स्त्रीच्या दृष्टीने पुरुषाच्या प्रेमात पडणे हेच तिचे पूर्ण अस्तित्व असते.
सोनाली जे.
एका ठराविक वयात येताना जसे साधारणपणे १२ ते १३ वर्षाच्या पुढे मुले असोत अथवा मुली म्हणजेच स्त्री असो की पुरुष यांच्यात शारीरिक बदल घडून येत असतात. हार्मोन्स मध्ये बदल घडून येतात. त्यातून लोह चुंबक जसे असते विरुद्ध पोल आकर्षित करतात तसे मुले आणि मुली हे एकमेकांना आकर्षित करत असतात. भिन्नलिंगी आकर्षण , तसे आजकाल bisexual , gay, lesbien
असे अनेक प्रकारचे आकर्षण आणि शारीरिक संबंध ही येतात.
पण आज आपण स्त्री आणि पुरुष या दोघांच्या पुरता मर्यादित विचार करूया.
स्त्रीच्या दृष्टीने पुरुषाच्या प्रेमात पडणे हेच तिचे पूर्ण अस्तित्व असते.
अगदी सामान्य गोष्ट किंवा सामान्य भावना या आहेत की स्त्रीच्या दृष्टीने पुरुषाच्या प्रेमात पडणे आणि त्यात तिचे पूर्ण अस्तित्व असते. विचार करता ? कसे काय ? मनात आले ना हे काहीही काय ?
पण आपण स्टेप बाय स्टेप विचार करू.
स्त्रीच्या दृष्टीने पुरुषाच्या प्रेमात पडणे हेच तिचे पूर्ण अस्तित्व असते. :
वयात आल्यावर प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री ला विरुद्ध लिंगी आकर्षण हे असते.
त्यात काही स्त्रियांना आणि पुरुषांना बाह्य व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण असते म्हणजे आकर्षक फिगर , उंची , चाफेकळी नाक , गालावरची खळी असेल , सुंदर सिल्की केस , डोळे , पुरुषाच्या बाबतीत त्याचे पिळदार शरीरयष्टी, आकर्षक खांदे, दाढी , मिशी , हे दिसण्या विषयी झाले. तसेच एखाद्याच्या आवाजातला गोडवा, माधुर्य, नम्रता , आपुलकी, तर एखाद्याचा भारदस्त , कणखर आवाज यातून ही आकर्षण निर्माण होते. बहुदा पुरुषाला असा नाजूक आवाज शोभत ही नाही आणि स्त्रिया त्याच्या फारशा प्रेमात ही पडत नाहीत.
आता काही स्त्रिया या बाह्य व्यक्तिमत्त्वावर आकर्षित होतात च. पण आंतरिक व्यक्तिमत्त्वावर ही आकर्षित होतात. आणि प्रेमात पडतात. जसे की बुद्धिमत्ता , हुशारी , चातुर्य , व्यवहारिकता , शैक्षणिक , व्यवसाय , नोकरी किंवा आर्थिक गोष्टीत सेटल , विचार आणि वर्तन यांचे संयम , वैचारिक बैठक strong असणे. त्याचे कर्तुत्व , आत्म विश्वास, जिद्द , धडाडी या गोष्टींवर ही स्त्रिया आकर्षित होवून प्रेमात पडत असतात.
आता लग्नापूर्वी पुरुषाच्या प्रेमात पडताना स्त्री खूप बारकावे विचारात घेवून प्रेमात पडते का ? खरे तर प्रेमात जाणून बुजून ठरवून कोणी पडत नसते.
प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे. त्यामुळे स्त्री असो की पुरुष प्रेमात पडताना आकर्षण हे प्रामुख्याने असते.
स्त्रीच्या दृष्टीने लग्नापूर्वी पुरुषाच्या प्रेमात पडणे ही एक गोष्ट झाली आणि हेच लग्न झाल्यावर ही .नवऱ्याला आपलेसे करणे, नात्यात विश्वास निर्माण करणे , पारदर्शकता निर्माण करणे, एकमेकांच्या विष्यीआदर , प्रेम ,ओढ , आपुलकी निर्माण करणे हे प्रेमच तर असते. हे प्रेम सफल होणे. यशस्वी होणे , केवळ काही क्षण , दिवस , वर्ष नाही तर आयुष्यभर एकमेकांची उत्तम साथ लाभणे, ते प्रेम वाढत जावून वृध्दींगत होणे , त्यात आपुलकी , ओढ , विश्वास आणि सुरक्षितता वाढत जाणे आणि किती ही झाले तरी दोन भिन्न व्यक्तिमत्त्व एकत्र येतात , विचार , वेगळे संस्कार ,सभोवतालच्या वेगळ्या परिस्थितीतून एकत्र आले असतात. घरच्यांची वागणूक , लहान वयात झालेले मनावरचे आघात, आर्थिक परिस्थतीमुळे उच्च नीच भेदभाव , त्यातून येणाऱ्या अडचणी , संकटे किंवा एखाद्याचे आयुष्य खूप smooth , सुरक्षित असते त्याला कधीच कोणत्या गोष्टीची उणीव भासली नसते. , स्ट्रगल करावे लागले नसते. अनेक गोष्टी मध्ये तफावत असते. त्यातून वर्तन आणि विचार हे घडत असतात. त्यामुळे स्त्री आणि पुरुष प्रेमात पडताना फार कमी वेळा या सगळ्या गोष्टींचे विचार करून प्रेमात पडत असावेत. किंवा जवळजवळ नाहीच. कारण असे विचार करणारे प्रेम नाही करणार. व्यवहार करतील.
