Skip to content

दुसर्‍याकडे किती आहे, याचा विचार करणार्‍याला आपल्याकडे जे आहे, त्याचाही आनंद मिळत नाही…

दुसर्‍याकडे किती आहे,याचा विचार करणार्‍याला आपल्याकडे जे आहे, त्याचाही आनंद मिळत नाही…


मयुरी महाजन


निम्म्याहून अधिक समस्या आयुष्यात कशामुळे आहेत, याचे विश्लेषण करायला घेतले, तर आपल्या लक्षात येईल, की समस्यांचे मूळ हे आपल्या विचारांमध्ये असलेले बघायला मिळते, जसे की एक गोष्ट मी बरेचदा ऐकलेली आहे, ती माझ्या आईकडून की आपल्याला समोरच्याच्या ताटात नेहमीच जास्त दिसते, वास्तविक आपल्या ताटात किती आहे, याकडे मात्र आपले लक्ष कमी व दुसऱ्याच्या ताटाकडे जास्त असतं ,आणि हीच आपली समस्या आहे, जे अन्य गोष्टींसाठी लागू असलेली बघायला मिळते,

सर्वप्रथम आपण जे काही मिळवत आहोत ,ते आपण आपल्या आनंदासाठी मिळवतोय, की दुसऱ्याला दाखवता आलं पाहिजे, यासाठी मिळवतोय, या दोघांमधला आपल्याला फरक ओळखता यायला हवा ,जर आपला आनंद आपण मिळवलेल्या गोष्टीत असणारं, परंतु त्या आनंदाला दुसऱ्याला दाखवण्यात व दुसऱ्यांना त्याविषयी काय वाटते, यावर अवलंबून असणार, तर मात्र त्या आनंदामध्ये ती निरागसता नसते,

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण आपल्याकडून हवे असलेले सर्व प्रयत्न करायला हवेत ,त्यात काही गैर नाही ,परंतु आपण मिळवलेल्या गोष्टींची तुलना जर आपण दुसऱ्यांनी मिळवलेल्या गोष्टींसोबत करत असणारं, तर आपण मेहनतीने मिळवलेल्या गोष्टींचाही आपल्याला आनंद मिळत नाही, जीवनाच्या प्रवासात कुठेतरी काहीतरी कमी असणारच आहे, हे स्वीकारून चला, जसं ते म्हणतात ना….

” अगर सब कुछ मिल जायेगा जिंदगी में,

तो तमन्ना किसकी करोगें

कुछ अधुरी ख्याईशें तो जिंदगी

जिने का मजा देती हैं..”

बरेचदा माणसं आपल्याकडे काय आणि किती आहे, याचा हिशोब न ठेवता दुसऱ्याकडे किती आहे, याचा विचार करत असतात, परंतु लक्षात घेणे गरजेचे आहे, की आपण दुसऱ्याकडील चकाकणारी श्रीमंती बघत असताना ,तिथपर्यंत जाण्यासाठी एखाद्याचा प्रवासही बघणे गरजेचे आहे, आपल्याला जर ते बघता आलं, तर आपण स्वतःसाठी दोन गोष्टी नक्कीच चांगल्या शिकता येणारं…

आयुष्यात माणसं मिळवणं व माणसांची साथ मिळणं यासाठी सुद्धा माणसं तक्रार करतात, की त्यांना कसं माणसं चांगली मिळाली सर्व काही चांगलं आहे, पण बरेचदा वरून दिसणारा देखावा जितका सुंदर वाटतो, तो आतून तितकाच पोकळीने भरलेला असतो, आपण प्रत्येकाच्या दुःखाला ओळखू शकत नाही, कारण काहींकडे पैसा ,श्रीमंती, भरपूर काही असते, परंतु मनातील बोलायला हक्काचं व विश्वासाचं माणूस जवळ नसते ,अशावेळी त्या गडगंज श्रीमंतीचा व त्या जीवनशैलीचाही तिटकारा वाटतो व्यक्तीला, त्याने जर बाहेरच्या जगात पहिले, तर दिवसभर कष्ट करून मेहनतीने आपल्या पोराबाळांसाठी कमावणाऱ्या व्यक्तीला बघितले, व सर्वांसोबत हसतखेळत रमणारा त्याचा दिवस पाहिला ,तर त्याला त्याची श्रीमंती कवळी मोलाची वाटू शकते….

बरेचदा आपल्याकडे जे आहे, व जितके आहे, ते आपल्यासाठी लाखमोलाचे असलेच पाहिजे, कारण की आपल्याकडे इतक्या अनमोल वस्तू आहेत, ज्याची आपण कधी मोजदादच केलेली नाही ,कारण की पैसा श्रीमंती खूप छान जीवनशैली हे पैशावरती, प्रतिष्ठे वरती अवलंबून आहे, असे बरेच जण म्हणतात, पण करोडोची संपत्ती जे आपले शरीर रोगमुक्त व निरोगी असेल, अजूनही आपल्याकडे शरीर सुबत्ता असेल, व आपल्या मानसिक शक्तींमध्ये नवनवीन गोष्टी करण्याची उर्मी असेल, मानसिक शक्ती चौफेर व प्रगल्भ होण्यासाठी आपण तयार असणार ,तर आपली जीवनशैली सर्वोच्च स्थानी आहे,

हाता पायाने अपंग असणारे, इतकेच काय ,डोळ्यांनी दृष्टी गेलेली व्यक्ती सुद्धा ,इतक्या आनंदाने जगताना पाहून खर तर मनाला प्रश्न पडतो, की या व्यक्तींनी आपल्या आयुष्याविषयी तक्रार न करता, त्या अपंगत्वावर मात करून स्वावलंबी होऊन या व्यक्ती जीवन जगताना, पाहून खरच खूप आनंद होतो ,त्यांना कुणाच्याही सहानुभूतीची अपेक्षा नाही,

आणि दुसऱ्याकडे किती आहे, याचा विचार न करता आपल्याकडे जे आहे, त्याचा विचार करून आपल्या आनंदाला भरभरून जगतात, जी माणसे दुसऱ्याकडे किती आहे, याचा विचार करत असतात, त्यांना आपल्या स्वतःकडे असलेल्या गोष्टींचाही पुरेपूर आनंद मिळत नाही,

शेवटी आनंद ही जीवनातील अनुभूती आहे, त्याला दुसऱ्यांसोबत तुलना करून जगू नये ,तरच आपल्याला आपला आनंद अनुभवता येईल….


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!