Skip to content

पुष्कळ स्त्रिया या शरीरापेक्षा इमोशनल अफेअरला बळी पडत आहेत ??

पुष्कळ स्त्रिया या शरीरापेक्षा इमोशनल अफेअरला बळी पडत आहेत ??


हर्षदा पिंपळे


‘इमोशनल अफेअर’, एखादा अपवाद वगळता सर्वांच्या परिचयाची असलेली ही एक संकल्पना.अफेअर म्हंटलं की त्याला लफडं म्हणून सर्रासपणे बोललं जातं.अफेअरचा अर्थ आपण शब्दशः लफडं असाच घेतो.त्यामध्ये इमोशनल अफेअर वगैरे असा काही प्रकार असतो हे अजूनही काहीजणांना माहीतच नाही.किंवा ती संकल्पना त्यांच्या फारशी परिचयाची नसावी.

तर,तसं पहायला गेलं तर अफेअर्स कुणालाही नवीन नाही. कित्येकांच अफेअर असतं.कित्येकजण रिलेशनशिपमध्ये असलेले आपण पाहतो.आता यामध्ये कोण किती

प्रामाणिक असतं हे ज्याचं त्याचं त्यालाच माहीत असतं.

कुणी रिलेशनशिपमध्ये अगदी प्रामाणिक असतं तर

कुणी केवळ एखाद्या हेतूला साध्य करण्यासाठी या रिलेशनशिपमध्ये आलेलं असतं.अर्थात प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो.कुणाचा स्वार्थी तर कुणाचा निःस्वार्थी असतो.

तर,

इमोशनल अफेअर म्हणजेच (मनामनाने जोडलेलं नातं)भावनिक नात्याची गुंतवणूक असं म्हणायला काहीच हरकत नाही.ही गुंतवणूक फारच हळवी आणि नाजूक असते.तेवढीच ती स्ट्रॉंगही असते.

आता कुणाच्या मनात काय चालू असतं हे सांगणं कठीण असतं.कुणाच्या मनात किती भावना गोठलेल्या असतात हे समजणं सोपं नसतं.कारण कधी कधी बराच काळ सहवासात राहूनही एकमेकांच्या मनातलं लवकर समजत नाही. कोण मनातून किती पोखरलं गेलय याचा अंदाज सहसा लावता येत नाही.

आजकालच्या जीवन म्हणजे मुंबईच्या धावत्या लोकलसारखं आहे.याच धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे अनेकदा दुर्लक्ष होतं.रोजच आयुष्यात काही ना काही घडत राहतं.मनावर त्याचा ताण येत राहतो.

घर/ऑफिस अशी तारेवरची कसरत चालूच असते.हे वातावरणात, ही जीवनशैली कधी कधी खूपच

तणावपूर्ण वाटायला लागते.याच अशा तणावपूर्ण वातावरणात स्वतःला विश्रांतीची नितांत गरज असते.कुणीतरी आपल्याशी

प्रेमाने बोलावं,विचारपूस करावी असं वाटत असतं.

प्रत्येकवेळी आपल्याशी कुणी इतकं मायेने बोलेल याची काही शाश्वती नाही.आणि काही घरात कित्येक मुलींशी /स्त्रियांशी अजूनही व्यवस्थित बोललं जात नाही.त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही.

मुलगा मुलगी भेदभाव आजही जिवंतच आहे.

त्यामुळे त्यांना कुणीतरी आपल्याशी मायेने बोलावं असं वाटत असतं.कुणीतरी हक्काने चार गोष्टी विचाराव्यात, थोडा वेळ आपल्यासोबत घालवावा असं वाटत असतं.

या गोष्टी कुठेतरी बऱ्याच स्त्रियांना /मुलींना मिळत नाहीत.

इतकच नाही तर अनेकदा कित्येक नवरे हे शारीरिक गरजेपुरते स्त्रियांशी बोलत असतात.

पण इतर वेळी त्या स्त्रीला काय हवं काय नको याकडे मात्र दुर्लक्ष करतात.तिलाही शारीरिक गरज असते परंतु भावनिक गरजही असते.आणि हेच कित्येक पुरूषांच्या लक्षात येत नाही.अनेकांना नात्यामध्ये वादविवाद निर्माण होतात.अशावेळी भावनिक आधार सुटलेला असतो.

त्यांना समजून घेणारं कुणी नसतं.सौंदर्याची वाहवा करणारेही बरेच असतात परंतु वेळप्रसंगी समजून

उमजून घेणारं कुणीही नसतं.मनमोकळं करायला हक्काचा सुरक्षित कोपरा नसतो.त्यामुळे कुठेतरी त्या मनामध्ये कुढत असतात.रडत असतात.

आणि मग याच नकारात्मक वातावरणात जर कुणी फुंकर घालणारं भेटलं तर त्या प्रवाहामध्ये स्त्रिया कळत नकळतपणे पुढे जात राहतात.त्यांना तिथे जास्त सुरक्षित वाटायला लागतं.भावनिक सुखापुढे शारीरिक सुख त्यांना सहजपणे शून्य वाटायला लागतं.एखाद्या व्यक्तीशी त्या खूप कनेक्ट होतात.यातूनच ते इमोशनल अफेअर जन्माला येतं.पण हेच इमोशनल अफेअरही जेव्हा असुरक्षित वाटायला लागतं तेव्हा मात्र खूप त्रास होतो.अनेकदा स्त्रियांचाही केवळ वापर केला जातो.

वरवर तिच्या इमोशन्स समजून घेणारं इमोशनल अफेअर हे स्त्रियांच्या लक्षात येत नाही.हेच इमोशनल अफेअर असुरक्षित, अप्रामाणिक निघाल्यावर खूप त्रास होतो.कारण लैंगिक/शारीरिक/आर्थिक फसवणूकीपेक्षा ही भावनिक फसवणूक मनाला अधिक वेदना देणारी असते.कारण भावनिकरित्या गुंतलेलं मन एकदा तुटलं तर आयुष्यावर त्याचा परिणाम होत असतो.

आणि अनेकदा स्त्रियांच्या या अशा इमोशनल अफेअरला अशी काही कारणं जबाबदार ठरतात. एखाद्या व्यक्तीला केवळ शारीरिक सुख मिळूनही उपयोग नसतो.त्याला भावनांचा ओलावाही हवा असतो.ज्यावेळेस तो मिळत नाही त्यावेळेसच नेमकं कुठेतरी या स्त्रिया इमोशनली अडकतात. कधी कधी यातूनच त्या इमोशनल

अफेअरच्या बळी ठरतात. कारण सगळेच इमोशनल अफेअर प्रामाणिक, सुरक्षित असतात असं नाही.

तर,स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही इमोशन्स असतात.दोघांनाही प्रेमाची, मायेची गरज असते.

भावनिक आधाराची गरज असते.तर हेच लक्षात घेऊन आपल्या जोडीदाराला किंवा जवळच्या व्यक्तीला भावनिक आधार देण्याचाही प्रयत्न करा.नाहीतर त्या भावनिक आधाराअभावी स्त्रिया किंवा पुरुष इमोशनल अफेअरला नक्कीच बळी पडू शकतात.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “पुष्कळ स्त्रिया या शरीरापेक्षा इमोशनल अफेअरला बळी पडत आहेत ??”

  1. सत्य आणि खरी परिस्थिती सध्याची

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!