Skip to content

समोरच्या व्यक्तीचं मोटीव्हेशन वाढवायचे असेल तर काय करावे?

समोरच्या व्यक्तीचं मोटीव्हेशन वाढवायचे असेल तर काय करावे?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


अनिता आणि कावेरी या दोघी सख्या जावा होत्या. दोघांनाही मुलं होती. अनिश हा अनिताचा मुलगा तर किमया ही कावेरीची मुलगी. अनिश पाचवीला आणि कावेरी तिसरीत शिकत होती. दोघंही एकाच शाळेत जायचे. एकत्र कुटुंब त्यामुळे सर्व जण सोबतच राहत असत. कावेरी आणि अनिता दोघीही गृहिणीच होत्या. बाहेरची काही जबाबदारी नव्हती त्यामुळे मुलांचं सर्व त्याच करायच्या. अभ्यास देखील त्या दोघी घेत असत. त्यामुळे क्लासचा वैगरे काही प्रश्नच नव्हता.

जरी त्या दोघी अभ्यास घेत असल्या तरी दोघांची पद्धत खूपच वेगळी होती आणि ते स्वाभाविक होत कारण दोघांचेही स्वभाव वेगवेगळे होते. अनिता जेव्हा जेव्हा अनिशला घेऊन शिकवायला बसायची तेव्हा ती त्याने अभ्यासात केलेल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीबद्दल, जी त्याच्यकडून चांगली झाली आहे त्याला शाबासकी द्यायची. त्याला छान छान compliment द्यायची, अनिशला खेळ असेल कोणतीतरी ॲक्टिव्हीटी असेल तर त्यातून शिकवलेल जास्त समजायचं आणि आवडायचं.

अनिता पण तेच करत होती. कोणतीही गोष्ट सरळसोट निरस पद्धतीने न शिकवता त्याला आवडेल त्या भाषेत, त्याच कौतुक करत त्याला शिकवत असे. याचा परिणाम असा व्ह्यायचा की अनिश अभ्यासाला कंटाळायचा नाही. तो दुसऱ्या दिवशी अजून उत्साहाने तयार व्हायचा आणि मनापासून शिकण्याचा प्रयत्न करायचा.

याउलट कावेरीच होत. किमया आता कुठे तिसरीत होती. तरी देखील कावेरी तिला अगदी बारीक सारीक चुकांवर ओरडत असे. तिच्याकडून सक्तीने अभ्यास करून घेत असे. किमयाला ड्रॉइंग खूप आवडायचं. पण कावेरीने अट घातली होती जोपर्यंत अभ्यास नीट केला जात नाही, पूर्ण केला जात नाही तोपर्यंत दुसर काहीही करायचं नाही.

अस बऱ्याचदा झालं होत की किमयाने अभ्यास पूर्ण केला नाही म्हणून तिला शिक्षा केली होती. टीव्ही पहायचा नाही, बाहेर खेळायला जायच नाही, चॉकलेट्स बंद. अनिताला हे सर्व पाहून वाईट वाटायचं. ती कावेरीला समजावायची देखील “की अस करू नको, अजून मुल लहान आहेत. आपण त्यांच्या कलाने घेऊन त्यांना प्रेमाने शिकवलं की ती शिकतात.” पण कावेरीवर त्याचा काही परिणाम व्ह्यायचा नाही.

तिचं एकच म्हणणं होत की मुलांचे अती लाड केले की ती बिघडतात, ती कोणाचं ऐकत नाहीत. इथे मुद्दा लाड करण्याचा नव्हता तर मुलांमध्ये अभ्यासाविषयी गोडी निर्माण करण्याचा होता. जे अनिता चांगल्या पद्धतीने करत होती. कारण किमयाला इतका ओरडा मिळाला होता किंवा रोज मिळायचा की ती अभ्यासाच्या नावानेच घाबरून जायची, त्याबद्दल गोडी निर्माण होणं तर दूरचा विषय झाला.

या दोघींचा मुळ उद्देश मुलांना अभ्यास करायला लावणे, त्यांच्याकडून तो नीट, पूर्ण करून घेणे हाच होता. पण तो यशस्वी फक्त अनिताच्या बाबतीत होत होता. किमया अभ्यास करत नव्हती का? तर करत होती. पण त्यात अभ्यसाविषयी गोडी, आस्था कमी आणि भीती जास्त होती. मी अभ्यास नाही केला तर आई मला रागावेल, काहीतरी परत बंद करेल या विचाराने ती कसाबसा अभ्यास करे पण त्यात चुकाच जास्त होत. अनिशच तस नव्हत. तो आवडीने अभ्यास करायचा, आज आई आपल्याला काय नवीन शिकवणार अस त्याच व्हायचं.

