Skip to content

काही व्यक्ती आनंद देणाऱ्या ठिकाणी जातात तर काही आहे त्या ठिकाणांमध्येच आनंदाची निर्मिती करतात.

काही व्यक्ती आनंद देणाऱ्या ठिकाणी जातात तर काही आहे त्या ठिकाणांमध्येच आनंदाची निर्मिती करतात.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


ए, यावर्षी गोव्याला जायचं नाही हा, यावेळी मस्त दुसऱ्या ठिकाणी फिरायला जाऊ. दर वर्षी एकच ठिकाण कश्याला? आपण बाकीची स्थळ कधी एक्सप्लोर करणार मग? ते काही नाही यावर्षी आपण जरा वेगळं आणि हटके ठिकाण निवडू? लेह लडाख कसं वाटत? उर्विल इतक्या जोशात बोलत होता जणू काही ते आताच जाण्यासाठी निघणार आहेत. प्रत्यक्ष तो जायच्या वाटेवरच आहे. तो इतकं सर्व बोलला खर पण जेव्हा त्याने समोर पहिलं जेव्हा समोरचा नजारा पाहण्यासारखा होता.

सगळी त्याच्याकडे अशी पाहत होती जसं काही त्याने गोव्याचा प्लॅन चेंज करायला सांगून घोडचूक केली आहे. कोणालाच त्याचा मुद्दा पटलेला दिसला नाही. तो त्यांच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, अरे अस का पाहताय माझ्याकडे? मी काही चुकीचं बोललो का? त्याने इतकं म्हणायचा अवकाश, समीर आणि नितीन त्याला मारायला त्याच्या मागे धावले. श्रुती, वैष्णवी ते पाहून हसू लागल्या.

मारतील नाहीतर काय करतील? तो बोललाच तस होता. दुसऱ्या एखाद्या माणसाला याच कारण समजलं नसत पण त्या सर्वांना ते माहीत होत. गोवा हे ठिकाण फक्त त्यांच्यासाठी आता सुट्टीत जाऊन मजा मारणे, तेवढाच वेळ घालवून येणे अस राहील नव्हत. तिथल्या प्रत्येक स्थळाशी त्यांच्या काही ना काही आठवणी जोडल्या होत्या. त्यांचं ग्रुप तसा मोठा, ही सर्व सात आठ जण.

अकरावीमध्ये जो ग्रुप झाला तो आता या सर्वांची लग्न झाली तरी टिकून होता. बारावी झाल्यानंतर सर्वांचे मार्ग तसे बदलले गेले होते. अगदीच नाही तरी ती सर्व जण थोडीफार विखुरली गेलीच. बारावीच्या सुट्टीतच त्यांनी पहिल्यांदा गोव्याला जायचा प्लॅन केला होता. त्यावेळी कोण कुठे कमावत होत जे त्यांच्याकडे खूप सारे पैसे असतील. तरी जे काही साठवलेले असतील, पॉकेट मनी, मी देतो रे तुला नंतर आता माझे भर अस करत त्यांनी हा प्लॅन केला होता.

ती त्यांची पहिली गोवा ट्रीप, स्वतःच्या पैशाने केलेली. त्यावेळी काढलेले फोटो, झालेली मजा मस्ती, फजिती सर्व काही अजून जसच तस स्मृतीत होत. ती आठवण विसरण्यासारखी नव्हतीच. पण या ट्रीप नंतर एक अलिखित परंपराच सुरू झाली. कोणी कितीही व्यस्त असुदे, कितीही दूर असुदे वर्षातून एकदा सर्वांनी एकत्र यायचं आणि गोव्याला जायचं.

त्यांचा जो आनंद होता तो त्या स्थळाशी, तिथे निर्माण झालेल्या आठवणींशी जोडला गेला. आता सर्व कमावते झाले होते, चांगल्या पदावर काम करत होते. त्यांच्या मनात आलं असत तर ते आरामात परदेशात जाऊ शकले असते

पण कोणालाही अस वाटल नाही. वर्षातून फिरायला एकत्र जायचं तर कुठे? गोवा. ठरलेले उत्तर. त्यांच्या मनात या स्थळाविषयी काही भावना होत्या. हे अस आपल्या बाबतीत पण असत ना! अशी एखादी जागा, अस एखाद स्थळ जे कदाचित दुसऱ्यांसाठी साधं असेल पण आपल्याला खूप आनंद देणारं, समाधान देणार असत.

तिथे गेल्यावर, वेळ घालवल्यावर मनाला एकप्रकारची शांतता मिळते. अगदी घराचा एखादा कोपरा देखील आपल्याला हा आनंद देऊन जातो. मग ती आपली बाल्कनी असेल नाहीतर जिथे आपण पुस्तक ठेवतो ती खोली. प्रत्येकाचं आनंदाचं ठिकाण हे वेगळं असत. त्या माणसाला तिथे जाऊनच आनंद मिळतो.

पण याउलट पण काही व्यक्ती असतात. म्हणजेच जसं काहींना स्थळ आनंद देतात तस या व्यक्ती जिथे आहेत तिथेच आनंद निर्माण करतात. आहेत त्या परिस्थितीमध्ये, स्थळामध्ये आनंद मानतात. इथे स्थळाला महत्त्व नसते तर माणसाला असते. त्या माणसाचे जे गुण असतात ते आनंद निर्माण करतात.

अश्या व्यक्ती आपल्या सर्वांच्या आयुष्यात असतात किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा स्वभाव असू शकतो. आपण आनंद मिळवायला, त्याचा अनुभव घ्यायला स्थळावर, त्या विशिष्ट जागेवर अवलंबून राहत नाही, तर जिथे आहोत त्यात कसे आनंदी राहता येईल, कसा आनंद निर्माण करता येईल याचा विचार करतो. हा जो गुण आहे तो खूप चांगला गुण आहे कारण प्रत्येक वेळी आपल्याला त्या जागेवर जाणं शक्य असतच अस नाही. पण जिथे आहोत तिथे आनंदी होत ते आपल्याला शक्य असतं. कारण तो आनंद निर्माण करण सर्वस्वी आपल्या हातात आहे. आपण त्यासाठी कश्यावर अवलंबून राहत नाही आणि आनंदी, सुखी जीवनाच हेच रहस्य आहे.

आपल्या आयुष्यात अशी काही ठिकाणं असतात जिथे आपल्याला आनंद मिळतो. पण हे जरी खरं असल तरी आपल्याला आहे त्या ठिकाणी देखील आनंद मिळवता निर्माण करता आला पाहिजे. यामुळे आपलं आरोग्य आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांचं आरोग्य पण छान राहत. कारण लोकांना देखील हसणाऱ्या, आनंदी वातावरणात उत्साह निर्माण करणाऱ्या व्यक्ती जास्त आवडतात. त्या त्यांच्या लाडक्या असतात. जेव्हा आपण आहे त्या ठिकाणी आनंद निर्माण करू लागतो तेव्हा आपण स्वतः आपल्या आनंदाची जबाबदारी घेतो आणि हेच खूप महत्त्वाच आहे. यातूनच आपलं आयुष्य छान होऊ शकत.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!