Skip to content

इतरांचा विचार करणाऱ्याला नेहमी त्रास का होतो??

इतरांचा विचार करणाऱ्याला नेहमी त्रास का होतो??


मयुरी महाजन


माणूस जन्माला येतो, तेव्हापासून तर तो अगदी मृत्यू शयेला टेकतो, तिथपर्यंत सर्व काही भाव भावनांच्या पिंजऱ्यात अडकून चाललेले असते, त्यामध्ये नाही म्हटलं, तरी इतरांचा विचार करून चालावे लागते ,आता या ठिकाणी दोन गोष्टी आहेत ,त्या म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार करणे, व आपणच आपले इतरांचा विचार करून चालतो, ते वेगळे ,

आता दोन्ही गोष्टींचा मतितार्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात येते, की लोक काय म्हणतील, या विचाराने आपण आपल्या स्वतःसाठी ठरवलेल्या कितीतरी गोष्टी न करणे, व आपल्या आनंदाची परिसीमा लोकांवर सोडणे, दुसरे म्हणजे आपणच इतरांचा विचार करतो व त्यामुळे स्वतःचं स्वतःचा त्रास वाढवून घेणे,

आपण मनुष्यप्राणी आहोत, इतरांचा विचार करणे, व मुळात विचार करणे ,हे आपल्याला लाभलेली देणगी आहे ,आणि यापेक्षाही सुंदर काय आहे माहितीय, आपण जे विचार करतो, ते विचार आपण बोलू शकतो ,मांडू शकतो ,सादर करू शकतो, खरंतर निसर्गाचे किती मोठे उपकार आहेत, आपल्यावर…. प्राणी पक्षी सुद्धा बोलतात, त्यांच्या त्यांच्या बोली भाषेत , पण त्यांचे ते जग फक्त त्यांच्या पुरतेच मर्यादित आहे, आपण मनुष्य मात्र कितीतरी बोलीभाषा बोलतो, व मांडतो,

आपण इतरांसाठी विचार करतो, खरंतर ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु इतरांचा विचार करून जगत राहणे, नेहमी त्यांना पहिली प्राँयोरिटी देणे, व इतरांसाठी विचार करता करता स्वतः त्यामध्ये गुंतून राहणे, त्यामुळे व्यक्तीचे स्वतःचे स्व तत्व बाजूला राहते, व इतरांचा कितीही विचार केला तरी त्याचा त्रास मात्र आपल्याला होतो,

बरेचदा आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला दुखावणे ,किंवा आपल्यामुळे त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची आपण काळजी घेतो, व इतरांचा विचार करत असताना आपण आपल्या स्वतःला किती त्रास करून घेतो ,याकडे मात्र आपण फारसे लक्ष पुरवत नाही, कारण आपल्या अर्थी आपला त्रास आपण आपल्या सहनशक्तीच्याही पलीकडे सहन करण्याची ताकद ठेवतो,

इतरांसाठी विचार करताना आपण आपली एक मर्यादा ठरवली पाहिजे ,जेणेकरून आपण दुसऱ्यांना न्याय देता देता स्वतःवरती अन्याय होऊ देणार नाही ,बघा बरेचदा जो व्यक्ती फक्त स्वतःपुरता व स्वतःसाठी विचार करतो, त्याला स्वार्थी selfish आहे, असं म्हणून संबोधलं जातं, व जी व्यक्ती नेहमी इतरांचा विचार करते, इतरांसाठी जगते, त्या व्यक्तीचा व त्या व्यक्तीने दिलेले डिवोशन त्या व्यक्तीने सोसलेला त्रास हा त्या व्यक्तीला एका महानतेच्या जागेवर आहे ,असं भासवतो, म्हणजेच जो त्रास सहन करतो, तो महान, व जो स्वतः च्या आनंदाचा स्वतःसाठी विचार करतो, तो स्वार्थी, ही मानसिकता असल्यामुळे आपण आपल्यासाठी कमी व इतरांसाठी जास्त विचार करतो,

जर आपण इतरांसाठी विचार करत असणार, तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु इतरांच्या विचारांनी जर आपण चालत असू, तर आपल्या विचारांचा आपल्या जीवनासाठी काय उपयोग, आपण फक्त इतरांच्या रिमोट कंट्रोल वर चालणारी मशीन व आपल्यात फरक तो काय असणार ,

स्वतःसाठी आपला आत्मसन्मान हे सुद्धा सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ,ज्याला आपण जोपासले पाहिजे, इतरांचा विचार करताना आपल्याला त्रास यासाठी सुद्धा होतो, की आपल्याला वाटतं असते की आपण इतरांचा विचार करून त्यांच्या आयुष्यात सर्व काही अगदी सुरळीतपणे पार पाडू शकतो,

परंतु लक्षात घेणे गरजेचे आहे, आयुष्याच्या या प्रवासात सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व आपल्या विचाराप्रमाणे घडतीलच असे नाही, पण आहे ती परिस्थिती स्वीकारणे ,व त्या परिस्थितीतून आपल्यासाठी जगण्याची एक वाट निर्माण करणे, हे आपण नक्कीच करू शकतो, शेवटी कसं आहे, आयुष्यात त्रास करून घेतला तर कशाचाही त्रास होतो, आणि साजरा केला ,तर प्रत्येक क्षण खास होतो…


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “इतरांचा विचार करणाऱ्याला नेहमी त्रास का होतो??”

  1. खुप छान लेख 👌🏻 त्रास करून घेतला कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर प्रत्येक क्षण खास होतो 👍🏻🙏🏻

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!