प्रेमात स्त्री पडली आहे मात्र समोरचा पुरुष आहे त्याला माहितीच नाही असे असेल तर ? हे एकतर्फी प्रेम झाले ना ? अशावेळी ती स्त्री काय करेल ? जो पुरुष आवडला आहे. ज्याच्यावर प्रेम करते. त्याच्या कायम संपर्कात राहण्याच्या युक्त्या करेल. काही ना काही कारणाने त्याच्याशी बोलेल. संभाषण वाढवेल. त्याच्या विषयी इतरांच्या कडून माहिती मिळवेल. आणि त्याच्याही मनात तिच्या विषयी प्रेम जागे करण्याचा प्रयत्न करेल.
प्रेमाचे रूपांतर अर्थातच लग्न , संसार यासारख्या सुंदर स्वप्नात आणि सत्यात व्हावे अशी प्रत्येक स्त्री ची ईच्छा असते. अर्थात arrange पद्धतीने विवाह असेल तरी ही तिची हीच इच्छा असते की , आपले नाते, आपले प्रेम mature होवून त्या प्रेमाला समाज , नातेवाईक , शेजारी या सर्वांकडून जणू मान्यता च म्हणा ना , ती मिळावी या करिता पुढची धडपड असते. संसार करताना एकमेकांच्या आवडी निवडी अजून जास्त समजून घेतल्या जातात.
मन जवळ असतेच पण शरीर ही जवळ येते. रोजचा सहवास यातून अंतर कमी होवून विश्वास ही वाढतो आणि एक प्रकारची नात्यातली सुरक्षितता येते. खात्री होते की आता प्रेमाच्या टप्प्यातून आपण पत्नी ची अतिशय मोठी आणि कायम स्वरुपी भूमिका निभावत आहोत. ते प्रेमाचे नाते आता नवरा बायकोच्या नात्यात दृढ झाले आहे. Permanent नाते.
नात्यात एक प्रकारची सुरक्षितता आली असते. जेव्हा प्रेमात असतो तेव्हा भीती असते काही कारणाने प्रेम यशस्वी झाले नाही तर? आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने आपल्याला सोडून दिले तर ?आपल्याला सोडून इतर कोणाच्या प्रेमात पडला तर? किंवा इतर कोणाशी लग्न केले तर ? याचे कारण ती स्त्री त्याच्यात इतकी गुंतली असते , त्याच्याविषयी प्रेम , ओढ , आपुलकी वाटत असते.
प्रसंगी तिला इतरांच्या सोबत jealousy ही वाढते. आपला हक्क आहे त्याच्यावर. पझेसिव्ह नेस वाढतो याचे कारण तिचं जग हे सगळे त्याच्या भोवती च फिरत असते. सतत त्याचे विचार , त्याची ओढ मनात असते. आणि ही त्याला समजू शकत नाही किंवा समजली नाही आणि तो आपल्याला सोडून गेला तर याची भीती ही मनात असते. पण हे कायम एकत्र असताना , लग्नानंतर सतत सहवास असताना कमी होते त्याची जागा मानसिक सुरक्षितता घेते.
या खेरीज विवाह , संसार , शारीरिक संबंध यातून वंश वाढीस चालना मिळते शिवाय दोघांच्या मध्ये अजून घट्ट नाते निर्माण होते. काही अपवाद ही असतात. पण ते विचार यात नको करायला.
जरी मुले झाली त्यांच्या सोबत वेळ , लाड करत असेल तरी ही तिचे नवऱ्यावरचे आणि नवऱ्याचे तिच्यावरचं प्रेम कमी होत नाही. तिची जागा त्याच्या आयुष्यात अढळ असते, तिची मानसिक दृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि प्रत्येक गोष्टीत त्याला गरज असते , साथ हवी असते.याचे कारण एवढ्या काळाने नाते mature झाले असते. सुरक्षित झाले असते. आणि हेच सगळ्यात स्त्रीला समाधानकारक असते . सुख असते तिचे त्यात .आणि तिला त्यात पूर्णत्व मिळत असते.
