Skip to content

कौटुंबिक कलह वारंवार घडत असतील तर त्याचा सर्वांच्या मानसिकतेवर हे परिणाम होतात.

कौटुंबिक कलह वारंवार घडत असतील तर त्याचा सर्वांच्या मानसिकतेवर हे परिणाम होतात.


मयुरी महाजन


एखाद्या घरामध्ये गेल्यावर आपल्याला खूप प्रसन्नतेची जाणीव होते ,तर दुसर्‍या बाजूला अगदी त्याच्या टोकाचे की कधी आपण त्यांच्या घरी गेलो ,तर काहीतरी वाद ,भांडण किंवा घरातील व्यक्तींचे एकमेकांशी संभाषण नसणे, त्यामुळे त्यांचे ते हावभाव व चेहऱ्यावर दिसणारी ती निराशा या सर्व गोष्टींमुळे प्रसन्नता दूरच माणूस अप्रसन्न जास्त होतो ,कधीतरी एखाद्या मैत्रिणीकडे, मित्राकडे किंवा नातेवाईकांकडे कुणाच्यातरी घरी आपल्याला असे अनुभव येतातच, किंवा मग आपलेच कुटुंब, आपले घर यामध्ये त्या वाटाघाटी सुरू असतातच, ज्याचा सर्वांच्या मानसिकतेवर परिणाम होतो ,

कौटुंबिक कलह, कुटुंब म्हटलं म्हणजे तिथे वादविवाद, भांडणे कलह असणारचं, कारण की कितीतरी वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरती असलेले व जनरेशन गॅप असलेली व्यक्ती एकाच छताखाली वावरते, व एकाच्या मताला दुसऱ्याचा विरोध या सगळ्यात समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची प्रत्येकाची कुवत, व प्रत्येकाला वाटतं माझं तेच खरं ,त्यामुळे एकमेकांवर वर्चस्व गाजवून कुरघोडी होणे ,व कुठल्याही निर्णयासाठी स्वातंत्रता नसणे, हे खपत नसल्याने, नको त्या गोष्टींचाही विद्रोप होवून गोष्टी टोकाला जातात ,व कौटुंबिक कलर वारंवार घडत असतो,

परंतु या सर्वांचे एकंदरीत मानसिकतेवर होणारा परिणाम हा प्रत्येकासाठी एक टोकाची भूमिका असू शकते प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा ठरलेली असते ,त्या मर्यादेच्या पलीकडे जेव्हा गोष्टी घडू लागतात, तेव्हा त्याचा होणारा त्रास हा असह्य होतो ,व त्याचे दुरोगामी परिणाम हे भोगावे लागतात ,

कुटुंब हे आपल्या साऱ्यांनी मिळून बनलेले असते, व ते सर्वांच्या योगदानानेच पुढेही जाते, कुटुंब जसे एकमेकांनी मिळून बनलेले असते ,तसेच ते एकमेकांसाठी जगण्याचे सुद्धा असते ,कुटुंबातील कलहामुळे आपण एकमेकांसाठी आहोत, हे भावनाच मुळात कुठेतरी पुसट होत जाते,

ज्या गोष्टी आपल्याला आपले कुटुंब देत असते, त्या गोष्टी आपल्याला इतरत्र कुठेच मिळू शकत नाही ,जर आपण बारकाईने त्याचा विचार केलात तर आपल्या लक्षात येईल, एखादी चुकी झाली ,म्हणून शाळेतून आपल्याला घरी पाठवले जाते ,पण त्या चुकीला समजावून सांगून आपली चुकी स्वीकारली जात नाही, आपल्या कुटुंबाने तर आपल्या हजारो चुका माफ करून सुद्धा कधी आपल्याला एकटं सोडलं नाही, हे प्रेम हा जिव्हाळा कधीच कमी झाला नाही, आणि कोणी नसलं तरी माझे कुटुंब माझ्यासाठी कायम आहे, हा विश्वासच कितीतरी संकटांना पेलण्याची ताकद देतो,

ज्या कुटुंबामध्ये कलह वारंवार घडत असतात, त्याचा त्या कुटुंबातील व्यक्तींच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम होतो, जसे की घरामध्ये लहान मुले असतील, तर ते घरातील हे भांडण तंटे यामध्ये त्यांचा रोल नसला, तरी त्या घरातील प्रत्येक बालमनावर त्या घरातील व्यक्तींच्या प्रतिमा त्या त्या प्रसंगानुरूप गडद होत जातात, व एरवी त्या बालमनामध्ये जे खूप निर्मळ , व स्वच्छ असते, त्यांना नाजूक बालमनावरती राग, एकमेकांवरती दोषारोप ,म्हणजे एकमेकांविषयी द्वेष ,उत्पन्न होतो, व बालमनामध्ये बिंबविल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे कोऱ्या कागदावरती तुम्ही उमटवलेली अक्षरे आहेत, जे पुन्हा पुसता येत नाही, व ज्या बालपणामध्ये मुलांना प्रेम हवे असते, सर्वांची जवळीकता हवी असते, त्या वयामध्ये जर ते या सर्व गोष्टींना सामोरे जात असतील, तर मोठेपणी ते या सर्व गोष्टी ज्या त्यांना कुटुंबाकडून मिळाल्या नाहीत, त्या गोष्टी ही मुलं बाहेर शोधू लागतात,

थकून आल्यावर घरामध्ये विसावा मिळावा हा हेतू य असतो ,परंतु तो जर कलह किंवा भांडणाच्या रोशाने उमटत असेल, तर त्या घरामध्ये विसावा कमी आणि तेथून आपली सुटका किंवा आपली स्वतंत्रता ही व्यक्तीला जास्त प्रिय वाटू लागते,

घरामध्ये जसे माझे अस्तित्व आहे, तसेच प्रत्येकाचे सुद्धा अस्तित्व आहे, मी जर घर खर्च चालवत असणार, तर त्या घराची सर्वस्वी हुकूमत फक्त माझीच असेल, किंवा फक्त माझ्याच मताला किंमत असावी, हा खोटा अहंकार जर आपण बाळगत असू, तर आपण कुठे ना कुठे प्रत्येकाच्या अस्तित्वाला नाकारतोय,

काय चांगलं काय वाईट यातील फरक सांगणे हे आई वडील म्हणून आपले कर्तव्य असले पाहिजे, परंतु ते फक्त मी म्हणतोय म्हणून चांगले आणि वाईट हे ठरवण्याचा हक्क आपला नाही, कारण आपली मुले ही आपल्या माध्यमातून जन्माला आलेली आहेत, परंतु ते सुद्धा एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, हे आपल्याला स्वीकारावं लागेल,

आपल्या कुटुंबात एकोपा रहावा व सर्व गुण्यागोविंदाने नांदावे असे वाटत असेल ,तर आपल्याला एकमेकांच्या मतांचा आदर करता यायला हवा, एकमेकांच्या भावना समजून घेता यायला हव्यात, व त्या भावना जपण्याचा प्रयत्न करावा ,कारण मी बरोबर आहे, पण समोरचा सुद्धा चुकीचा नाही, हे जेव्हा आपण स्वीकारू तेव्हा माणसं समजायला सोपी जातील.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “कौटुंबिक कलह वारंवार घडत असतील तर त्याचा सर्वांच्या मानसिकतेवर हे परिणाम होतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!