Skip to content

शरीर संबंध ठेवल्यानंतर काहींना पश्चातापाची वेळ येते अशावेळी काय करावे?? 

शरीर संबंध ठेवल्यानंतर काहींना पश्चातापाची वेळ येते अशावेळी काय करावे??


सोनाली जे.


शरीर संबंध ही खरे तर नैसर्गिक भावना आहे. जसे भूक , तहान , झोप तसेच शरीर संबंध ही गरज आहे. ही गरज सुधा भूक , तहान , झोप यासारखी च आहे. त्याक्षणी गरज भागते. पूर्ण होते. पोट भरते. मन तृप्त होते. तसेच शरीर संबंध ही ते मनासारखे झाले की शरीर ही हलके होते, मन उत्साही होते. आनंदी होते. सुख , शांतता , समाधान ही मिळते. आणि शरीराची गरजपूर्ती झाल्यामुळे तेही शांत होते. जसे भूक भागली की पोट भरते. मन तृप्त होते तसे च हे समाधान ही काही काळापर्यंत टिकते.

परत भूक लागली तहान लागली की खावे , पाणी प्यावे असे वाटते तसे शरीराचे ही .. परत ती इच्छा निर्माण होते. आणि शरीराची गरज ही संबंधातून पूर्ण व्हावी अशी इच्छा निर्माण होते. जोडीदार नसेल तर अर्थात ती पूर्ण करण्याचे इतर ही मार्ग आहेत. जसे हस्तमैथुन. पण त्यात तेवढे समाधान , शांतता नसते जेवढे जोडीदारासोबत मिळते.

काही ठिकाणी मात्र शरीर संबंध ठेवल्यावर ही ते सुख , शांतता , समाधान मिळत नाही. काही तरी अपूर्ण असल्याची , अतृप्ततेची भावना निर्माण होते. याचे कारण काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. जशी अपेक्षा असते तसे सुख मिळत नाही. तेव्हाची मनस्थिती, परिस्थिती , शारीरिक स्थिती , गरज , अपेक्षा या सगळ्यांवर हे सुख , समाधान अवलंबून असते.

काही वेळेस शरीर संबंध ठेवल्यानंतर काहींना पश्चातापाची वेळ येते.

यात ही बघा लग्नापूर्वी ठेवलेले सबंध असतील तर लग्नापूर्वी आपण चूक केली , घरात , मोठ्यांना , बाहेर इतरांना कोणाला समजले तर काय होईल याची भीती आणि guilt ही मनात निर्माण होतो. आता काही त्याचे विपरीत परिणाम होतील असे वाटून ही भीती निर्माण होते.ते उगीच ठेवले अशी हळहळ वाटते. क्षणिक मोह आपण टाळू शकलो नाही यामुळे पश्चातापाची वेळ येते . आणि काही वेळेस खरेच या संबंधातून pregnancy , काही गुप्तरोग होतात आणि त्याचा असे सबंध ठेवले म्हणून शरीर संबंध ठेवल्यानंतर काहींना पश्चातापाची वेळ येते . त्याचमुळे ते guilt परत तीच चूक करू देत नाही.

तर विवाहित स्त्री पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवतात . याचे कारण पुरुषात आणि स्त्रि मध्ये एक कॉमन आहे ते म्हणजे संबंधात अतृप्तता असणे. दोघांना ही समाधान मिळत नसणे.

याशिवाय पुरुष हे नाविन्याचा शोध घेत असतात. थोडासा बदल म्हणून , जसे आपण आंबट , गोड , खारट, तिखट , कडू अशा विविध चवी बदल म्हणून घेत असतो तसें. त्यातून ते विवाहबाह्य संबंध ठेवतात एक किंवा अनेक स्त्रियांच्या सोबत .

तसेच आजकाल स्त्रिया ही कुठे मागे नाहीत.

तर काही विवाहित स्त्री पुरुष त्यांचे राहिलेले आधीचे अपूर्ण प्रेम पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात.

तर काही वेळेस मित्र मैत्रिणी यांच्या संगतीने कधी अशा मार्गाकडे वळतात तेच समजत नाही त्यांना.

पण बरेचवेळा विवाहबाह्य संबंध हे एकमेकांच्या इच्छेने च ठेवले जातात. त्यात कोणाचे ही बंधन , जबरदस्ती नसते.

आणि बरेचवेळा हे संबंध वैवाहिक जीवनापेक्षा खूप जास्त आनंद , सुख, समाधान देणारे ही असतात. कारण यात मन आणि शरीर दोन्ही ही तेवढेच गुंतले असते. आणि असेच संबंध जास्त समाधान देतात ज्यात पूर्ण involvement असते. आपुलकी असते. आणि सगळ्यात महत्वाचे समर्पण .

