कुणाच्या मनात जिवंत राहावंसं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण ठेवा.
मयुरी महाजन
“पहेली हैं ये जिंदगी,
जितना सुलझानेंकी कोशिश करोगे,
ऊतनेंही ऊलझें रहोगे,
ऊसें पूरी तरह से जिने का प्रयास करो,
वो हसाने के हजारों मौके देती रहेगी…..”
आपले शरीर हे अंतिमतः मृत्यूची ठेव आहे, आणि आलेला प्रत्येक जीव कधी ना कधी संपणार आहे, हे वास्तव आहे, पण लोकांच्या मनामनात जिवंत रहायचं असेल, तर आपल्या जगण्यात ती समृद्धता व ती गोडी असायला हवी ,जगात मेल्यानंतर कोणी विचारत नाही, तुम्ही किती पैसे ठेवून गेलात ,आणि किती कमवून गेलात, त्यालाही अपवाद असतील चं, परंतु माणूस कसा होता ,त्याबद्दल बोलत असताना त्या व्यक्तीचं बोलणं आणि वागणं कसं होतं, यावरून त्याच्याविषयी तो गेल्या वर सुद्धा लोकांच्या मनात ती व्यक्ती जिवंत असते,
काहींच्या बोलण्यातील व वागण्यातील भावच इतके सुंदर असतात ,किती व्यक्ती भलेही जवळची असो,वा दूरची परंतु मनात त्या व्यक्तीची जागा असते, एक चांगली व्यक्ती म्हणून, आणि तसं पाहिलं तर कुणी कुणाला विशेष असं काही मागत नाही, एखाद्या व्यक्तीला छान स्माईल देऊन, तुम्ही तुमच्या बोलण्यातून शब्दांची उभारी देत असाल ,चार शब्द चांगले बोलत असालं, तर ती व्यक्ती आपल्याला त्याच्या मनात जिवंत ठेवते, याबद्दल काही शंका नाही,
आपल्या बोलण्याला आणि वागण्याला खूप महत्त्व आहे ,या दोन गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित सांभाळता आल्या त्यावर सर्वतोपरी आपले स्वतःचे नियंत्रण ठेवण्याचे आपण आपण शिकलो ,तर बऱ्याच अडचणी आपल्या सुटू शकतात ,
आपण आज या जगात आहोत, उद्या किंवा कधीतरी आपण नसणार, पण एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, की आपण जर या जगात नसलो, तरी आपण केलेलं कार्य आपण गाजवलेली कारकीर्द, व दुसऱ्याला जगण्यासाठी आपण किती भागीदार ठरलो, या गोष्टी कधीच संपणार नसतात, तसं पाहिलं तरं आयुष्य आज इतकं बेभरोश्यावर चाललंय, की त्यात क्षणाचाही कुणाचा भरोसा राहिलेला नाही, काल परवाच एका मैत्रिणीच्या वडिलांचा हृदय विकाराने मृत्यू झाला, अगदी काही क्षणात जवळून गेलेला माणूस, परत येणार की नाही, याविषयीची शंका येते, म्हणून कोणावर रूसवे फुगवे असतील, कुणाचे काही हिशोब चुकते करायचे राहिले असतील ,तर त्यासाठी वेळेवर सोडून देऊ नका, सर्वांना प्रेम व आनंद देण्याचा प्रयत्न करूया, कारण की असं म्हणतात ,आपण जे दुसऱ्याला देतो, तेच परत आपल्यालाही मिळत असतं,
ही कर्माची गती मोठी गहन आहे, काही माणसे बोलताना कधीच प्रेमाची भाषा वापरत नाही ,तसे ते बोलल्यावर काळजाला त्या गोष्टी लागतात, ज्यांच बोलणचं असं असतं ,त्यांचा वागणं सुद्धा तसंच असतं ,ते कधीच दुसऱ्याच्या मनाचा, भावनांचा विचार करत नाही, त्यांना त्यांचं काय तेच खरं करायचं असतं, अशी माणसं सहसा मनातून उतरतात ,व ती अशी उतरलेली असतात, की माणूस म्हणून कधीच त्याला मनात जागा असावी ,असं सुद्धा वाटत नाही,
आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, माहितीय की आपण जबरदस्ती करून ,भांडण करून, किंवा एखाद्याला मारझोड करून, त्याच्या मनात जागा निर्माण नाही करू शकत ,तुझ्या मनात मला जागा दे ,असं म्हणून ती मागून मिळवायची गोष्ट नाही, ती आपल्या कर्तुत्वाने ,आपल्या स्वभाव गुणांनुसार कमवायची गोष्ट आहे ,कुणीच उगाच कुणालाही मनात जागा देत नसतं, एक माणूस म्हणून प्रत्येकाचा आदर करून व ते जोपासणे हे आपल्या माणूसपणाचे पहिले लक्षण ,दुसरं म्हणजे माणूस माणसाशी कसा वागतो व कसा बोलतो ,यावरून त्या माणसाविषयी अंदाज लावले जातात ,
कारण आपण काय आहोत, हे आपल्या वागण्या बोलण्यातूनच प्रगट होत असते ,व इतरांच्या मनात आपली जागा निर्माण होण्यासाठी सुद्धा या दोन गोष्टींवर नियंत्रण असायला हवे, आपले बोलणे वागणे, यावर आपण अर्ध जग जिंकू शकतो ,असं म्हणतात ते यासाठी असावं,
शेवटी येताना काही आणलं नाही, आणि जाताना काही न्यायचं नाही, फक्त आपण किती जणांच्या मनात अजूनही जिवंत आहोत ,यावरून आपण काय जगून गेलो ,व काय कमवून गेलो हे ठरत असतं…
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


लेख आवडला