मनातील गोष्टी हव्या तशा घडत नसतील तर मन मारून जगावे का ?
हर्षदा पिंपळे
”जिंदगी ना मिलेगी दोबारा” ही ओळ प्रत्येकाच्या अगदी जवळची आहे.खरं तर जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटाच्या निमित्ताने ती प्रत्येकाला जास्त जवळची वाटू लागली.आयुष्य कशाप्रकारे जगायला हवं याचं एक उत्तम उदाहरण म्हणून हा चित्रपट अगदी योग्य आहे.लोकांच्या तनामनात एक वेगळी, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा हा चित्रपट मन मारून जगावं की नाही या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देऊ शकतो.(एकदा तरी हा चित्रपट अवश्य पहा.)
[ “आज का दिन मनाओ मेरे दोस्त… पहले इस दिन को पूरी तरह जियो, फिर चालीस के बारे में सोचना ”
“इंसान को डिब्बे में सिर्फ तब होना चाहिए, जब वो मर चुका हो.’ – जिंदगी न मिलेगी दोबारा”
“अपने काम को अपनी जिंदगी के साथ कन्फ्यूज मत करो। तुम्हारा काम तुम्हारी जिंदगी नहीं, सिर्फ उसका एक हिस्सा है” ~जिंदगी ना मिलेगी दोबारा ]
पहा, जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातील या ओळी जगण्याचा अर्थ खूप छान पद्धतीने मांडतात. तो समजून घेता यायला हवा.
प्रत्येकवेळी वाटतं सगळं काही मनासारखं घडावं.प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडावी. आपल्या मनात आहे तेच घडावं.तर,त्यात काही चुकीचं नाही आणि वाईटही नाही. हे असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येकाची खूप मोठी मोठी स्वप्न असतात.ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण जमेल तशी धडपड करत असतो.स्वप्नच नाही तर मनात अशा कितीतरी गोष्टी प्रत्येकाने दडवून ठेवलेल्या असतात. त्या हव्या तशा घडाव्यात यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतो.
आता मन हा शब्द जरी छोटा वाटत असला तरी या मनामध्ये किती आणि काय काय साठलेलं असतं याचा अंदाज न लावलेलाच बरा ! तर मनात खूप गोष्टी असतात. जसं की,जी नोकरी हवी ती मिळत नाही.काही स्वप्न अर्धवट राहतात. कुणाला मनासारखा जोडीदार भेटत नाही. एखादा आवडीचा विषय हाताळायचा राहून जातो.तर अगदी एखाद्याला कित्येक वर्षांच भेटणही राहून जातं. कितीतरी छोट्या मोठ्या गोष्टी नेहमीच मनासारख्या होत नाहीत.
तर मनातील गोष्टी हव्या तशा घडल्या नाही तर माणसाची चिडचिड होणं साहजिकच आहे. परंतु या सगळ्याला ‘मन मारून जगणं’ हा काही पर्याय झाला का ? तर बिलकुल नाही. मनातील गोष्टी हव्या तशा घडत नसतील म्हणून काय झालं ? त्यामुळे मन मारून जगण्यात काहीच अर्थ नसतो.
कारण, मनातील गोष्टींपलिकडेही आयुष्य असतं.आपण मात्र तिथे डोकावत नाही.आपण एकाच गोष्टीला कवटाळून बसतो.पुढे काही होऊच शकत नाही असा विचार करून मन मारून जगत राहतो.पण खरं तर अशावेळेस आपण आपला दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे. मनातील गोष्ट आज नाही घडली तर उद्या नक्की घडू शकते असा एक पॉझिटिव्ह विचार प्रत्येकाने करायला हवा.कारण प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ हा द्यावाच लागतो.म्हणूनच एक गोष्ट घडेपर्यंत दुसऱ्या गोष्टीवर फोकस करायला हवा.
आजुबाजूला इतरही सुंदर सुंदर गोष्टी असतात.त्या एक्स्प्लोर करायला हव्या.जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत केवळ मनातीलच नाही तर मनाच्या बाहेरील गोष्टीही आपण अनुभवणं गरजेचं आहे. आणि मनातील एक गोष्ट हवी तशी घडली नाही तर दुसरीही घडणार नाही,असं तर नाही नं ? काहीतरी आपल्या मनातील आपल्याला हवं तसं नक्कीच घडत असतं.थोडे पेशंस ठेवून पहा,थोडा वेळ देऊन पहा,थोडं निरीक्षण करून पहा.मनातील गोष्टी अनेकदा हव्या तशा घडतात.
मित्रांनो, आपला घसा दुखत असताना कुणीतरी आपल्याच समोर आईस्क्रीम खात असतं.आणि आपलीही आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते. खूप वाटतं की थंड खावं,आवडती आईस्क्रीम खावी.पण नाईलाजाने आपण आपलं मन मारतो.पण त्यामागे काहीतरी कारण असतं नं ? त्यावेळी आपण क्षणभर नाराज होतो.
पण “ठीक आहे, आज माझा घसा दुखतोय तर थोडी काळजी घेईन. बरं वाटल्यावर माझ्या आवडीची आईस्क्रीम मी नक्की खाईन.” असा विचार करतो.थोडक्यात काय तर आपण त्याला थोडा वेळ देतो.
अगदी तसच मनातील इतर गोष्टींनाही हा नियम का असू नये ?
थोडं बिंधास्त आणि मोकळं जगायला शिका.मनातील गोष्टी हव्या तशा घडत नसतील तर मन मारून जगण्यापेक्षा आहे ते हसतहसत स्विकारून पुढे जायला शिका.एकाच ठिकाणी थांबायचं, तेही मन मारून…?
मजा नाही त्यात.त्यापेक्षा पुढे जाऊन दुसरं नवीन काहीतरी अनुभवा.काही गोष्टींना थोडा वेळ द्या.गोष्टी नक्कीच पूर्णत्वास निघाल्या असतील.
Be Patience.. Everything will be fine
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.