Skip to content

‘ती’ रोज झोपण्यापूर्वी दिवसभराचा आनंद लिहत होती!!

?एक जबरदस्त सकारात्मक विचार?


लेखन-श्रीकृपा कदम


एका स्त्री ची एक सवय होती की ती रोज झोपण्या अगोदर आपले दिवभराचा आनंद एका वहीत लिहीत असे ….

एका रात्री तिने लिहलेले की…….

★मी फार सुखी समाधानी आहे. माझा पती रात्रभर फार मोठयाने घोरतो कारण काय तर तो जिवंत आहे.ही ईश्वराची कृपा आहे

★मी फार सुखी समाधानी आहे, माझा मुलगा सकाळी माझ्याशी भांडतो की त्याला रोज रात्रभर मच्छर – खटमल मला झोपून देत नाही.म्हणजेच तो रात्री घरी असतो,आवारागर्दी,वाईट वागत नाही. ही ईश्वराची कृपा आहे.

★मी फार सुखी समाधानी आहे.
दर महिन्याला लाईट बिल,गैस, पेट्रोल, पानी वगैरेचे फार मोठा टैक्स दयावा लागतो. म्हणजेच सर्व गोष्टी माझ्याकडे आहे,त्या वस्तू वापरात आहेत,जर हया वस्तू माझ्याकडे नसत्यातर तर हे जगणे किती अवघड झाले असते.ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

★मी फार सुखी समाधानी आहे.
दिवस संपे पर्यत माझे थकून फार हाल होतात.पण माझ्याकडे दिवसभर काम कष्ट करण्याची ताकद आणि बळ आहे.
हीच माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

★मी फार सुखी समाधानी आहे
रोज मला घरातील केर कचरा काढून घर साफ स्वच्छ करावे लागते. आणि दरवाजा खिडक्या साफ कराव्या लागतात. खरच देवाची माझ्यावर खुप कृपा आहे की माझ्याकडे स्वतः चे घर तरी आहे.ज्याच्याकडे घर,छत नाही त्याचे काय हाल होत असतील.

★मी फार सुखी समाधानी आहे
कधीतरी लहान मोठा आजार होतो.पण लगेच बरी होते.माझे आरोग्य चांगले आहे ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

★मी फार सुखी समाधानी आहे
प्रत्येक सणाला भेट देताना माझी पर्स रिकामी होते.म्हणजेच माझ्या जवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत.माझे नातेवाईक, मित्र,ज्याना मी भेट देऊ शकते,जर हे लोक नसते तर जीवन कीती वैराण झाले असते ही ईश्वराची कृपा आहे

★मी फार सुखी समाधानी आहे
मी रोज पहाटे अलार्म वाजला की मी उठते म्हणजे मी रोज सकाळ बघायला मिळते ही ईश्वराचीच कृपा आहे.

★जगण्याच्या या फॉर्मूल्यावर अमल करत आपले आपल्या लोकाचे जीवन आनंदमयी बनवले पाहिजे, छोटया व मोठया दुःखात,संकटात, त्रासातून सुखाचा शोध घ्या,आनंद शोधा,आशा या माझ्या ईश्वराचे कृपेचे मी अभिनंदन करतो,सर्वाचे जीवन सुखी समाधानी बनवा

?हे नुसते वाचू नका तर यावर अमल करा….!!?



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

8 thoughts on “‘ती’ रोज झोपण्यापूर्वी दिवसभराचा आनंद लिहत होती!!”

  1. Dnyaneshwar Varude

    …खरं तर, हया आधी सुद्धा अनेकवेळा माझ्या वाचनात असं आल आहे,
    परंतु हया वेळी मी नक्कीच ह्याची अंमलबजावणी करणार आहे./केली आहे.?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!