तापट बायकोला तिच्या मनाविरोधातल्याच गुजगोष्टी सांगायला हव्यात का?
हर्षदा पिंपळे
‘राघव’ आणि ‘मालती’ची जोडी संपूर्ण चाळीत माहीत होती.राघव तसा स्वभावाला शांत होता.पण मालती मात्र स्वभावाला फारच तिखट होती.राघव तर तिला घाबरूनच असायचा. त्याचं आणि मालतीचं फारसं पटायचं नाही.मालती कायम तापलेल्या तव्यासारखी असायची.येणारा जाणारा त्यामुळे मालतीपासून चार हात लांबच राहायचा.तिच्या तापट स्वभावामुळे तिच्याशी कुणीही प्रेमाने बोलायला जायचं नाही.
प्रत्येकाला वाटायचं मालती तापट म्हणजे मालती वाईट. त्यामुळे प्रत्येकजण तिच्याशी चांगल्या हेतूने कधीच वागायचा नाही. कायम मालतीला राग येईल, किंवा तिच्या विरुद्ध असं काहीतरी बोलायचे.यामुळे मालती अजून भडकायची. तिच्या विरुद्ध वागलेलं,तिच्या मनाविरूद्ध बोलल्या जाणाऱ्या गुजगोष्टी तिला सहनच व्हायच्या नाही.
एक दिवस तिला तिच्या या अशा वागण्याचा प्रचंड त्रास झाला.शेवटी ती घर सोडून निघून गेली. राघव मात्र फार एकटा पडला.”तापट असली तरी बायको होती.वेळेला तिच मदतीला असायची.” या गोष्टीची जाणीव नंतर राघवला झाली. नंतर कसंबसं करून त्याने मालतीला पुन्हा एकदा घरी आणलं.तो तिच्यासोबत प्रेमाने वागू लागला.तापटपणा दुर्लक्ष करून तिच्यातील शांत झरा त्याने शोधण्याचा प्रयत्न केला. थोडं तिच्या कलाने घेण्याचा प्रयत्न केला.तिच्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी सांगणं त्याने बंद केलं.उलट इतरांसारखच तिच्याशी तो अगदी शांतपणे, मोकळेपणाने बोलू लागला.
काही काळानंतर, मालतीमध्ये प्रचंड बदल झालेला त्याला जाणवला.तापट असणारी मालती कुठेतरी थोडी शांत झाली होती.त्यामुळे शेवटी राघवने मोकळा श्वास घेतला.त्याच्या जीवात जीव आला होता.
तर,मालतीसारख्याच काही स्त्रिया आपल्या सभोवती असतात. त्यांना सांभाळता यायला हवं.
तर मित्रांनो,
नवराबायकोचं नातं आंबटगोड असतं.दोघांचे स्वभाव सहसा सारखे मुळीच नसतात.कुणी स्वभावाला तिखट मिरची असतं तर कुणी अगदी मधाळ असतं.तर अशावेळेस एकमेकांशी कसं वागायचं काही समजत नाही.सगळा गोंधळ उडतो.अनेकदा आपण पाहतो शांत नवऱ्याला तापट बायको मिळते किंवा तापट नवऱ्याला शांत बायको मिळते.किंवा कधी कधी दोघांचाही स्वभाव सारखाच असतो.तर शांत नवऱ्याला किंवा बायकोला हँडल करणं तसं अवघड जात नाही. पण जर नवरा किंवा बायको तापट असेल तर हँडल करायला जरा अवघड जातं.
तर मुद्दा असा आहे की,तापट बायकोला तिच्या मनाविरोधातल्याच गुजगोष्टी सांगायला हव्यात का?
तर , साधं सरळ आणि स्पष्टपणे सांगायचं झालं तर ‘नाही. बिलकुल नाही. बायको तापट असली म्हणून तिला तिच्या मनाविरोधातल्या गुजगोष्टी कधीही सांगू नये.यामुळे बायकोचा तापट स्वभाव काही बदलणार नसतो.उलट अशा गोष्टी सांगितल्याने तिचा संतापच जास्त होऊ शकतो. तिची विनाकारण चिडचिड वाढू शकते. तापट स्वभावाला त्यामुळे उगाचच खतपाणी मिळू शकतं.
आणि तापट असणाऱ्या बायकोला मनाविरोधातल्या गुजगोष्टी सांगणं मनाला तरी पटतं का ? का म्हणून सांगायच्या अशा गोष्टी तिला ? काहीतरी चांगलं, तिला आवडेल असं सांगू शकतो नं ?
आपल्याला गृहीत धरायची वाईट सवय लागलेली असते.बायको तापट आहे तर तिला चांगल्या गोष्टी सांगण्यात काय अर्थ ? तिच्याशी प्रेमाने बोलण्यात काय
अर्थ आहे?हे आपण आपलंच ठरवून मोकळे होतो.परंतु तिला नेमकं काय हवय याचा मात्र विचार केला जात नाही.सतत तिच्या मनाविरोधातील काहीतरी बोलून आपण तिला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. कधी कधी आपणच चुकतो. तापट ती तापटच असं बोलून किती सहजपणे तिच्याकडे दुर्लक्ष करतो.पण जरा शांत डोक्याने विचार करा,तिच्यामध्येही एखादा शांत झरा खळखळत असेलच की !
बायको तापट असली तर असूद्या.एकतर तो तिचा स्वभाव असू शकतो किंवा तिच्या या तापटपणाला अन्य गोष्टी जबाबदार असू शकतात.त्यामुळे दोन्हीतला फरक लक्षात घेणही तितकच महत्वाचं आहे. जाणून घ्या,तिचा स्वभाव तापट आहे की काही गोष्टी याला जबाबदार आहेत.उगाचच तिला तिच्या तापट स्वभावावरून सतत डिवचण्याचा प्रयत्न करू नका.त्याने स्वभावात किंवा तिच्या वागण्या-बोलण्यात काहीही सकारात्मक बदल घडणार नाही.
तर,बायको तापट आहे म्हणून तिच्याशी तसचं वागायला हवं असं काही नाही.तिला तिच्या मनाविरोधातल्या गुजगोष्टी सांगण्यापेक्षा तिचा कलाने थोडं समजून घ्यायला हवं.चार प्रेमाच्या, आपुलकीच्या गुजगोष्टी तिला आपण सांगायला हव्यात.
तिलाही आपणच असतो,त्यामुळे तिला समजून घ्या.तापट तापट म्हणण्यापेक्षा त्या तापटपणाला शांत कसं करता येईल याचा विचार करा.समजून उमजून घेतलं की कसं सहज सोपं होतं.
गुजगोष्टी सांगा.आवर्जून सांगा,पण मायेच्या, आपुलकीच्या!
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
Super
अहो पण त्याला काही तरी मर्यादा असते उगाच आपले सर्व पै पाहुणे तोडायचे कोनाच कोना वाचुन आडत नाही तुम्हीं सांगता ते साफ चुकिच आहें शेन आणी अन्न यातील फरक समझतो