त्यामुळे अभ्यासाचं मोटीव्हेशन जर कोणामध्ये जास्त असेल तर ते अनिशमध्ये होत. याला कारण देखील होत. अनिता आणि कावेरीच्या अभ्यास घेण्याच्या ज्या पद्धती होत्या त्यातून हा फरक पडला होता. अनिता अनिशला ज्या गोष्टी आवडतात, ज्यातून त्याला आनंद मिळतो त्यांची पूर्तता करून त्याला अभ्यास शिकवत होती. ज्याला positive reinforcement असं म्हणतात.

म्हणजेच समोरच्या व्यक्तीला जे महत्त्वाचं वाटत ते त्याला देणे. अस केल्याने त्या व्यक्तीची ठराविक गोष्ट करण्याची प्रेरणा वाढते, त्याची शक्यता वाढते. एखाद्याला चांगल काही केलं की सर्वांसमोर शाबासकी देणं, त्याच कौतुक करण याला का महत्त्व दिलं आहे? तर ते यासाठीच. कारण यातून त्या व्यक्तीमध्ये सकारात्मक भाव निर्माण होतात. आणि त्यांची काम करण्याची प्रेरणा पण वाढते.

लहान मुलांना देखील तू जर माझं ऐकलस, शहाण्यासारखा वागलास तर मी चॉकलेट देईन, गाडी आणून देईन अस म्हटल जात आणि अस ऐकल्यावर ते मुल आपण सांगू ते करायला तयार देखील होत. कारण त्याच्यासाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कोणतीही व्यक्ती असुदे, कोणत्याही वयाची असुदे जेव्हा आपण त्यांना positive reinforcement देतो म्हणजेच त्यांना ज्यामध्ये आनंद मिळेल अश्या गोष्टी करतो किंवा त्याला महत्व देतो तेव्हा त्यांची प्रेरणा वाढते.

याउलट जेव्हा एखाद काम करण्यासाठी जेव्हा शिक्षेचा वापर केला जातो, तेव्हा समोरची व्यक्ती काम करते, पण त्यात तितका प्रभावीपणा राहत नाही. कावेरी तेच करायची, किमयाला जे आवडत ते तिच्याकडून काढून घेणं, तिच्या बाकीच्या गोष्टी बंद करण या सर्व गोष्टी करून तिला शिक्षा देत होती. हेच कारण होत की किमया अभ्यास करताना बरेचदा घाबरलेली किंवा बावरलेली असायची.

आपल्या पैकी बहुतेक सर्वांनी त्या त्या वेळी या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतला असेल. पण जर आपण तुलना करून पहिली तर आपल्या हेच लक्षात येत की आपल्याला समोरची व्यक्ती ओरडुन काहीतरी करायला सांगते त्याहून जास्त आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी झाल्या तर आपलं ते काम करायची प्रेरणा वाढते. प्रेरणा म्हणजे काय तर एखाद विशिष्ट काम करायला लावणारी ऊर्जा. Driving force. आता ही प्रेरणा आंतरिक पण असते आणि बाह्य.

जेव्हा आपण कोणीही काही न सांगता स्वतःहून गोष्टी करतो तेव्हा आपल्यामध्ये internal motivation जास्त असत. तेच जर दुसऱ्या कोणी सांगून आपण एखादी गोष्ट करत असू तर इथे external motivation वापरलेलं असत. आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून काही करून घ्यायचं असत त्यासाठी आपण जे करतो external motivation असत. ज्याची ही एक reinforcement ही एक पद्धत आहे. वर्तनवादी शास्त्रज्ञ बी. एफ. स्किनर ने याचा वापर आपल्या प्रयोगामध्ये केला. आणि संशोधनातून असं दिसून आलं आहे की शिक्षेहून सकारात्मक पद्धतीने केलेल्या गोष्टींचा जास्त प्रभाव पडतो.

अश्या पद्धतीने जर समोरच्या व्यक्तीचं गरजा लक्षात घेऊन, त्यांना महत्त्व देऊन, त्यांच्या कलाने घेऊन आपण आपली गोष्ट त्यांना सांगितली तर ती करण्याची शक्यता वाढते. शक्यता वाढते याच कारण “motivation doesn’t guarantee change.” कारण आपल्या कश्यावर कधी नियंत्रण असू शकत नाही. पण आपण आपल्या हातात असलेल्या गोष्टी नक्की करू शकतो, जे आपल्या हातात आहे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!