मोठ्या बाता मारून सहानुभूती दाखवणारी माणसे सर्वात जास्त धोकादायक असतात.
मयुरी महाजन
या जगात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेतच, आणि त्या असणारच आहे, फक्त आपला कस लागतो, तो म्हणजे त्या प्रवृत्ती ओळखण्यात, कारण आपल्याला जर व्यक्तीची प्रवृत्ती ओळखता आली, तर आपल्यासाठी असणारी धोक्याची घंटा आपण रोखू शकतो,
साहजिकच बोलणं हा माणसाचा स्वाभाविक धर्म आहेचं, काही माणसे जास्त बोलकी असतात, काही मात्र शांत असतात, काही बाता मारून काम काढणारी असतात, आता या सर्वांमध्ये कितीही प्रकारची लोक असली तरी, आपण त्याच्या खोलात शिरायचे नाही, कारण त्याचा आपल्याला त्रास होत असतो,
मोठ्या माता मारून सहानुभूती दाखवणारी माणसे सर्वात जास्त धोकादायक असतात, काही माणसे बाता मारण्यात इतकी पटाईत असतात, की त्यांनी त्याबाता मारण्यात आपल्याला खोटी सहानुभूती कधी दिली, हे आपल्याला कळत सुद्धा नाही, त्यासाठी सहानुभूती दाखवणे व प्रत्यक्षपणे वेळेला तशी कृती होणे, यामध्ये खूप अंतर असलेले बघायला मिळते, त्यासाठी अशी माणसे आपल्यासाठी सर्वात जास्त धोकादायक असतात,
सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात असतात ,परंतु त्या प्रसंगांमध्ये आपण कुणाच्याही मोठमोठ्या बाता ऐकून जर त्या सहानुभूती दाखवणाऱ्या व्यक्तीच्या विश्वासावर अवलंबून असणार, तर ते आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकते, आयुष्यामध्ये बरेच प्रसंग असे असतात ,की जेव्हा व्यक्तीला कुणाच्याही सल्ल्याची किंवा सहानुभूतीची आवश्यकता नसते, तर साथ पाहिजे असते, त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी, बाता मारणारी व्यक्ती खोटी सहानुभूती दाखवते, आपल्याला खरोखर विश्वास पटावा किंवा आपण पूर्णतः विश्वास ठेवावा,
म्हणून त्या बाता असतात, आणि आपण मात्र त्या सहानुभूतीला एक जवळीक समजून भूलून जात असतो, आणि आपल्यासाठी अशी माणसं सर्वात जास्त धोकादायक आहेत, याची पुसटशी सुद्धा शंका आपल्याला जाणवत नाही, कारण बाता मारणार्याच्या बाता आपण इतक्या भावनिकपणे ऐकलेल्या असतात, की आपल्या ती सहानुभूती आपल्यासाठीचं होती व खरी भासते,
दुःखाचे प्रसंग किंवा घटना ह्या कधी कमी अधिक प्रमाणात व कमी अधिक तीव्रतेच्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात, त्यावेळी दुःख सावरायला, व आवरायला कोणाचा तरी हात पाठीवरती असावा असे वाट,ते व सहानुभूतीचे दोन शब्द कोणीतरी दिले, तरी त्याचे मोल त्यावेळेस जास्त वाटते, परंतु लक्षात घ्या,
आपल्यावर कितीही मोठे दुःख कोसळू द्या, कितीही मोठे संकट येऊ द्या, त्यावेळेस आपल्याला सहानुभूती दाखवणारे व आपल्यासाठी आपल्या बाजूने गोडवे गाणारे, हे आपले खरे शुभचिंतक असतीलचं, असे नाही, कारण हीच ती वेळ असते ज्यावेळेस आपण पूर्णतः आपल्या स्वतःला भुललेलो असतो ,आणि याचा गैरफायदा घेऊन कुणी तुमचे नुकसान करण्याची शक्यता जास्त असते, व त्याच्या मागची बाजू म्हणजे स्वतःचे काम त्यामागे काढून घेऊन आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी लोक तुमचा वापर करून घेतील,
जसे आपण बरेचदा वाचतो, ऐकतोही , की आपलेपणा दाखवणारी सर्वच माणसे आपली नसतात, त्याचप्रमाणे नुसत्या मोठ्या बाता मारून सहानुभूती दाखवणारी माणसे सुद्धा सहानुभूतीचा वापर करून घेणारी सुद्धा असतात, व ही माणसे सर्वात जास्त धोकादायक असतात,
दुःखात असणारी व्यक्ती सहानुभूतीची भुकेली असते, आणि मोठ्या बाता मारून सहानुभूती दाखवणारी व्यक्ती नेमकी तीच गोष्ट घेरते व आपल्याला सहानुभूती दर्शवते, परंतु आपल्यासाठी ते धोक्याचे आहे, हे आपल्या लक्षात येत नाही,
कधी कधी दूरच्या व्यक्ती पेक्षा जवळच्या व्यक्तीकडून धोका होण्याची शक्यता जास्त असते, बाता मारून सहानुभूती दाखवणे व खरच आपल्याविषयी सहानुभूती असणे, यातील फरक आपल्यालाही ओळखता यायला हवा, तरच आपणही काही धोक्यांपासून वाचू शकतो…
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

