समजूतदार व्यक्ती नाते सांभाळणं बंद करतो, तेव्हा त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचलेली असते.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
राकेशने खूप विचार करून हा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेणं त्याच्यासाठी सोपं नक्कीच नव्हतं. पण त्याहून जास्त काहीतरी महत्त्वाचं होत म्हणून तो या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला होता. गोष्ट त्याच्या आत्मसन्मानाची होती. त्याच्या स्व ची होती. ज्याला त्याने इतकी वर्ष बाजूला ठेवलं होत. त्याचा विचार केला नव्हता फक्त आणि फक्त नात सांभाळायचं, टिकवायचं म्हणून. पण नात देखील तिथेच टिकत जिथे एकमेकांचा आदर केला जातो, समजुतीची भावना दोघांमध्ये असते. इथे जो समतोल असतो तो दोघांकडून समान प्रयत्न करण्यातून आलेला असतो.
प्रयत्न कसला तर नात टिकवण्यासाठी, जपण्यासाठी ते खुलवण्यासाठी करण्यात आलेल्या गोष्टींचा. मग त्यात समजूतदारपणा आला, प्रेम, आदर, माया, काळजी या सर्व गोष्टी आल्या. नात हे दोन माणसांच्या देवाण घेवाणीतून बनत असत. एक माणूस त्याला वाटेल तस वागतोय आणि दुसरा मात्र एकसारखं समजून घेतोय, गोष्टी सोडून देतोय अस होत असेल तर ते नात फार काळ नाही टिकत. टिकलं तरी ते healthy असत नाही.
राकेशच्या बाबतीत तेच झालं. त्याचा स्वभाव मुळपासूनच समजून घेण्याचा, सर्वांना सांभाळून घेण्याचा. समोरच्याची चूक असली तरी हा स्वतःच्या अंगावर घेई. त्याच्यासाठी माणसं, नाती जास्त महत्त्वाची होती. त्याच्यांसाठी तो काहीही करायला तयार होता. पण तो जितकं करत होता तेव्हढ त्याला कधी परत मिळालच नाही. उलट अपमान आणि त्रासच मिळाला.
प्रीती सोबत त्याचं लव्ह मॅरेज झालं होत. दोघांची कॉलेजमधली ओळख. त्याचा हा समजूतदार, मनमिळाऊ स्वभाव तिला आवडायचा. बोलण पण साधं, कधी त्यात अहंकार नाही की मोठेपणा नाही. खर तर राकेशच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता. पण त्याला मात्र स्वतःच्या पायावर उभं राहायचं होत. स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करायचं होत. अर्थात त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत लागणार होती, कष्ट लागणार होते.
लगेच काही त्याला सर्व मिळणार नव्हत. तरी तो हे सर्व करायला तयार होता. त्याला आयत काहीही नको होत. प्रीती सोबत जेव्हा तो नात्यामध्ये आला तेव्हा त्याने या सर्व गोष्टी तिला स्पष्ट केल्या होत्या. आणि तिला पण हा निर्णय आवडला होता.
अगदी लग्न होईपर्यंत, त्यानंतर काही काळ सर्व ठीक होत. पण त्यानंतर मात्र प्रीतीच्या तक्रारी सुरू झाल्या. स्वतःच सर्व असताना आपण असं दुसरीकडे राहतो, भाड्याच्या घरात राहायला लागत. बाकीची ऐशोआरामात राहत असताना आपण अस राहतो. लग्न करताना काय काय वचन दिली होती, आता त्यातल काहीही पूर्ण करता येत नाही.
तुझ्यामध्ये ती क्षमताच नाही की तू काही करू शकशील अस ती त्याला बोलून दाखवायची. ही गोष्ट खरी होती की ते भाड्याच्या घरात राहत होते. पण ही देखील वास्तविकता होती की त्याने लग्न करतानाच या सर्व गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. सुरुवातीचा काही काळ आपल्याला कष्ट करावे लागतील हे त्याने आधी सांगितलेलं असताना देखील प्रीती अस वागत होती. जे काही काम होत ते सर्व राकेश करायचा. प्रीती घरातच असायची.
बरेचदा बाहेरून येऊन राकेश घरात काही राहून गेलं असेल, करायचं राहील असेल तर करून टाकायचा. का ? तर प्रीतीला या सर्वाची सवय नव्हती म्हणून. पण त्याची या गोष्टी बद्दल काही तक्रार नव्हती. तिला काम करण्यासाठी त्याने कधीही आग्रह केला नाही. त्याची इतकीच अपेक्षा होती की तो जे काही प्रयत्न करत होता, कष्ट करत होता त्यात तिने त्याची साथ द्यावी. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला कसा हातभार लावता येईल याकडे लक्ष द्यावं.
मदत करण तर कधी झालच नाही, पण एकसारखे टोमणे की कसं तुला काहीच जमत नाही, कसा तो मूर्ख आहेस, स्वतःच सर्व असताना तू सर्व सोडून आलास आणि मी पण तुझ्याशी लग्न केलं अश्या गोष्टी ती बोलून दाखवत असे. त्याला या बोलण्याचा त्रास व्ह्यायचा. पण तरीही तो तिला समजून घ्यायचा.
ती चिडचिड होते म्हणून तशी बोलत असणार, तिच्या मनात अस काही नसेल अस तो स्वतःच स्वतः ला समजवायचा. पण माणूस कितीही समजूतदार असला तरी त्याला देखील काही मर्यादा असतातच. एका मर्यादेपर्यंत तो सर्व सहन करू शकतो. पण जिथे आपल्या अस्तित्वावर, आपल्या माणूसपणावर सतत टीका केली जाते, जिथे आपल्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचते तिथे समजूतदार पण बाजूला जातो.
अश्या चांगुलपणाचा फायदाच काय ज्यातून आपलंच नुकसान होत असेल? तो इतके प्रयत्न करत होतो नात सांभाळायचा, टिकवायचा. पण हे सर्व प्रीती कडून होताना दिसत नव्हत. तिला त्याच प्रेम, त्याची कळकळ कधी समजलीच नाही. तिच्या बोलण्यात नेहमी तक्रारीचा सुर असायचा.
राकेश तरी किती सहन करणार? नंतर नंतर त्याच्यामध्ये वाद होऊ लागले. आणि राकेशला समजून चुकलं की आता हे नात सांभाळून ठेवण्यात काही अर्थ नाही. जिथे आपला काही आदर नाही, आपल्याला किंमत नाही अश्या व्यक्तीसाठी, नात्यासाठी आपण इतकं झटण्यात काही अर्थ नाही ही गोष्ट जेव्हा त्याला समजली तेव्हा त्याने प्रीती सोबत वेगळं व्हायचा निर्णय घेतला.
इतकं होऊनही त्याच्या मनात शेवटची आशा होती की प्रीती काहीतरी बोलेल, नात परत सुरू करूयात असा काही म्हणेल, पण अस काहीही झालं नाही. तिने तितक्याच सहजतेने हा निर्णय स्वीकारला. जणू तिला हेच हवं होत. या सगळ्यातून राकेशला मात्र खूप मोठी शिकवण मिळाली. नात कितीही महत्त्वाचं असल तरी त्या आधी महत्त्वाचं आहे आपला आत्मसन्मान. तो टिकवून ठेवणं सर्वात जास्त गरजेचं आहे आणि ते आपल्याच हातात आहे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