आपली सदैव साथ देणारा आपला खंबीर आधार आपल्या सोबत आहे हे मानसिक समाधान असते. पुरुष काळजी घेणारा असेल तर ती त्याच्या प्रेमात अखंड बुडते. यात ही काही पुरुष अपवाद असतात ज्यांचे त्रास होतात पण इथे आपण तो उल्लेख घेत नाही आहोत. तो विचार इथे घेत नाही आहोत.
स्त्रीच्या दृष्टीने ती ज्या पुरुषाच्या प्रेमात पडली, ज्याने तिला समाजात त्याच्या सोबतचे तिचे आदरयुक्त स्थान मिळवून दिले , ज्याच्यावर ती मनसोक्त प्रेम करते आणि तो ही करतो. त्यांचे नाते फुलत गेले. दोनचे चार आणि नंतर मुले असा संसार वेली वर बहार येत गेला. सामाजिक, आर्थिक ,मानसिक सुरक्षितता , कायदा , नैतिक बंधन ,यातून रक्षण , प्रेम , आपुलकी, ओढ , काळजी घेणारी आपली व्यक्ती कायम साथ , सोबत आणि आधार देत असते.
शारीरिक , मानसिक सुख मिळत असते, तिच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तो धडपडत असतो. समाजात एक status निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. अनेक चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतो. बाहेरच्या जगात फिरवून नवनवीन. माहिती मिळवून देत असतो. अनेक ठिकाणी सोबत फिरायला घेवून जावून तिथल्या नवनवीन गोष्टी दाखवून आयुष्यात अजून उत्साह निर्माण करत असतो. ती , आणि मुले जेव्हा त्याच्या आयुष्यात सर्वोच्च स्थानावर आहेत हे आत्मिक समाधान ही असते. तेव्हा ती स्त्री खऱ्या अर्थाने परिपूर्ण जीवन जगत असते.
सुख , समाधान तर मिळत असतेच पण सुंदर असे आयुष्य तिच्या हक्काच्या आणि प्रेमाच्या जोडीदारासोबत आनंदाने जगत असते. .स्त्रीच्या दृष्टीने पुरुषाच्या प्रेमात पडणे हेच तिचे पूर्ण अस्तित्व असते.खरे तर खूप दूरदर्शी विचार करून स्त्री प्रेमात पडत नाही. पण ती प्रेमात पडली की खूप छान साथ देते.
मनापासून गोष्टी करते अशावेळी तिला साथ देणारा पुरुष मिळाला तर ती भरभरून आनंद आणि सुख देते. काळजी ही घेते. मार्गदर्शन ही करते. कठीण प्रसंगी साथ ही देते. आणि म्हणूनच स्त्रीच्या दृष्टीने पुरुषाच्या प्रेमात पडणे हेच तिचे पूर्ण अस्तित्व असते. नाही तर ती एकाकी पडेल. आई वडिलांची साथ ही कायमस्वरूपी नसणार. भावंडे ही त्यांच्या विश्वात दंग होतात. नातेवाईक असून नसल्यासारखे कारण कायमस्वरूपी साथ देणारे , जबाबदारी घेणारे कोणी नसतात. आयुष्यभर एकटे राहणाऱ्या मुली हीआहेत पण त्यांची दुःख , एकाकीपण, प्रॉब्लेम्स हे अजून वेगळे.
म्हणूनच स्त्रीच्या दृष्टीने आपले स्वतच्या हक्काचे कोणी असणे गरजेचे असते. आणि प्रेम मग ते लग्नानंतरचे ही असेल किंवा आधीचे जे विवाहात रूपांतरित झाले ते प्रेम म्हणजे च तिचे पूर्ण अस्तित्व असते.
प्रेम समजायला आणि समजून घ्यायला खूप अवघड असते. समज , गैरसमज होत असतात. अडी अडचणी येतात, संकटे येतात, त्यातून तावून सलाखुन प्रत्येकाला कधी ना कधी जावे लागते. फक्त हार न मानता पुढे जात राहायचे. आणि हीच जिद्द स्त्री कडे असते ती पुरुषाला योग्य ती साथ देवून त्याला ही खंबीर बनवत असते.
अशा नात्यात स्त्री एवढी गुंतून पडते की ती तिचे स्वतंत्र अस्तित्वच विसरते. स्त्रीच्या दृष्टीने पुरुषाच्या प्रेमात पडणे म्हणजे त्याच्यात एकरूप होणे. तन, मन सगळ्यांनी आणि हेच तिचे पूर्ण अस्तित्व असते.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
अतिशय सुंदर पद्धतीने बऱ्याच चांगल्या विषयावर विचार मांडले आहेत
Khup chhan 😊