तर काही वेळेस फक्त शारीरिक गरजा भागविण्यासाठी एकत्र येणारे ही आहेत. ते मानसिक , भावनिक दृष्टया कशात ही involve नसतात.

तर काही वेळेस हे त्रासदायक असतात. कारण पुरुषांचे काही नसते. ते आपला संसार झक्कास करत असतात. पण जी दुसरी स्त्री असते ती मात्र नवऱ्याकडून समाधान नसते म्हणून दुसरीकडे सुख शोधते. तेही जिथे तिला विश्वास असतो तिथे. पण ते शारीरिक संबंध संपले की बरेच पुरुष अंतर ठेवून वागणारे असतात. किंवा cool असतात. त्या स्त्री बाबत तशी कोणतीच कर्तव्य नसतात त्यांची. तसे काही डोक्यात येत ही नाही. पण ही स्त्री मात्र कुठे तरी काही तरी अपेक्षा ठेवून असते आणि तिला समजून घेणे हे अपेक्षित असते. ती indirectly ते प्रयत्न करत असते.

पण तिच्या काय गरजा आहेत हे तो पुरुष समजून घेतांना कमी पडतो. समजलेच नाही तर पूर्ण काय करणार. ? किंवा समजले तरी ती त्या प्रायोरिटी मध्ये नसते त्यामुळे त्याच्या डोक्यात ते येत ही नाही. यातून या स्त्रीची अपेक्षा वाढत जाते. त्रास देणे वाढते. तिचे ही बरोबर असते की ती जेव्हा संपूर्ण मन आणि तन समर्पित करते. अनेक गोष्टी तडजोड करून ती हे नाते अतिशय उत्कृष्टरित्या सांभाळते तेव्हा तिची ही कुठे तरी अपेक्षा येते कारण ती बायकोची भूमिका च निभावत असते. तर काही वेळेस पुरुषांच्या ही काही अपेक्षा असतात. जे स्त्रीला समजत नाही. वादाची ठिणगी , त्रासाची ठिणगी कुठून तरी पडते. आणि एकाला दुसऱ्याचे वागणे खटकू लागते. त्रासदायक वाटू लागते. जेव्हा हा त्रास असह्य होतो तेव्हा मात्र मग पश्चात्ताप होवू लागतो.

काही वेळेस विवाहबाह्य नात्यात अनेक मर्यादा , बंधने येतात त्यामुळे ही कुठे तरी अपेक्षाभंग होतो आणि त्रास होवून मग एक तर नात्याचा किंवा इतर गोष्टींचा पश्चात्ताप होवू लागतो.

यात आपण खालच्या पातळीच्या स्त्री पुरुषांच्या बाबत विचार करत नाही. जे त्यांचे प्रोफेशन म्हणून शरीर विक्री करतात ते यात पकडत नाही. किंवा जे खूप श्रीमंत असतात. स्त्री .पुरुष कोणी ही ते change म्हणून या गोष्टी करतात किंवा काही मोठी deals करण्यासाठी त्यांचा यात समावेश नाही. कारण त्यांना कोणत्याच गोष्टीचं दुःख आणि पश्चाताप नसतो.

एका गावात एक प्रतिष्ठित व्यक्ती ज्याने समाज , कायदा याने लग्न केले पण त्या बायको पासून मुलगा होईना म्हणून अजून एक लग्न केले . तेव्हा दोघी ही बायकाना एकच वेळी उलट आधीच्या बायकोला आधी मुलगा आणि दुसऱ्या बायकोला नंतर मुलगा झाला.

म्हणजे पहिल्या बायकोला मुलगा झाला तोही ज्येष्ठ. पण व्हायला काय लागले की ती दुसरी बायको मात्र त्रास देवू लागली. तिने स्वतच्या आणि मुलाच्या नावावर जमीन , घर करून घेतले. पहिल्या बायको साठी मग साधे घर घ्यावे लागले. त्या मुलांना जमीन नाही. आहे त्यात adjust करत राहावे लागलें .

याशिवाय कधी ते त्या दुसऱ्या बायकोकडे गेले की ती प्रत्येक वेळी त्यांच्या कडून पैसे काढत असे दागिने , हट्ट पुरवून घेत असे. आणि परत गावभर सांगत सुटे.

त्या प्रतिष्ठित व्यक्तीला हळूहळू तीच्यासोबत शरीर संबंध ठेवल्यानंतर त्यांना नेहमी शरीर संबंध ठेवल्यानंतर काहींना पश्चातापाची वेळ येते अशावेळी काय करावे??ची वेळ येत असे.

अर्थात त्या दुसऱ्या बायकोचे हे असे वागणे का होते ? कारण एक तर ती कायदा आणि समाज याने कुठेच बांधील नव्हती . ते तिला कधी ही सोडू शकत होते. आणि ते त्यांच्या वागण्यातून ही तिला जाणवत असे.

