नकळत आपली वाट चुकते.

हा लेख त्यांच्यासाठीच आहे जे खूप मेहनत करत आहेत आणि हार न मानता आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत पण कुठेतरी त्यांना give up करावंसं वाटत आहे. मला एवढच सांगायचं आहे की तुम्ही योग्य ट्रॅक वर आहात आणि तुमच्या ध्येयाच्या खूप जवळ सुद्धा. कोणी काहीही बोलो, फक्त तुमचे होप्स सोडू नका. नकारात्मक विचार आले तर तुमचे डोळे मिटा आणि तुमचं स्वप्न तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे आणि स्वप्न पूर्ण झाल्यावर तुम्हाला कसं वाटेल या भावनेचा विचार करा. नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल.

आपल्या मनात बरेचदा असा विचार येतो की हे सगळं माझ्याबरोबरच का होत आहे. एवढं चांगलं वागून सुद्धा असं का?

तर याचं उत्तर खूप सोप्पं आहे. जे मेहनत घेतात, प्रयत्न करतात त्यांच्याच वाट्याला challenges येत असतात कारण एकतर त्यांच्यात प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी असते आणि दुसरं म्हणजे निसर्गाला त्यांना आयुष्याच्या चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव द्यायचा असतो म्हणजे जेणेकरून ते दुसऱ्यांसाठी एक प्रेरणादायी व्यक्ती बनू शकतील. जे काहीच करत नाहीत, त्यांच्यासाठी चांगलं काय किंव्हा वाईट काय, काहीच फरक नसतो. जे काही आपल्या आयुष्यात होतं ते आपल्या हितासाठीच, आपल्याला घडवण्यासाठी आणि आपल्या विचारात व वागण्यात सकारात्मक बदल करण्यासाठी.

निसर्गाने ठरवलेली प्रत्येक घटना आपल्याला काही ना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असते आणि एका चांगल्या विद्यार्थी सारखं आपण त्यातनं काय शिकतो हे खूप महत्वाचं असतं. जसं की मी अगोदर सांगितलं की वेदना असाह्य झाल्या की कधी कधी आपण वाईट मार्गी लागतो.

उदाहरणार्त स्वतःला व्यसन लावून घेतो, वाईट संगतीत लागतो कारण या गोष्टी खूप सोप्या असतात. त्यात आपल्याला कुठलीच मेहनत घ्यावी लागत नसते आणि सहजरीत्या आनंदही मिळतो. पण हा आनंद फार काळ टिकत नाही. जेव्हा आपण शुद्धीवर येतो तेव्हा सगळं काही तसंच असतं आणि परत त्या वेदनेतून बाहेर येण्यासाठी पुन्हा आपण तेच तेच करत राहतो.

एक दिवस हा गुंता एवढा वाढतो की आपण त्यातनं आपली कितीही इच्छा असली तरी स्वतःला सोडवू शकत नाही आणि मागे वळून बघितलं तर आपल्याला असं वाटतं की, अरे! त्या वेळेस मी वेगळा मार्ग निवडला असता तर आज माझं आयुष्य वेगळं असतं. थोडे patience ठेवायला पाहिजे होते.

खेद करत बसण्यापेक्षा सबुरी ही कधीपण चांगली, नाही का?

आयुष्यात अडचणी येणार, आपल्याला बरंच काही शिकवणार, घडवणार, आपल्या सबुरीची परीक्षा घेतली जाणार आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्ग मोकळा होणार. त्या वेळीस मन शांत ठेवून जे काय तुमच्या आयुष्यात घडत आहे त्याचा अनुभव घ्या कारण जे काही होतं ते आपल्या हितासाठीच!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “जे होतं ते आपल्या हितासाठी!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!