Skip to content

वास्तववादी ध्येय कसे निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी कसे प्रेरित व्हावे?

वास्तववादी ध्येय कसे निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी कसे प्रेरित व्हावे?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात काहीतरी मिळवायचं असत, काहीतरी साध्य करायचं असत. त्यासाठी त्याची धडपड, प्रयत्न चालू असतात. हे जे आयुष्यात काहीतरी मिळवणं असत, प्राप्त करण असत ते त्या व्यक्तीचं ध्येय असत. शर्यत लागल्यावर त्यात जिंकण, पहिल्या क्रमांक मिळवणं ये त्यात भाग घेतलेल्या स्पर्धकांच ध्येय असत. आणि त्यासाठी ते सुरुवातीपासूनच बेत आखायला सुरुवात करत असतात.

तश्याच पद्धतीने आपल्याला जे काही मिळवायचं आहे, जी काही आपली ध्येय आहेत ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला आधीपासून काही तयारी करावी लागते. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. कारण ध्येय निश्चित करणे इथपासून ते मिळवणं ही गोष्ट एक दोन दिवसात काही काळात होण्यासारखी नाही. हा एक प्रवास असतो जो आपल्याला ज्याची तयारी आपल्याला सुरुवातीलाच करावी लागते आणि ते मिळेपर्यंत करावी लागते.

जसं बाहेर प्रवासाला जाताना आपण आधीपासूनच सामानापासून तिथे जाऊन कुठे राहायचं, काय पहायचं इथपर्यंतची तयारी करतो तसच या बाबतीत असत. माझ्या मनात आज आल आणि मी ते करायला घेतल आणि ते पूर्ण देखील झालं इतक्या साध्या सरळ गोष्टी कधी नसतात. ध्येय ठरवणे असेल किंवा तिथपर्यंत पोहोचणं असेल सर्व काही विचारपूर्वक करण्याच्या गोष्टी आहेत.

बरेचदा काय होत आपल्या मनात खूप काही गोष्टी असतात, आपल्या बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. ज्याला आपण स्वप्न म्हणतो. मग एखाद्याला वाटेल आपलं मोठं थ्री स्टार, ५ स्टार हॉटेल असावं, मी एखाद्या मोठ्या कंपनीच मालक असावं. माणसानुसार त्याची स्वप्न देखील बदलत जात असतात.

स्वप्न पाहण्यात काहीच गैर नाही. पण आपण जी स्वप्न पाहतो किंवा सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो त्याला वास्तवाची धार पण लागते. अनेकांना जे मनात ठरवलं आहे तस न होण्याचं किंवा त्यात एकसारखं अपयश येण्याचं कारणच हे आहे की त्यांनी जी स्वप्न पाहिलेली असतात ज्यांच त्यांनी ध्येयामध्ये रूपांतर केलेलं असत ती अवास्तव असतात. वास्तविकतेचा त्यात विचार केलेला नसतो.

म्हणूनच ध्येय ठरवताना पहिली गोष्ट जी सर्वात महत्त्वाची आहे ती करायची ते म्हणजे वास्तववादी ध्येय निवडणे. जे वास्तवाला धरून आहे जे पूर्ण होऊ शकत असच ध्येय मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आता हे वास्तववादी ध्येय कसं ठरवायचं? तर त्यासाठी आपण जे काही मनात ठरवलं आहे ते एका कागदावर लिहून काढायचं.

कारण आपल्या मनात खूप गोष्टी असतात. पण त्याला मूर्त रूप देण्यासाठी पहिली पायरी म्हणजे ते लिहून काढणे. त्यानंतर ते मिळवण्यासाठी आपल्याकडे साधन काय आहेत, रिसोर्सेस काय आहेत ते लिहून काढणे त्याचा विचार करणे, हे सर्व करताना काय अडचणी येऊ शकतात ते लिहून काढणं, आपल्या क्षमता काय आहेत ते लिहिण कारण बरेचदा आपल्याला करायचं खूप काही असत पण आपल्या क्षमता तितक्या नसतात. आणि याची आपल्याला जाणीव देखील नसते.

म्हणून हे महत्त्वाचं आहे की आपल्याला आपल्या क्षमता माहीत पाहिजेत. आपण ती गोष्ट करू शकतो का नाही हे आपल्याला सुरुवातीलाच माहीत असल तर आपण पुढे काहीतरी प्रयत्न करू शकतो. अश्या पद्धतीने सारासार विचार करून सर्व बाजूंनी विचार करून ज्यामध्ये आजूबाजूची परिस्थिती, आपल्या क्षमता, साधन, अडथळे हे सर्व पाहून जेव्हा आपण आपलं ध्येय ठरवतो तेव्हा ते बऱ्याच प्रमाणात वास्तववादी ठरतं.

जसं वास्तववादी तसच ते स्मार्ट असलं पाहिजे. म्हणजेच कसं तर सुरुवातीला खूप मोठं ध्येय न ठरवता specific ध्येय ठरवणे. मला माझा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि मला दोन आठवड्यांमध्ये दोन पेपरचा अभ्यास करायचा आहे यात फरक आहे. तसच आपण जे काही ठरवतो ते विशिष्ट असल पाहिजे. त्यानंतरची पायरी म्हणजे ते मोजता आल पाहिजे. Measurable असल पाहिजे.

म्हणजेच आपण जे काही ठरवतो त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याकडे असला पाहिजे. यातून आपण कुठपर्यंत आलो आहोत, आपली प्रगती आपण पुढे जात आहोत की नाही तसच अजून किती प्रयत्न केले पाहिजेत हे समजत. Achievable म्हणजेच मिळवता येईल असच पाहिजे. अवास्तव ध्येय निराशा मिळवून देतात. Realistic म्हणजेच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वास्तववादी पाहिजे. आणि शेवटी ते वेळ मर्यादा असलेलं पाहिजे. आपण स्वतः ला एका ठराविक वेळेची मर्यादा घातली पाहिजे आणि त्यानुसार पुढं गेलं पाहिजे.

अस केलं तर आपण जे मिळवायचं आहे त्याकडे जास्त लक्ष केंद्रित करतो आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. हे ध्येय मिळवताना बरेच अडथळे येतात आणि ते येणार आहेत कारण सर्व गोष्टी आपल्या हातात असत नाहीत. पण अश्या वेळी निराश हताश न होता आपण आपल्या कामावर फोकस राहणं गरजेचं आहे.

आता कदाचित मला त्रास होत असेल पण आपण जर याचा दीर्घकालीन long term फायदा लक्षात घेतला तर आपण जे करतोय ते योग्य आहे हे आपल्या लक्षात येत. म्हणून कधीही ध्येय मिळवताना अडचणी येतील तेव्हा आताच्या तात्पुरत्या त्रासाकडे, किंवा आपली दिशाभूल करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष न देता दीर्घकालीन फायद्याकडे लक्ष द्यावे. यातून आपण ते साध्य करण्यासाठी प्रेरित देखील होतो आणि प्रेरित राहतो देखील. अश्या पद्धतीने आपण आपली ध्येय ठरवून ती पूर्ण करू शकतो.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “वास्तववादी ध्येय कसे निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी कसे प्रेरित व्हावे?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!