ती एकटी असती तर कदचित एवढी स्वार्थी वागली नसती. पण मुलाची जबाबदारी ही तिच्यावर होती. त्यामुळे पैशाची सोंगे कुठून आणणार? म्हणून ती वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे घेत असे. मुलाला आणि स्वतः ला सुरक्षित वाटावे म्हणून शेती घर याची सोय केली.

पण या गृहस्थांना ते त्रासदायक होवू लागलं . आणि तो पश्चाताप होवू लागला. असेच रीतसर लग्न झालेल्या व्यक्ती ही पश्चाताप करतात. कारण त्यांची पती / पत्नी एक तर मनापासून हे सुख देत नाही. सतत मागितल्यावर अगदी भीक मागितली तसे हे द्यायचे. त्यात कोणताच उत्साह नाही. अगदी जबरदस्ती ने केल्यासारखे .. आपुलकी, भावना , सुख देण्याची घेण्याची भावना नसते. आणि झाल की ही मी उपकार केले हीच वागणूक त्यामुळे असे संबंध ही पश्चाताप करण्याची वेळ आणतात.

पश्चाताप म्हणजे काय ? तर तुमचे मन तुम्हाला खात असते. तुम्ही काही तरी करायला जाता आणि काही तरी वेगळेच होते त्यातून मनाची निराशा , त्रास होतो. आणि उगीच आपण असे केले अशी भावना , guilt निर्माण होतो.

शरीर संबंध ठेवल्यानंतर काहींना शरीर संबंध ठेवल्यानंतर काहींना पश्चातापाची वेळ येते अशावेळी काय करावे??

१. त्याक्षणी शांत बसावे. :-

त्याक्षणी शांत बसावे. React होवू नये. समोरची व्यक्ती जरी तुम्हाला प्रेरित करत असेल तरी स्वतः वर नियंत्रण ठेवावे. त्याक्षणी कोणतीही प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देवू नये.

तिथे शांत राहणे जमत नसेल तर निघून दुसरीकडे जावे. बाहेर जावे. शांत झाल्या नंतर काय घडले त्याचा विचार क्रमाने करावा.

२. पश्चाताप होण्याचे नक्की कारण काय हे नक्की शोधावे. त्यात समोरच्या व्यक्तीचे वागणे असे का झाले ? अपेक्षा काय ? हे तिच्या दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

मग त्यात आपली चूक काय झाली. याचा विचार नक्की करावा. टाळी एका हाताने वाजत नाही. उगीचच कोणी कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही. किंवा त्रास ही देत नाही. मग आपली चूक काय ते शोधून ते सुधारण्याचा प्रयत्न करावा.

जर तुम्हाला तुमची काहीच चूक जाणवत नसेल तर त्या व्यक्तीची अपेक्षा नक्की काय हे विचार करून , बोलून , वास्तव किंवा अवास्तव असेल तर समजूत घालून दूर करावी. त्यावर मार्ग शोधावे. आणि मूळ कारण दूर करावे. म्हणजे जर चांगले नाते असेल तर ते टिकून राहील आणि

शारीरिक संबंध जर खरेच समाधानकारक असतील आणि त्यात इतर कारणांच्या मुळे त्रास होत असेल पश्चाताप होत असेल तर ती दूर होवून पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.

नवरा बायको मध्ये ही एकमेकांच्या इच्छा ओळखून , गरजा ओळखून सबंध ठेवावेत. काही अडचणी असतील त्रास होतील त्यामुळे टाळत असतील , काही कमतरता असतील तर त्यावर उपाययोजना करावी. त्यामुळे जबरदस्ती ने करण्याची किंवा तशी भावना ही निर्माण होणार नाही आणि पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.

३. पश्चाताप होण्याची वेळ येण्याचे जे कारण किंवा जी अनेक कारणे असतील ती situation घडून गेली आहे. मग ते क्षणिक मोह असतील .लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर. ते तेवढेच मर्यादित ठेवून विसरून जावे. जर काही मेडिकल प्रोब्लेम असेल तर तो solve करावा.

होवून गेलेली घटना परत मागे जावून पूर्वी सारखे परत करू शकत नाही. काचेचा ग्लास पडला आणि तडा गेला की तो तडा आपण काढू शकत नाही. त्यात काहीच करू शकत नाही.

पण हे चुकीचे वाटत असेल तर परत ती चूक करू नये. तडा जावू नये वाटत असेल तर तो ग्लास अतिशय सांभाळून , काळजीपूर्वक हाताळावा.

तसे लग्नापूर्वी, लग्नानंतर असे काही मोह होत असतील तर ते त्याचवेळी कंट्रोल करावेत. आणि जर घडून गेले आणि पश्चाताप झाला तर तसे परत होणे टाळावे. त्यापासून दूर जावे.

त्याक्षणी पश्चाताप वाटला आणि तो विसरून तरी ही भावना , किंवा क्षणिक मोहाच्या परत परत आहारी गेलो तर परत पश्चाताप करण्याची वेळ येवू शकते.

म्हणून ते टाळायचे असेल तर त्याक्षणी कठोर निर्णय घेवून त्या मोहापासून दूर झाले पाहिजे.

४. कसे आहे नाती कायमची तोडता येत नाहीत. जरी तुम्ही तुमच्या आयुष्यातून दूर केले, नजरेपासून दूर केले तरी प्रत्येक व्यक्ती मधल्या काही चांगल्या गोष्टी या नक्कीच आठवणीत राहतात. त्याचमुळे कोणीच व्यक्ती परिपूर्ण नसते हे लक्षात घ्यावे.

दुसरी गोष्ट माणूस , व्यक्ती वाईट नसतेच मुळात पण परिस्थिती , इतरांची वागणूक , तुमची स्वतः ची कळत नकळत दिलेली वागणूक हे असमधनाचे मूळ कारण असते. आणि काही अपेक्षा. जे आहे ते बोलून समजून घेवून त्यावर मार्ग काढणे गरजेचे असते.

आणि मार्ग काढणे शक्य नसेल तर एकमेकांनी कायमचे मार्ग बदलणे गरजेचे असते. तर सततचे त्रास ही होणार नाहीत आणि तुमचे मन तुम्हाला खात राहणार नाही. पश्चाताप करण्याची वेळ ही नाही. याकरिता सुसंवाद असणे गरजेचे असते. आणि एकमेकांच्या गरजा , मर्यादा समजून घेणे गरजेचे असते.

शारीरिक संबंध चांगले असतील आणि इतर त्रास जास्त होत असतील तरी मग मनस्ताप ,पश्चाताप होतो. म्हणून ओढून ताणून ते संबंध ठेवू नयेत . प्रयत्न करावेत कारण नवरा बायको नाते तसे सहज तोडता येत नाही. जिथे संपूर्ण शरीर आणि मन स्त्रीने दिले असते, समर्पण केले असते तेही समजून घेणे गरजेचे असते. कारण सुरुवातीला एकमेकांच्या मधल्या उणिवा जाणवत नाहीत. त्रास जाणवत नाहीत. कारण दोघेही नवीन असतात. आणि हळूहळू सगळे नीट होईल , जमेल अशी आशा असतें.

आणि जर तसे नसेल होत नसेल तर मग मात्र दुसरे मार्ग शोधले जातात किंवा पश्चाताप होतो.

पण दोघांना ही मनस्ताप वाढत असेल, तडजोड करणे शक्य नसेल ,एकमेकांना समजून घेणे शक्य नसेल, आणि सतत पश्चाताप , मन खात असेल तर मात्र कायमचे दूर राहणे योग्य.

शरीर संबंध लग्नाआधी चे आहेत, लग्नानंतर चे आहेत, विवाहबाह्य आहेत का लग्नानंतर ही अपूर्ण राहिलेल्या प्रेमाचे आहेत. त्यावरून ही अनेक गोष्टी घडत असतात. परिस्थिती , मानसिकता , अपेक्षा बदलत असतात.

यात वैवाहिक संबंधात ही वेगळेच असते. त्यातले प्रॉब्लेम्स आणि त्रास आणि त्यात खाणारे मन हे वेगळेच असते.

त्यामुळे पश्चाताप झाल्यावर निश्चित ठोकताळा नाही की कोणी कसे वागावे. आणि काय करावे.यात प्रत्येकाचे अनुभव निराळे त्यामुळे त्यावर आधारित निर्णय जरूर घ्यावे. व्यक्ती तितक्या प्रकृती. पण असे होवू नये की आपण व्यक्तीला ओळखायला च पूर्णपणे चुकलो. आणि घाईत , भावनांच्या भरात काही निर्णय घेतले. तसे झाले तर तो सर्वात मोठा पश्चात्ताप असेल.

आयुष्य सुंदर आहे. त्यात उत्कृष्ट शारीरिक संबंध हे जर मिळाले तर आयुष्य अजून सुखकारक आहे नक्कीच. त्यात तुमचा ताण विसरून रिलॅक्स व्हायला होते. नवीन energy निर्माण होते. रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू राहते. तुमच्या जगण्याला अजून जास्त उत्साह मिळतो.

त्यामुळे शारीरिक संबंध ठेवताना आणि ठेवल्यावर ही एकमेकांची काळजी घ्या. जपा. समजून घेण्याचा प्रयत्न करा. मन खात असेल तर मात्र त्या पश्चाताप आणि त्रासदायक गोष्टी पासून दूर रहा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “शरीर संबंध ठेवल्यानंतर काहींना पश्चातापाची वेळ येते अशावेळी काय करावे?? ”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!